Lokmat Sakhi >Beauty > कोण म्हणतं सेंन्सिटिव्ह स्किन असेल तर हळद लावू नये? हळदीसारखे इफेक्टिव्ह काही नाही कारण...

कोण म्हणतं सेंन्सिटिव्ह स्किन असेल तर हळद लावू नये? हळदीसारखे इफेक्टिव्ह काही नाही कारण...

This Turmeric Face Mask Is Perfect For Sensitive Skin : सेन्सिटिव्ह स्किनसाठी हळद लावू नये असं अनेकजण सांगतात, मात्र ते खरं नाही कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2023 08:38 PM2023-07-20T20:38:43+5:302023-07-20T20:50:56+5:30

This Turmeric Face Mask Is Perfect For Sensitive Skin : सेन्सिटिव्ह स्किनसाठी हळद लावू नये असं अनेकजण सांगतात, मात्र ते खरं नाही कारण...

can we use turmeric on sensitive skin ? how to use it. | कोण म्हणतं सेंन्सिटिव्ह स्किन असेल तर हळद लावू नये? हळदीसारखे इफेक्टिव्ह काही नाही कारण...

कोण म्हणतं सेंन्सिटिव्ह स्किन असेल तर हळद लावू नये? हळदीसारखे इफेक्टिव्ह काही नाही कारण...

चमकदार व सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आयुर्वेदातील सर्वात उत्तम उपाय म्हणजे हळद. फार पूर्वीपासून हळद ही आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानली जाते. हळदीमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्मांचा साठा असतो, त्यामुळेच ऋतू कोणताही असला तरीही ब्युटी केअर प्रॉडक्टमध्ये हळदीचा वापर नियमित केला जातो. त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण घरगुती उपायांमध्ये हळदीपासून बनवलेले उबटन आणि फेसपॅक वापरतो. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल, अँटीऑक्सिडंट गुणधर्म आणि अनेक पोषक घटक असतात. त्वचेवर हळद लावल्याने पिंपल्स, डाग, टॅनिंग आणि काळी वर्तुळाची समस्या दूर होते. चेहऱ्यावर हळद लावल्याने त्वचेचा रंगही सुधारतो. अशी ही बहुगुणी हळद कितीही फायदेशीर असली तरीही सेंन्सेटिव्ह स्किन असणाऱ्यांनी हळद वापरावी की वापरु नये ? वापरायची असल्यास नेमकी कशी वापरावी असे अनेक प्रश्न सेंन्सेटिव्ह स्किन असणाऱ्यांना पडतात. 

सेंन्सेटिव्ह स्किन असलेल्या व्यक्ती चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे कॉस्मेटिक किंवा स्किन केअर उत्पादने वापरण्यास घाबरतात. त्वचेवर काही लावल्यानंतर जर  जळजळ होत असेल किंवा त्वचा लाल झाली असेल तर त्याला सेंन्सेटिव्ह स्किन म्हणतात. सेंन्सेटिव्ह स्किन असलेल्या व्यक्तींनी डॉक्टर किंवा तज्ज्ञांच्या  सल्ल्याशिवाय कोणत्याही प्रकारची स्किन केअर उत्पादने वापरणे टाळावे(can we use turmeric on sensitive skin ? how to use it).

सेंन्सेटिव्ह स्किन असलेल्यांनी हळदीचा वापर करावा का ?

साधारणतः चेहऱ्यावरील अनेक समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी हळदीचा वापर केला जातो. मुरुम, सुरकुत्या, पिगमेंटेशन, कोरडेपणा आणि खाज यासारख्या समस्या हळदीच्या वापराने दूर होतात. सेंन्सेटिव्ह स्किन असलेल्या लोकांची त्वचा अतिक्रियाशील असते आणि कोणतीही गोष्ट वापरताच अनेक समस्या उद्भवू लागतात. अशा परिस्थितीत संवेदनशील त्वचा असलेले लोक हळदीचा वापर टाळतात. NCBI वर प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांना हळदीचा वापर केल्याने खूप फायदा होतो. हळदीमध्ये असलेले गुणधर्म संवेदनशील त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात आणि चेहऱ्याची चमक वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे सेंन्सेटिव्ह स्किन असणाऱ्या व्यक्ती देखील आपल्या त्वचेच्या सौंदर्यासाठी हळदीचा वापर करु शकता. 

केस गळतीची समस्या कायमची संपवायची ? करा कढीपत्त्याच्या एक परफेक्ट उपाय...

क्रांती रेडकरच्या हायड्रा फेशियलची चर्चा, हे हायड्रा फेशियल नक्की असतं काय ?

सेंन्सेटिव्ह स्किनवर हळदीचा वापर कसा करावा ? 

सेंन्सेटिव्ह स्किनशीसंबंधित समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आपण अनेक प्रकारे चेहऱ्यावर हळदीचा वापर करू शकता. हळदीचा फेसपॅक चेहऱ्यावर वापरल्याने अनेक फायदे होतात, याशिवाय हळदीचा फेस मास्कही चेहऱ्यावर लावता येतो. हळदीचा फेसपॅक आपण घरी सहज बनवू शकता. यासाठी प्रथम एक ते दिड चमचा हळद घ्या आणि त्यात समान प्रमाणात एलोवेरा जेल मिसळा. ते चांगले एकजीव झाल्यानंतर त्यात गुलाब पाण्याचे काही थेंब घालावेत आणि हे सगळे मिश्रण एकजीव करुन घ्यावे. ही पेस्ट चेहरा आणि मानेभोवतीच्या त्वचेवर लावावी आणि १० ते १५ मिनिटे तसेच राहू द्यावे. यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. सेंन्सेटिव्ह स्किन असलेल्यांनी आठवड्यातून एक किंवा दोन वेळा हा उपाय केल्याने त्यांना चांगला फायदा होईल. 

चेहऱ्यावर करा बटाटा आइस क्यूबची जादू, चेहऱ्यावर येईल कधीही न आलेली सुंदर चमक...

जर आपल्याला एलोवेरा जेल किंवा गुलाब पाण्याची ऍलर्जी असल्यास ते वापरणे टाळावे. याशिवाय कोणत्याही प्रकारची स्किन केअर प्रॉडक्ट्स वापरल्यानंतर त्वचेवर जळजळ किंवा ऍलर्जीची चिन्हे दिसू लागल्यास सर्वप्रथम डॉक्टरांशी संपर्क साधावा. सेंन्सेटिव्ह स्किन असलेल्या लोकांनी चेहऱ्यावर जास्त कॉस्मेटिक किंवा स्किन केअर उत्पादने वापरू नयेत.

Web Title: can we use turmeric on sensitive skin ? how to use it.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.