Join us  

सेक्सनंतर लघवी करताना प्रचंड आग होते? त्रासदायक वेदना टाळण्यासाठी काय करायचं?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 11:08 PM

सेक्सनंतर लघवी करताना अनेकींना प्रचंड आग होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते, मात्र तसे करणे तब्येतीला बरे नव्हे

शरीरसंबंध सुखावणारे असले तरी काहीजणींसाठी ते अतिशय वेदनादायीही असू शकतात. अनेक महिलांना शरीरसंबंधांनरत लघवी करताना जळजळ होते, आग होते. त्यामुळे त्यांचा सेक्समधला रस कमी होत जातो. या त्रासाला डिसुरिया म्हणतात. महिलांमध्ये हे सामान्य लक्षणांपैकी एक आहे. पुरूषांनाही या समस्येचा सामना करावा लागू शकतो. मूत्र मार्गाच्या संक्रमणामुळे हा त्रास वाढू शकतो. त्यामुळे सेक्सनंतर लघवीच्या जागी प्रचंड आग होत असेल तर त्या त्रासावर उपाय/उपचार करायला हवे. (Why Does Your Vagina Burn After You Have Sex?)

सेक्सनंतर लघवी करताना आग का होते?

लिव्ह हेल्दीच्या रिपोर्टनुसार लैंगिक संबंधादरम्यान गुप्तांगाच्या आसपास आग, जळजळ होत असेल तर तुम्ही वापरलेलं ल्युबरिकंट किंवा कंडोमची रिॲक्शन असू शकते किंवा तुमच्या योनीमध्ये पुरेसे नैसर्गिक ल्युबरिकंट्स तयार झाले नसतील तरी कोरडेपणामुळे त्वचेवर वेदना आणि आग होऊ शकते.

शरीर संबंधानंतर लघवी करताना वेदना जाणवल्यास  काही बाह्य कारणही असू शकतात. गुप्तांग, मूत्राशय, प्रोस्टेटच्या बदलांमुळे हे होऊ शकते. जर तुमची योनी ल्युबरिकेशनसाठी पुरेसा द्रव तयार करत नसेल, तर सेक्स वेदनादायक असू शकतो आणि तुम्हाला नंतर दुखू शकते. योनिमार्गात कोरडेपणा ही एक सामान्य समस्या आहे जी खालील कारणांमुळे होऊ शकते.

१) लैंगिक उत्तेजित नसणं, लैंगिक संबंधांबद्दल किंवा आपल्या जोडीदारासोबतच्या नात्याबद्दल चिंता वाटणे

२) हार्मोनल बदल - रजोनिवृत्तीमुळे, जन्म देणे, स्तनपान करणे किंवा तुमचा गर्भपिशवी काढून टाकणे (हिस्टरेक्टॉमी)

गर्भनिरोधक गोळ्या किंवा अँटीडिप्रेसस यांसारखी औषधे घेणे, किंवा केमोथेरपीसारखे कर्करोगाचे उपचार घेणे, ज्याचा संप्रेरक पातळीवरही परिणाम होतो. प्रदीर्घ संभोगामुळे लिंग किंवा योनीभोवतीच्या त्वचेला इजा होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही लघवी करता तेव्हा वेदना होतात.

लेटेक्स कंडोम, किंवा गर्भनिरोधक फोम किंवा स्पंज वापरत असल्यास,  त्वचा या उत्पादनांमधील रसायनांवर प्रतिक्रिया देऊ शकते आणि संवेदनशील होऊ शकते किंवा ॲलर्जी होऊ शकते. त्यामुळे लघवी करताना वेदना जाणवतात. एक्झिमा, लाइकेन प्लॅनस, ज्यामुळे त्वचेवर सामान्यतः चमकदार, लाल किंवा जांभळी पुरळ उठते.

UTI (युरिनरी ट्रक इन्फेक्शन)

हेल्थ लाईनच्या रिपोर्टनुसार यूटीआय हे संभोगानंतर लघवी करताना जळजळ होण्याचे सर्वात सामान्य कारण आहे. जेव्हा बॅक्टेरिया  मूत्रमार्गात प्रवेश करतात आणि तुमच्या मूत्राशयात जातात तेव्हा हा संसर्ग होतो. असुरक्षित सेक्स केल्यानंतर हे उद्भवण्याची अधिक शक्यता असते.

STI (सेक्शुअली ट्रांस्मिटेड इन्फेक्शन)

संभोगानंतर वेदनादायक लघवी होत असल्यास, हे STI चे लक्षण असू शकते. हे असे संक्रमण आहेत जे असुरक्षित संभोग किंवा जननेंद्रियाच्या संपर्कातून होऊ शकते. संभोगानंतर वेदनादायक लघवी होणे हे सहसा गंभीर लक्षण नसते. पण तीव्रतेनं वेदना जाणवत असल्यास, ओटी पोटात दुखत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

यावर उपाय आहेत का?

लैंगिक संबंधानंतर योनीवरील त्वचेची आग कमी करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या. वापरत असलेल्या कंडोम किंवा ल्युब्रिकंट्सचा प्रकार बदलणं किंवा स्वच्छतेसह गुप्तांगांची काळजी घ्या.

टॅग्स :आरोग्यहेल्थ टिप्स