चिंचेचा वापर अनेक पदार्थात होतो. पदार्थात आंबड - गोड चव आणण्यासाठी आपण चिंच घालतो. पदार्थात चिंच घालताच पदार्थाची चव दुपट्टीने वाढते. जे आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. यामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय यामध्ये फॉस्फरस, एमिनो अॅसिड, मॅग्नेशियम इत्यादी मुबलक प्रमाणात असतात, जे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.
चिंचेच्या बियांचा वापर, अनेक सौंदर्यप्रसाधने आणि औषधांच्या निर्मितीसाठीही केला जातो. चिंचेमध्ये असलेले जाइलोग्लाइकेन्स तत्व त्वचेवरील पुरळ बरे करतात. त्यात असलेले हायलुरोनिक ऍसिड त्वचेला मॉइश्चरायझ व पोषण देते. यात दाहक-विरोधी गुणधर्म देखील आहे, जे त्वचेची कोणतीही समस्या कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. आपण याचा वापर फेसमास्कसाठी करू शकता. ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक ग्लो येईल(Bring back that glow with these DIY tamarind face packs).
महागडे कंडीशनर कशाला, खोबरेल तेलाचे बनवा नैसर्गिक कंडीशनर, केस होतील मुलायम, करतील शाईन
या पद्धतीने फेसपॅक बनवा
सर्वप्रथम चिंच उन्हात वाळवा आणि त्याच्या बिया काढून टाका. चिंचेमध्ये थोडे दूध आणि चिमूटभर हळद मिसळून पेस्ट बनवा. आपण पेस्ट बनवण्यासाठी मिक्सरचा वापर करू शकता. अशा प्रकारे चिंचेचा फेसमास्क बनवण्यासाठी पेस्ट रेडी झाली आहे.
अशा प्रकारे वापरा
सर्वप्रथम, चेहरा स्वच्छ करून पुसून घ्या. हा चिंचेचा पॅक स्वच्छ कोरड्या चेहऱ्यावर लावा. 15 ते 20 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा, व कोरडे होऊ द्या. ते सुकल्यावर चेहऱ्याला 1 मिनिट दुधाने मसाज करा आणि नंतर पाण्याने धुवा. पुसल्यानंतर खोबरेल तेलाने चेहऱ्यावर मसाज करा. आपण हा फेस्मास्क आठवड्यातून २ वेळा वापरू शकता. यामुळे नक्कीच त्वचेला फायदा मिळेल.