Lokmat Sakhi >Beauty > इमोशनल व्यक्तींच्या डोक्यात खूप कोंडा होतो! पाहा केसांत कोंडा होण्याची ५ मुख्य कारणं

इमोशनल व्यक्तींच्या डोक्यात खूप कोंडा होतो! पाहा केसांत कोंडा होण्याची ५ मुख्य कारणं

5 Main Reasons For Dandruff: काही व्यक्तींच्या डोक्यात सतत कोंडा का असतो, याविषयी आयुर्वेदतज्ज्ञांनी सांगितलेली ही माहिती एकदा बघाच... (Can extreme emotions cause Dandruff?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2024 03:21 PM2024-07-24T15:21:53+5:302024-07-25T16:19:34+5:30

5 Main Reasons For Dandruff: काही व्यक्तींच्या डोक्यात सतत कोंडा का असतो, याविषयी आयुर्वेदतज्ज्ञांनी सांगितलेली ही माहिती एकदा बघाच... (Can extreme emotions cause Dandruff?)

Can extreme emotions cause DANDRUFF?, 5 main reasons for dandruff, how to get rid of dandruff | इमोशनल व्यक्तींच्या डोक्यात खूप कोंडा होतो! पाहा केसांत कोंडा होण्याची ५ मुख्य कारणं

इमोशनल व्यक्तींच्या डोक्यात खूप कोंडा होतो! पाहा केसांत कोंडा होण्याची ५ मुख्य कारणं

Highlightsकेसांमधला कोंडा कमी करण्यासाठी ॲण्टी फंगल, ॲण्टी डॅन्ड्रफ शाम्पू वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पण हे शाम्पू जोपर्यंत आपण लावतो, तोपर्यंतच आपली डोक्याची त्वचा स्वच्छ राहते.

काही व्यक्ती अशा असतात की त्यांच्या डोक्यात नेहमीच खूप कोंडा असतो. काही उपचार केले की तो तेवढ्यापुरता कमी होतो, पण ते उपचार थांबवले की पुन्हा जशास तसाच वाढतो. त्यामुळे ते लोक अक्षरश: हैराण होतात. वैतागून जातात. तुमच्याही बाबतीत असंच असेल तर आता हा एक उपाय करून पाहा. डोक्यातला कोंडा तेव्हाच कमी होऊ शकतो, जेव्हा आपण कोंडा का होतो त्यामागची कारणं जाणून घेऊ आणि त्यावर उपाय करू (5 Main Reasons For Dandruff). आयुर्वेदतज्ज्ञांच्या मते इमोशनल व्यक्तींच्या डोक्यात नेहमीच खूप कोंडा असतो (how to get rid of dandruff). इमोशन्सचा आणि कोंड्याचा नेमका काय संबंध, कोंडा होण्याची इतर कारणं कोणती ते आता पाहूया... (Can extreme emotions cause Dandruff?)

 

डोक्यामध्ये कोंडा होण्याची ५ मुख्य कारणं

डोक्यामध्ये कोंडा होण्यासाठी कोणत्य गोष्टी मु्ख्यत: जबाबदार आहेत, याविषयीचा व्हिडिओ आयुर्वेद तज्ज्ञांनी chitchatrajlavi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की शरीरात असणाऱ्या वायू आणि कफ विकारांमुळे डोक्यांमध्ये कोंडा होतो. हे विकार कशामुळे वाढतात याची त्यांनी जी कारणं सांगितली आहेत ती पुढीलप्रमाणे...

पावसाळ्यात लाकडी फर्निचर, दरवाजे- खिडक्या फुगणार नाहीत, ३ उपाय करा- कुबट वासही जाईल

१. नेहमीच खूप थंड पाणी पिणे.

२. थंड पदार्थ खूप जास्त प्रमाणात खाणे.

३. हिरव्या पालेभाज्या खूप जास्त प्रमाणात खाणे

वयानुसार रात्री किती तासांची झोप गरजेची असते? मुलांनी किती तास झोपावं? बघा तज्ज्ञांचा सल्ला

४. वजन वाढणे

५. नेहमीच रडू दाबून ठेवण्याची सवय असणे किंवा खूप जास्त रडणे. या ५ कारणांमुळे शरीरात कफ आणि वायू विकार वाढतात आणि त्यामुळे काेंड्याची समस्या वाढते. 

 

केसांमधला कोंडा कमी करण्यासाठी उपाय

केसांमधला कोंडा कमी करण्यासाठी ॲण्टी फंगल, ॲण्टी डॅन्ड्रफ शाम्पू वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात. पण हे शाम्पू जोपर्यंत आपण लावतो, तोपर्यंतच आपली डोक्याची त्वचा स्वच्छ राहते. त्यानंतर पुन्हा केसांमध्ये कोंडा होतोच.

सैल झालेला कुर्ता काही सेकंदातच परफेक्ट फिटिंगचा करण्याची मस्त ट्रिक! सुई- दोऱ्याची गरजच नाही

त्यामुळेच आता आपल्याला कोंड्यावरचा कायमचा उपाय करायचा असेल तर कोंडा होण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या वरील पदार्थांचे सेवन कमी करणे तसेच भावना दाबून न ठेवणे, शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडू न देणे तसेच शरीरात कफ आणि वायू विकार होऊ नयेत यासाठी काळजी घेणे हे त्यावरचे उपाय आहेत. 

 

Web Title: Can extreme emotions cause DANDRUFF?, 5 main reasons for dandruff, how to get rid of dandruff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.