Lokmat Sakhi >Beauty > सुंदर, नाजूक निळ्याशार गोकर्णाच्या फुलांचा फेसमास्क ! स्किन इचिंगपासून पिंपल्सपर्यंत अनेक समस्यांवर उपयोगी...

सुंदर, नाजूक निळ्याशार गोकर्णाच्या फुलांचा फेसमास्क ! स्किन इचिंगपासून पिंपल्सपर्यंत अनेक समस्यांवर उपयोगी...

butterfly pea flower face mask at home : How to make blue pea flower face mask for pimples : facemask for skin itching & irritation problems : दिसायला निळी आणि सुंदर, नाजूक असलेली गोकर्णाची फुलं अनेक स्किन प्रॉब्लेम्ससाठी फायदेशीर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2024 01:25 PM2024-10-09T13:25:43+5:302024-10-09T13:40:43+5:30

butterfly pea flower face mask at home : How to make blue pea flower face mask for pimples : facemask for skin itching & irritation problems : दिसायला निळी आणि सुंदर, नाजूक असलेली गोकर्णाची फुलं अनेक स्किन प्रॉब्लेम्ससाठी फायदेशीर...

butterfly pea flower face mask at home How to make blue pea flower face mask for pimples facemask for skin itching & irritation problems | सुंदर, नाजूक निळ्याशार गोकर्णाच्या फुलांचा फेसमास्क ! स्किन इचिंगपासून पिंपल्सपर्यंत अनेक समस्यांवर उपयोगी...

सुंदर, नाजूक निळ्याशार गोकर्णाच्या फुलांचा फेसमास्क ! स्किन इचिंगपासून पिंपल्सपर्यंत अनेक समस्यांवर उपयोगी...

स्वतः सुंदर व आकर्षक दिसणारी फुलं देखील आपल्या सौंदर्यात अधिक भर पाडू शकतात. आजकाल आपण जे अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्स वापरतो त्यामध्ये या फुलांचा वापर केला जातो. गुलाब, चमेली, जास्वंद अशा अनेक फुलांचा वापर करून फेसमास्क, क्रिम्स, लोशन असे अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्स तयार केले जातात. उत्तम त्वचेसाठी या फुलाचा अत्यंत चांगला परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो. अनेक महागड्या स्किन केअर ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये या फुलांचा वापर केला असल्याने आपण असे ब्यूटी प्रॉडक्ट्स अगदी सर्रासपणे वापरतो. परंतु याच फुलांचा वापर करून आपण घरच्याघरी देखील स्किनसाठी झटपट तयार होणारा फेसमास्क तयार करु शकतो(Butterfly Pea Flower Face Mask).

निळ्या रंगाची ही गोकर्णाची फुले (Navratri 2024 Day 7 : Blue Facemask For Skin Itching & Irritation Problems) दिसायला अगदी मनमोहक असतात. आयुर्वेदामध्ये गोकर्णाच्या (Blue Butterfly Pea Flower Facemask) फुलाला विशेष महत्व आहे. या फुलांचा वापर आरोग्यासोबतच त्वचेसाठी सुद्धा केला जातो. या फुलांचा वापर करून आपण स्किन आणि केसांसाठी हेल्दी मास्क तयार करू शकतो. दिसायला निळी आणि सुंदर, नाजूक  असलेली ही फुले आपल्या स्किनसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. अनेक स्किन प्रॉब्लेम्सवर हा गोकर्णाच्या (How to make blue pea flower face mask for pimples) फुलांपासून तयार झालेला फेसमास्क (butterfly pea flower face mask at home) लावून स्किन प्रॉब्लेम्स नैसर्गिकरित्या कमी करु शकतो. गोकर्णाच्या फुलांचा वापर करून घरगुती फेसमास्क कसा तयार करायचा ते पाहूयात(facemask for skin itching & irritation problems).   

साहित्य :- 

१. गोकर्णाची फुलं - ३ ते ४ फुलं 
२. पाणी - १ कप 
३. तांदुळाचे पीठ - १ ते २ टेबलस्पून 

फेसमास्क कसा तयार करायचा ? 

एका भांड्यात कपभर पाणी घेऊन त्यात गोकर्णाची फुलं घालून ते पाणी ५ ते १० मिनिटे उकळवून घ्यावे. पाणी उकळवून घेतल्यानंतर पाण्याला गोकर्णाच्या फुलांचा हलका निळा रंग आलेला दिसेल. आता हे गरम पाणी एका बाऊलमध्ये ओतून थोडे थंड करून घ्यावे. त्यानंतर हे पाणी गाळणीने गाळून घ्यावे. आता या पाण्यात तांदुळाचे पीठ घालावे. त्यानंतर हे दोन्ही जिन्नस व्यवस्थित चमच्याच्या मदतीने हलवून एकजीव करुन घ्यावे. आपला फेसमास्क स्किनवर लावण्यासाठी तयार आहे. 

चेहरा सतत ड्राय-कोरडा दिसतो? क्रिती सेनॉन सांगते या खास'पांढऱ्या' फेसमास्कची कमाल-चेहरा चमकतो सतत...


नखांवरचं नेलपेंट झटपट काढायचंय, ही पाहा अफलातून ट्रिक- नेलपेंट काढा कापूसही न वापरता...

फेसमास्क कसा वापरावा ? 

हा तयार केलेला निळ्या रंगाचा फेसमास्क आपल्या चेहऱ्यावर ब्रशच्या मदतीने लावून घ्यावा. त्यानंतर १५ मिनिटे किंवा हा फेसमास्क संपूर्णपणे सुकेपर्यंत स्किनवर लावून ठेवावा. १५ ते २० मिनिटानंतर आपल्या हातांनी स्किनला मसाज करुन घ्यावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा.  

अथिया शेट्टी स्किन टाईटनिंगसाठी वापरते हा राखाडी फेसमास्क! ऐन तारुण्यात त्वचेवर सुरकुत्या येणार नाहीत...

हा फेसमास्क वापरल्याने नेमके कोणते फायदे मिळतात ? 

१. तांदुळाचे पीठ :- तांदुळाचे पीठ चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी मदत करतात. तांदुळाचे पीठ आपल्या स्किनवर एखाद्या उत्तम एक्सफोलिएटर प्रमाणे काम करते. याचबरोबर त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्यासाठीही फायदेशीर ठरते.  त्यामुळे त्वचा फ्रेश दिसण्यास मदत होते. 

२. गोकर्णाची फुलं :- गोकर्णाच्या फुलांमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, जस्त, लोह भरपूर प्रमाणात असते. या फुलांतील सगळे महत्वपूर्ण घटक आपल्या त्वचेला मिळतात. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या कमी होण्यास मदत मिळते. अनेक ब्यूटी उत्पादनांमध्ये गोकर्णाच्या फुलांचा रंगासाठी वापर केला जातो.

Web Title: butterfly pea flower face mask at home How to make blue pea flower face mask for pimples facemask for skin itching & irritation problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.