Join us  

फक्त १० रुपयांत चेहऱ्यांवर येईल ब्रायडल ग्लो, बघा टोमॅटो वापरून नेमकं काय करायचं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2023 12:13 PM

Bridal Glow Like Effect In Just 10 Rupees: घरच्याघरी टोमॅटो फेशियल करा... चेहरा होईल अगदी गोल्डन फेशियल केल्यासारखा चमकदार (15 minutes tomato facial for removing tanning)

ठळक मुद्देघरच्याघरी १० रुपयांपेक्षाही कमी किमतीच्या सामानात गोल्डन ग्लो किंवा ब्रायडल ग्लो देणारं फेशियल कसं करायचं ते पाहा...

सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहेत. शिवाय न्यू इयर पार्टीची तयारी पण अनेक ठिकाणी जोरात सुरू आहेच. अशा दोन्ही कार्यक्रमानिमित्त तुम्हाला छान तयार तर व्हायचंय (How to get instant glow for new year party),  पण फेशियल करण्यासाठी पार्लरमध्ये जायला वेळ नसेल तर घरच्याघरी हे टोमॅटो फेशियल करून पाहा. घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात हे फेशियल करणं शक्य आहे (15 minutes tomato facial for removing tanning). त्यामुळे अगदी घरच्याघरी १० रुपयांपेक्षाही कमी किमतीच्या सामानात गोल्डन ग्लो किंवा ब्रायडल ग्लो देणारं फेशियल कसं करायचं ते पाहा...(Bridal glow like effect in just 10 rupees)

 

ब्रायडल ग्लो मिळवून देणारं टोमॅटो फेशियल

चेहऱ्यावर चमक येण्यासाठी घरच्याघरी १५ मिनिटांत टोमॅटो फेशियल कसं करायचं याविषयीचा व्हिडिओ beauty__secrets_with_shalini या पेजवर शेअर करण्यात आला आहे.

टोमॅटो फेशियल करण्यासाठी साहित्य

कुडकुडणाऱ्या थंडीत प्या वाफाळतं हॉट चॉकलेट, बघा ५ मिनिटांत होणारी एकदम कॅफेस्टाईल रेसिपी

१ मध्यम आकाराचा टोमॅटो

१ टीस्पून कॉफी

१ टीस्पून साखर

१ टीस्पून ॲलोव्हेरा जेल

२ टिस्पून हळद

 

उपाय

१. सगळ्यात आधी टोमॅटोच्या गोल चकत्या करून घ्या.

२. आता सगळ्यात आधी एका फोडीवर साखर आणि कॉफी टाका आणि त्याने चेहऱ्याला ५ मिनिटांसाठी स्क्रब करा. स्क्रब करताना त्वचा जोरजाेरात घासू नका. हळूवार हाताने मसाज करा.

सकाळी झोपेतून उठताना अंग आखडतं? अंथरुणावर पडूनच करा ५ व्यायाम- दिवसभर ॲक्टीव्ह राहाल

३. यानंतर चेहरा धुवून टाका. आता स्क्रबिंग केल्यानंतर आपल्याला चेहऱ्याला हायड्रेट करायचं आहे. यासाठी टोमॅटोची दुसरी स्वच्छ फोड घ्या. त्यावर ॲलोव्हेरा जेल टाका आणि त्याने ५ मिनिटांसाठी चेहऱ्याला मसाज करा.

 

४. चेहऱ्याला मसाज केल्यानंतर तो धुण्याची गरज नाही. आता टोमॅटोच्या दुसऱ्या स्वच्छ फोडीवर हळद टाका आणि त्याने चेहऱ्याला मसाज करून हळदीचा लेप लावा. हळदीचा लेप सुकल्यावर चेहरा धुवून टाका. 

कांद्याचे ६ प्रकार- पाहा कोणत्या रेसिपीसाठी कोणता कांदा वापरायचा- पदार्थ होतील आणखी चवदार

५. यानंतर चेहऱ्याला मॉईश्चराईज करा...

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीनववर्ष