केस गळण्यामागे अनेक कारणं असू शकतात (Hair care Tips). खराब जीवनशैली, अपुरी झोप किंवा केसांवर योग्य उत्पादनांचा वापर न करणे. यामुळेही केस खराब होऊ शकतात (Hair fall Remedy). केस अकाली पांढरे होणे, केस गळणे, केसात कोंडा या कारणांमुळे केस अधिक खराब होतात (Hair Growth). यावर उपाय म्हणून आपण काही घरगुती उपायांचा देखील वापर करून पाहू शकता (Aamla for Hairs).
काही नैसर्गिक गोष्टींचा वापर केल्याने केस लांब आणि दाट होतील. केसांवर आवळा आणि खोबरेल तेलाचा वापर केल्याने केसांच्या अनेक समस्या सुटू शकतात. पण केसांच्या उत्तम आरोग्यासाठी आवळा आणि खोबरेल तेलाचा वापर कसा करावा? यामुळे केसांना किती फायदा होतो?(Can You Use Amla Powder for Hair Health?).
केसांसाठी आवळा आणि खोबरेल तेलाचा वापर कसा करावा?
डार्क सर्कल्समुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी झाले? कॉफीत मिसळून '१' गोष्ट लावा; डोळे दिसतील सुंदर
लागणारं साहित्य
आवळा पावडर
खोबरेल तेल
केसांसाठी या पद्धतीने करा आवळा आणि खोबरेल तेलाचा वापर
एका वाटीमध्ये २ चमचे आवळा पावडर घ्या. त्यात ३ चमचे खोबरेल तेल घालून मिक्स करा. वाटी गॅसवर ठेवा. मध्यम आचेवर तेल गरम करा. लक्षात ठेवा की तेल जास्त गरम होऊ नये, ते थोडेसे गरम असावे जेणेकरून आवळ्याचे गुणधर्म तेलात चांगले मिसळतील.
लांब आणि दाट केस हवेत? जास्वंदाच्या फुलांचा करा 'असा' वापर; केसांची प्रत्येक समस्या होईल दूर
नंतर गॅस बंद करा. तेल थंड होण्यासाठी पंख्याखाली ठेवा. तेल थंड झाल्यानंतर बोटांच्या मदतीने टाळूवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते.
तेल केसांवर किमान १ तास ठेवा. शक्य असल्यास रात्रभर ठेवा. सकाळी केस शाम्पूने धुवा. आपण या तेलाचा वापर आठवड्यातून २ ते ३ वेळा करू शकता. यामुळे केसांना योग्य पोषण मिळेल.
केसांसाठी आवळ्याचे फायदे
आवळा व्हिटॅमिन सी आणि इतर अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध आहे, जे केसांची मुळे मजबूत करतात आणि त्यांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. नियमित वापर केल्याने केसांना नैसर्गिक चमक येते आणि ते निरोगी दिसतात.