Lokmat Sakhi >Beauty > थकलेल्या चेहेऱ्यावर इन्स्टंट ग्लो आणतो फेस शीट मास्क, हा मास्क नक्की  आहे  काय?

थकलेल्या चेहेऱ्यावर इन्स्टंट ग्लो आणतो फेस शीट मास्क, हा मास्क नक्की  आहे  काय?

फेस शीट मास्क हा ब्यूटी ट्रेण्ड कोरिया देशातून आला आहे. पण आज जगभरातील महिला या फेस शीट मास्कचा उपयोग करत आहे. आपल्याकडेही फेस शीट मास्क हे सौंदर्य उत्पादन लोकप्रिय होऊ लागलं आहे.अभिनेत्री दीपिका पादूकोण , आलिया भट या अभिनेत्रींच्या माध्यमातून हा ट्रेण्ड आपल्याकडे सामान्या महिला आणि तरुणींमधेही रुळू लागला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 04:16 PM2021-06-02T16:16:28+5:302021-06-02T16:25:08+5:30

फेस शीट मास्क हा ब्यूटी ट्रेण्ड कोरिया देशातून आला आहे. पण आज जगभरातील महिला या फेस शीट मास्कचा उपयोग करत आहे. आपल्याकडेही फेस शीट मास्क हे सौंदर्य उत्पादन लोकप्रिय होऊ लागलं आहे.अभिनेत्री दीपिका पादूकोण , आलिया भट या अभिनेत्रींच्या माध्यमातून हा ट्रेण्ड आपल्याकडे सामान्या महिला आणि तरुणींमधेही रुळू लागला आहे.

Brings instant glow on tired face by Face sheet mask.. what is this mask exactly? | थकलेल्या चेहेऱ्यावर इन्स्टंट ग्लो आणतो फेस शीट मास्क, हा मास्क नक्की  आहे  काय?

थकलेल्या चेहेऱ्यावर इन्स्टंट ग्लो आणतो फेस शीट मास्क, हा मास्क नक्की  आहे  काय?

Highlightsफेस शीट मास्क आपल्या चेहेऱ्याला कमी वेळात चमकदार आणि उजळ बनवतो. हे फेस शीट मास्क चेहेऱ्याच्या आकाराचं बनवलेलं असतं. तात्काळ फायदा हा फेस शीट मास्कचं वैशिष्ट्य असलं तरी त्याचा परिणाम तात्कालिक राहात नाही. या फेस शीट मास्कद्वारे त्वचेचं पोषण होतं. चेहेरा चमकदार होतो.चेहेऱ्यावरचा थकवा दूर होतो. त्वचा खोलवर जावून स्वच्छ करण्याची क्षमता या फेस शीट मास्क मधे असते.

प्रचंड धावपळीच्या काळात स्वत:साठी थांबायला कोणालाच वेळ नाही. सगळं एकदम पटकन व्हायला हवं अशी अपेक्षा असते. काही केलं की त्याचे परिणामही इन्स्टंटच हवे असतात. त्वचेच्या बाबतही असंच होतं. त्वचा ही पटकन उजळेल , चमकेल असं काय आहे, हे शोधण्याचा प्रत्येकीचा अट्टाहास असतो. अशा गडबडीत खरंतर अनेकदा नुकसान होतं. पण मुळात घाई आणि जलद परिणामांची अपेक्षा हे गणित साधणारं योग्य उत्पादन मिळालं तर मात्र फायदा होतो. आणि  'अरे ही एवढी सोपी गोष्ट आहे' याची जाणीव होऊन दिलासा मिळतो. फेस शीट मास्क हे सौंदर्य उत्पादन यातलाच एक भाग.

त्वचा तरुण आणि चमकदार दिसण्यासाठी महिलांमधे फेस शीट मास्कचा उपयोग वाढला आहे. हे फेस शीट मास्क चेहेऱ्याच्या आकाराचं असतं. या मास्कला सीरम असतं. हे शीट मास्क जेव्हा आपण चेहेऱ्याला लावतो तेव्हा ते सीरमही लागतं आणि त्याचा परिणाम होऊन चेहेऱ्याची त्वचा मऊ आणि चमकदार होते. फेस शीट मास्क हा ब्यूटी ट्रेण्ड कोरिया देशातून आला आहे. पण आज जगभरातील महिला या फेस शीट मास्कचा उपयोग करत आहे. आपल्याकडेही फेस शीट मास्क हे सौंदर्य उत्पादन लोकप्रिय होऊ लागलं आहे. अभिनेत्री दीपिका पदूकोण , आलिया भट अशा अनेकजणींच्या माध्यमातून हा ट्रेण्ड आपल्याकडे सामान्या महिला आणि तरुणींमधेही रुळू लागला आहे. हा फेस शीट मास्क एकाच प्रकारच नसतो. त्वचेचे जसे कोरडी, तेलकट, मिश्र, संवेदनशील असे प्रकार असतात त्यानुसार हे फेस शीट मास्क बाजारात मिळतात. आपली त्वचा कोणत्या प्रकारची आहे , हे ओळखून त्यानुसार योग्य ते फेस शीट मास्क स्वत:साठी निवडणं गरजेचं असतं.

