Lokmat Sakhi >Beauty > दिवाळीपर्यंत उजळेल रंग, त्वचा होईल सुंदर... फक्त ७ दिवस हा उपाय करा, दिवाळीत दिसाल फ्रेश 

दिवाळीपर्यंत उजळेल रंग, त्वचा होईल सुंदर... फक्त ७ दिवस हा उपाय करा, दिवाळीत दिसाल फ्रेश 

Skin Care Tips: शॉपिंग, घराची आवराआवरी या नादात स्वत:कडे लक्ष द्यायला विसरू नका. दिवाळीपर्यंत त्वचेची काळजी घ्यायची, तर हा एक मस्त उपाय करून बघा. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2022 12:12 PM2022-10-14T12:12:29+5:302022-10-14T12:13:43+5:30

Skin Care Tips: शॉपिंग, घराची आवराआवरी या नादात स्वत:कडे लक्ष द्यायला विसरू नका. दिवाळीपर्यंत त्वचेची काळजी घ्यायची, तर हा एक मस्त उपाय करून बघा. 

By Diwali, the complexion will be bright, the skin will be beautiful... Just do this remedy for 7 days, you will look fresh in DiwaliHome made cream for glowing, radiant and flawless skin, How to get fresh skin for Diwali? | दिवाळीपर्यंत उजळेल रंग, त्वचा होईल सुंदर... फक्त ७ दिवस हा उपाय करा, दिवाळीत दिसाल फ्रेश 

दिवाळीपर्यंत उजळेल रंग, त्वचा होईल सुंदर... फक्त ७ दिवस हा उपाय करा, दिवाळीत दिसाल फ्रेश 

Highlightsया क्रिममुळे डार्क सर्कल्स कमी होतात, टॅनिंग कमी होण्यास मदत होते, त्वचेचा पोत चांगला होऊन त्वचा चमकदार होते. 

दिवाळी आली की घरातल्या महिलांची एकच लगबग सुरू होते. सुरुवातीला काही दिवस घराची आवराआवरी आणि स्वच्छता, त्यानंतरचा दुसरा टप्पा म्हणजे मग घरातल्या सगळ्यांसाठी, घरासाठी आणि जवळच्या मंडळींसाठी गिफ्ट शॉपिंग आणि त्यानंतरचा तिसरा टप्पा म्हणजे मग फराळाची तयारी. या सगळ्या गोष्टी अगदी काळजीपुर्वक करताना स्वत:कडे लक्ष द्यायला काही ब्यूटी ट्रिटमेंट्स घ्यायला, मग वेळच उरत नाही. मग एरवी फ्रेश दिसणाऱ्या मैत्रिणी दिवाळीत मात्र पार कोमेजून गेलेल्या दिसतात. म्हणूनच दिवाळीची ही सगळी कामं तर कराच, पण हे एक होममेड क्रिम (home made cream for glowing skin) लावून बघा.

 

होममेड क्रिम लावण्याचे फायदे
- आपल्या घरात सहज उपलब्ध असणारे ४ ते ५ घटक वापरून हे क्रिम तयार करण्यात आले आहे. करायला अगदी सोपे आहे. 

करवा चौथनिमित्त मौनी रॉयने काढलेल्या मेहंदीचे फोटो झाले जबरदस्त व्हायरल, बघा कसं होतं खास डिझाईन

- शिवाय एकदा करून जर फ्रिजमध्ये ठेवले तर ७ ते ८ दिवस तुम्ही ते आरामात वापरू शकता. हा उपाय इन्स्टाग्रामच्या beautywithus2022 या पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

- या क्रिममुळे डार्क सर्कल्स कमी होतात, टॅनिंग कमी होण्यास मदत होते, त्वचेचा पोत चांगला होऊन त्वचा चमकदार होते. 

 

कसं तयार करायचं होम मेड क्रिम
साहित्य

२ टेबलस्पून तांदूळ

२ टेबलस्पून गुलाब जल

७ ते ८ केशराच्या काड्या

२ टेबलस्पून ॲलोव्हेरा जेल

४ ते ५ थेंब इसेंशियल ऑईल किंवा ग्लिसरीन

 

कृती
१. सगळ्यात आधी गुलाब पाण्यात तांदूळ भिजत घाला आणि ते रात्रभर तसेच भिजू द्या.

डायबिटीससोबतच कोलेस्टरॉलही नियंत्रणात ठेवतो 'या' भाजीचा रस, बघा तज्ज्ञ काय सांगतात...

२. दुसऱ्या दिवशी सकाळी हे मिश्रण मिक्सरमधून वाटून त्याची अगदी बारीक पेस्ट करा. ही पेस्ट गाळून घ्या. गाळून घेतलेले पाणी आपल्याला क्रिम तयार करण्यासाठी वापरायचे आहे.

३. आता या पाण्यात केसर, इसेंशियल ऑईल किंवा ग्लिसरीन, ॲलोव्हेरा जेल टाका. सगळे मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि काचेच्या बाटलीत भरून फ्रिजमध्ये ठेवून द्या. सकाळी आणि रात्री हे क्रिम लावा. 


 

Web Title: By Diwali, the complexion will be bright, the skin will be beautiful... Just do this remedy for 7 days, you will look fresh in DiwaliHome made cream for glowing, radiant and flawless skin, How to get fresh skin for Diwali?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.