सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की आपल्याला एखाद्या लग्नाला, कार्यक्रमाला जायचं असतं. पण त्याच्याआधी पार्लरला जायला मात्र वेळच नसतो. मग ऐनवेळी सगळीच धावपळ होते. चेहरा डल- निस्तेज वाटू लागतो. अशा चेहऱ्यावर मग मेकअप केला तरी नीट बसत नाही. आणि मग उगाच आपली स्वत:वर चिडचिड होते. म्हणूनच अशाप्रसंगी अगदी झटपट चेहऱ्यावर ब्रायडल ग्लो पाहिजे असेल तर हा एक सोपा उपाय पाहून ठेवा (Bridal glow in just 15 minutes). बीटरुट वापरून घरच्याघरी ब्रायडल फेशियल कसं करायचं, ते बघा (beetroot facial for instant glow).. चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो आणण्यासाठी हा उपाय एकदम बेस्ट आहे. (How to get parlour like glow at home)
ब्रायडल ग्लो मिळविण्यासाठी कसं करायचं बीटरुट फेशियल?
चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी घरगुती साहित्य वापरून बीटरुट फेशियल कसं करायचं, याचा उपाय anubeauty.tips या इन्स्टाग्राम पेजवर सुचविण्यात आला आहे. यामध्ये एकूण ३ स्टेप्स आहेत.
मेथीच्या भाजीच्या देठांची चटपटीत चटणी, एकदा खाऊन पाहाल तर नेहमीच कराल- बघा सोपी रेसिपी
सगळ्यात आधी तर आपण स्क्रबिंग करणार आहोत. यासाठी बीटरुट किसून घ्या. बीटरुटचा किस एका वाटीत घेऊन त्यात १ चमचा तांदळाचं पीठ टाका. या मिश्रणाने आता चेहऱ्याला ५ मिनिटांसाठी स्क्रब करा. यामुळे त्वचेवरची डेड स्किन निघून जाईल.
स्क्रबिंग झाल्यानंतर आपण चेहऱ्यासाठी फेसपॅक तयार करणार आहोत. यासाठी बीटरुट किसून झाल्यानंतर त्याचं जे पाणी उरेल ते पाणी घ्या. या पाण्यामध्ये बेसन पीठ कालवा. त्यात थोडा लिंबाचा रसही टाका. लिंबाचा रस नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून काम करतो. आता हा लेप चेहऱ्याला लावा. ५ ते ७ मिनिटांनी लेप अर्धवट सुकला की अलगदपणे चोळून काढा. यामुळे त्वचेवरचं टॅनिंग निघून जाईल.
उन्हाळ्यात टोमॅटो लवकर खराब होतात? बघा १ सोपा उपाय- महिनाभर टोमॅटो राहतील फ्रेश
तिसरी स्टेप आहे बीटरुटचं क्रिम. यासाठी १ टीस्पून बीटरुटचा रस घ्या. त्यात अर्धा टीस्पून ॲलोव्हेरा जेल टाका आणि व्हिटॅमिन ई ची एक कॅप्सूल टाका. सगळं मिश्रण हलवून घ्या. हे क्रिम चेहऱ्याला लावून ५ मिनिटे मसाज करा. बघा यानंतर तुमच्या चेहऱ्यावर कशी छान चमक येते.