फेस शीट मास्क आपल्या चेहेऱ्याला कमी वेळात चमकदार आणि उजळ बनवतो. हे फेस शीट मास्क चेहेऱ्या च्या आकाराचं बनवलेलं असतं. डोळे, नाक, ओठ यानूसार ते कापलेलं असतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या फेस शीट मास्कला सीरम लावलेलं असतं. आणि म्हणूनच फेस शीट मास्क काढल्यानंतर चेहेरा धुण्याची गरज पडत नाही. शीट काढल्यानंतर चेहेऱ्याला लागलेल्या सीरमद्वारे मसज करायचा असतो. हे फेस शीट मास्क वापरल्यानं त्वचा ओलसर होते परिणामी ती चमकायला लागते.

तात्काळ फायदा हा फेस शीट मास्कचं वैशिष्ट्य असलं तरी त्याचा परिणाम तात्कालिक राहात नाही. या फेस शीट मास्कद्वारे त्वचेचं पोषण होतं. चेहेरा चमकदार होतो. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे चेहेऱ्यावरचा थकवा दूर होतो. त्वचा खोलवर जावून स्वच्छ करण्याची क्षमता या फेस शीट मास्क मधे असते. इतर प्रकारच्या फेशिअल मास्क शीटच्या तूलनेत फेस शीट मास्क चा उपयोग जास्त परिणामकारक असतो. हे फेस शीट मास्क वापरण्यास अत्यंत सोपा असतो हे खरं फक्त आपल्या त्वचेचा प्रकार बघून फेस शीट मास्क निवडायला हवं.
तेलकट त्वचेसाठी
तेलकट त्वचेसाठी क्ले शीट मास्क मिळतं. तसेच चारकोल शीट मास्कचा वापरही करता येतो. चारकोल मास्कमधे त्वचा डिटॉक्स करणारे अ‍ॅक्टिवेटेड चारकोल असतात. या घटकाचा तेलकट त्वचेसाठी खूप उपयोग होतो. तर क्ले मास्क चेहेऱ्याच्या त्वचेवर जमा झालेली घाण स्वच्छ करतो. चेहेऱ्याच्या टी झोनवर निर्माण होणारं तेल या फेस शीट मास्कमुळे जातं.


कोरड्या त्वचेसाठी
क्रीम शीट मास्क हे कोरड्या त्वचेसाठी उपयुक्त आहे. या मास्कमधे असलेलं क्रीम त्वचेला ओलसर ठेवतं. कोरड्या त्वचेला मॉश्चराइज करण्यासाठी क्रीम शीट मास्क उत्तम मानलं जातं. या शीट मास्कमधे एसेंन्शिअल ऑइल आणि नॅचरल बटर असतं त्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार होते.
मुरुम पुटकुळ्या येणाऱ्या त्वचेसाठी
ज्यांच्या चेहेऱ्यावर सतत मुरुम पुटकुळ्या येतात ते कोणतंही सौंदर्य उत्पादन वापरण्यास घाबरतात. पण फेस शीट मास्कमधे मुरुम पुटकुळ्या येणाऱ्या त्वचेसाठी पील ऑफ शीट मास्क उपलब्ध आहे. चेहेऱ्यावर ब्लॅक हेडस असतील तर ते घालवण्यासाठी ब्लॅक हेड पील ऑफ मास्क असतं. हे मास्क त्वचेची रंध्र स्वच्छ करतं. तसेच चेहेऱ्यावरची मृत त्वचा , धूळ स्वच्छ करण्यास मदत करतं.
संवेदनशील त्वचेसाठी
संवेदनशील त्वचेसाठी जेलयूक्त शीट मास्क वापरायला हवं. हे शीट संवेदनशील त्वचेचा विचार करता अगदी हलकं असतं संवेदनशील त्वचेत हे सहजपणे शोषलं जातं. या शीट मास्कमधे काकडी, ग्रीन टी, पूदिना या त्वचा स्नेही घटकांचा उपयोग केलेला असतो. त्यामुळे त्वचा ओलसर राहायला मदत होते.


शीट मास्क कसं वापरतात?
निस्तेज, उदास, थकलेल्या चेहेऱ्यावर चमक आणण्यासाठी फेस शीट मास्क वापरावं. चेहेऱ्यास शीट मास्क लावण्याआधी चेहेरा फेस वॉशनं स्वच्छ धुवावा. मास्क काढून ते चेहे ऱ्यावर हलक्या हातानं दाबत लावावं, हे शीट मास्क लावताना फुगवटे निर्माण व्हायला नकोत. पंधरा वीस मिनिटं हे शीट मास्क चेहेऱ्यावर ठेवावं. शीट काढून टाकल्यानंतर चेहेरा पाण्यानं धुण्याची गरज नसते. फेस शीट मास्कमधे जे सीरम असतं ते चेहेऱ्याला लागलेलं असतं. त्याच सीरमनं हलक्या हातानं चेहेऱ्याची मसाज करावी.

Web Title: Brings instant glow on tired face by Face sheet mask.. what is this mask exactly?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.