तुमच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे निर्माण झाली आहेत का? (Dark Circle) डोळ्याखाली काळी वर्तुळं होणं ही एक कॉमन गोष्ट आहे. डोळ्याखाली डार्क सर्कल तयार झाल्यावर आपल्या चेहऱ्यावरची शोभाही कमी होते (Beauty Tips). डार्क सर्कल घालवण्यासाठी आपण बऱ्याचदा ब्यूटी ट्रिटमेण्ट घेतो. पण यात केमिकल रसायनचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे स्किन आणि डोळ्यांचेही नुकसान होऊ शकते.
जर आपल्याला ब्यूटी ट्रिटमेण्ट घ्यायची नसेल तर, घरगुती उपायही आपण करू शकता. यासाठी खोबरेल तेलाचा वापर करून पाहू शकता. खोबरेल तेलाचा वापर आपण केस आणि त्वचेसाठी करतो. यामुळे आपण अधिक सुंदर दिसतो. जर डोळ्यांखालची काळी वर्तुळं काढायची असतील तर, आपण खोबरेल तेलाचा वापर करून पाहू शकता(Can You Use Coconut Oil to Treat Dark Under-Eye Circles?).
डार्क सर्कल घालवण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर
डार्क सर्कल घालवण्यासाठी आपण खोबरेल तेलाचा वापर करू शकता. यासाठी आपण हलक्या हातांनी आपल्या डोळ्यांखाली खोबरेल तेल लावून काही वेळेसाठी मसाज करा. आठवड्यातून २ - ४ दिवस आपण खोबरेल तेलाचा वापर करून मसाज करू शकता. यामुळे काळी वर्तुळं गायब होतील.
दुधापेक्षा 'या' छोट्या दाण्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त; हाडंचं काय - केस, त्वचाही चमकेल
त्वचेवर खोबरेल तेलाचा परिणाम कसा होतो?
- खोबरेल तेलामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात. यामुळे काळ्या वर्तुळांची समस्या दूर होते. या तेलाने मसाज केल्याने, डोळ्यांखालील भागात रक्ताभिसरणही सुधारणा होते.
- खोबरेल तेलातील अँटिऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास आणि बारीक रेषा, सुरकुत्या कमी करण्यास मदत करू शकतात. खोबरेल तेलाचा नियमित वापर केल्याने त्वचा कायम फ्रेश आणि चमकते.