Join us  

कोंड्याने जीव नको केला, केस बारीक कापणार? कोरफडीच्या गराचा करा १ उपाय, कोंडामुक्त केस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2024 3:14 PM

Can Aloe Vera Help in Getting Rid of Dandruff : कोरफड गर आणि लिंबू आहे ना घरात, मग कोंडामुक्त केसांसाठी करा सोपा उपाय

केसांमध्ये (Hair Care) झालेल्या कोंड्यामुळे आपली चिडचिड तर होतेच, शिवाय केसातून लवकर कोंडाही निघत नाही. केसातील कोंडा काढण्यासाठी आपण ब्यूटी पार्लरमध्ये जाऊन विविध हेअर ट्रिटमेण्ट घेतो. पण यामुळे केसातील कोंडा कमी होईलच असे नाही. कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी महागडे प्रॉडक्ट्सचा वापर करण्यापेक्षा, आपण काही नैसर्गिक उपायांची मदत घेऊ शकता.

केमिकल उत्पादनांमुळे बऱ्याचदा केसातील कोंडा कमी होण्याऐवजी वाढते. शिवाय विविध केसांच्या समस्याही निर्माण होतात. जर आपण केसांतील कोंड्यामुळे (Dandruff) त्रस्त असाल तर, एलोवेरा जेलचा वापर करून पाहा. एलोवेरा जेलचे अनेक फायदे आहेत (Hair Dandruff). त्यातील पौष्टीक घटकांमुळे केस आणि त्वचेला अधिक फायदा होतो. पण केसांसाठी एलोवेरा जेलचा वापर कसा करावा? यामुळे केसातील कोंडा खरंच कमी होतो का? पाहूयात(Can Aloe Vera Help in Getting Rid of Dandruff).

केसातील कोंडा काढण्यासाठी एलोवेरा जेलचा करा असा वापर

साहित्य

एलोवेरा जेल

लिंबाचा रस

खोबरेल तेल

नेहमीच्या खोबरेल तेलात घाला फक्त २ गोष्टी, केस गळणं कायमचं थांबेल; कोंडाही गायब

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये फ्रेश एलोवेरा जेल घ्या. त्यात अर्धा लिंबाचा रस, आणि खोबरे तेल मिक्स करून पेस्ट तयार करा. केस विंचरून घ्या. ब्रशने पेस्ट केस आणि स्काल्पवर लावा. अर्धा तासानंतर केस कोमट पाण्याने धुवा. आपण याचा वापर आठवड्यातून ३ वेळा करू शकता. यामुळे नक्कीच केसातील कोंडा दूर होईल. शिवाय केस सिल्की आणि मुलायम होतील.

केसांसाठी एलोवेरा जेलचा फायदा

एलोवेरा जेलमध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात. जे केसांच्या वाढीसाठी मदत करतात. केसांवर याचा वापर केल्याने केसांना पोषण मिळते. शिवाय या जेलमुळे रक्ताभिसरण वाढवण्यासाठी मदत होते. याचा वापर केल्याने टाळूवरील खाज आणि कोंडा यापासून सुटका मिळते.

लिंबू

लिंबू व्हिटॅमिन सीने समृध्द असते. केसांसाठी याचा वापर केल्याने टाळूवरील अनेक समस्या दूर होतात. त्यातील अँटीफंगल गुणधर्मामुळे स्काल्प इन्फेक्शनपासून सुटका होते.

पायांच्या नखांमध्ये जमा झाली बुरशी? नखं पिवळी-काळपट पडली? २ घरगुती उपाय; नखं होतील स्वच्छ

खोबरेल तेल

भारतात खोबरेल तेलाचा वापर फार पूर्वीपासून आपण करत आलो आहे. केस धुण्याच्या ४ तास आधी खोबरेल तेल लावल्याने खराब झालेले केस दुरुस्त होतात. खोबरेल तेलात अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि फॅटी अॅसिड्स असतात. ज्यामुळे स्काल्पमधील रक्त परिसंचरण सुधारते. शिवाय केसांच्या वाढीस मदत करते.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स