केस गळती (Hair Fall) ही समस्या यूनिवर्सल प्रॉब्लम झाली आहे. प्रत्येक महिला केस गळतीपासून त्रस्त आहे. केस गळणे, केसात कोंडा, अकाली केस पांढरे होणे, केस पातळ यासह इत्यादी समस्या केसांची योग्य निगा न राखल्यामुळे निर्माण होते. अनेकदा केसांची बाहेरून निगा राखल्यानंतरही केस गळतात, असे का होते? याचा विचार आपण कधी केला आहे का?
शरीरात पौष्टीक घटकांच्या कमतरतेमुळेही केसांची गळती वाढते. काही लोकं महागड्या प्रॉडक्ट्सचा वापर करतात, तर काही केसांवर प्रयोग करतात. जर तरीही केस गळती थांबत नसेल तर, दह्यामध्ये एक पदार्थ मिसळून खा. दह्यामध्ये कोणता पदार्थ मिसळून खाल्ल्याने केसांना याचा फायदा होतो, याची माहिती आहारतज्ज्ञ लवलीन कौर यांनी दिली आहे(Can eating curd with flaxseed powder nourish your hair?).
चेहरा फक्त साबण आणि फेस वॉशने धुता? ४ घरगुती उपाय, चेहरा होईल स्वच्छ-तेजस्वी
दही आणि फ्लॅक्ससीड्समुळे केस गळती कमी होते?
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, 'दही आणि फ्लॅक्ससीड्सचे सेवन केल्याने केस गळण्याची समस्या दूर होऊ शकते. फ्लॅक्ससीड्समधून आपल्याला ओमेगा ३ फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात. तर दह्यामध्ये प्रथिने आणि प्रोबायोटिक्स असतात. दही आणि फ्लॅक्ससीड्स एकत्र करून खाल्ल्याने फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन शोषून घेण्यास मदत होते. जे आपल्या केसांच्या मुळांचे पोषण करतात. ज्यामुळे केस गळती थांबते.'
मेहेंदीत मिसळा स्वयंपाकघरातील २ गोष्टी, अकाली पांढरे झालेले केस, गळण्याची समस्या होईल गायब
केसांसाठी दही आणि फ्लॅक्ससीड्स खाण्याची योग्य पद्धत
सर्वप्रथम, पॅन गरम करण्यासाठी ठेवा, त्यात आळशीच्या बिया घालून भाजून घ्या. नंतर मिक्सरमध्ये भाजलेल्या बिया घालून त्याची पावडर तयार करा. आता एक कप दह्यात एक चमचा आळशीच्या बियांचे पावडर घालून मिक्स करा. अशा प्रकारे दह्याचे सेवन करा. आपण दररोज याचा आहारात समावेश करू शकता.