केस लांब आणि दाट कुणाला नकोत? केसांमुळे सौंदर्य असूनही खुलते (Curry leaves). पण केसांची आपण हवी तशी निगा राखत नाही. ज्यामुळे केसांचे प्रचंड नुकसान होते (Hair care Tips). केस गळतात, पांढरे होतात, स्काल्पवर कोंडा जमा होतो. ज्यामुळे केस निर्जीव दिसतात आणि गळतात. केसांच्या गळतीमुळे टक्कल पडेल की काय? अशी भीती मनात निर्माण होते.
केसांची निगा राखताना महिलावर्ग ब्यूटी उत्पादनांचा वापर करतात. पण त्यातील केमिकल रसायनमुळे केसांचे आणखीन नुकसान होते. पण आपण नैसर्गिक उपाय म्हणजेच कडीपत्त्यानेही केसांच्या समस्या सोडवू शकता. पण केसांसाठी कडीपत्त्याचा नेमका वापर कसा करावा? पाहा(Can Curry Leaves Help the Health of Your Hair?).
केसांसाठी कडीपत्त्याचे फायदे
केसांच्या वाढीसाठी आपण कडीपत्त्याचा वापर करू शकता. यात व्हिटामीन बी, व्हिटामीन सी, प्रोटीन आणि एंटीऑक्सिडेंट्स यांसारखी पोषक तत्व असतात. ज्यामुळे केसांना पौष्टीक गुणधर्म मिळतात, आणि केसांची योग्य वाढ होते.
गॅस लवकर संपतो? एकदा बर्नर 'या' पद्धतीने स्वच्छ करून पाहा; अगदी १० रुपयात बर्नर होईल क्लिन
केसांसाठी कडीपत्त्याचा वापर
सर्वात आधी एका बाऊलमध्ये कडीपत्ता घ्या. त्यात पाणी घालून कडीपत्ता स्वच्छ धुवून घ्या. नंतर मिक्सरच्या भांड्यात धुतलेला कडीपत्ता आणि थोडं पाणी घालून पेस्ट तयार करा. तयार पेस्टमध्ये २ व्हिटामीन - ई कॅप्स्युल घालून मिक्स करा. अशा प्रकारे आपलं कडीपत्त्याचं हेअर मास्क रेडी.
शिल्पा शेट्टीसारखी फिगर आणि फिटनेस पाहिजे? 'या' पिठाची खा भाकरी, पोट सपाट - त्वचाही चमकते..
हेअर मास्क लावण्याआधी केस विंचरुन घ्या. तयार पेस्ट स्काल्प आणि केसांना लावा. तासाभरानंतर केस शाम्पूने धुवून घ्या. आपण या हेअरमास्कचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता. कडीपत्त्यातील गुणधर्मांमुळे केसांची योग्य वाढ होईल.