केसांना फाटे फुटणे हा त्रास काही नवा नाही. पण त्याच्यावर सध्या आलेला एक उपाय मात्र अतिशय वेगळा आणि खूपच चमत्कारिक आहे. केस कोरडे झाले की केसांची खालची टोके दुभंगतात. त्यालाच आपण स्प्लिट हेअर किंवा केसांना फाटे फुटणे, उंदरी लागणे असे म्हणतो. हिवाळ्यात त्वचा, केस कोरडे पडत असल्याने तर हा त्रास खूपच वाढतो (Candle Burning Hair Treatment For Split Hair). आता केसांना अशा प्रकारचे फाटे फुटले असतील तर काय उपाय करावा याचा 'Candle Burning Hair treatment' हा भन्नाट नवा ट्रेंड एकदा बघायलाच हवा..(viral trend of Candle Burning Hair treatment)
कॅन्डल स्प्लिट हेअर ट्रीटमेंट म्हणून हा ट्रेंड जगभर गाजतो आहे. साऊथ अमेरिकेपासून याची सुरुवात झाली. साधारणपणे केसांना जेव्हा फाटे फुटतात तेव्हा ते कापून टाकावेत, असा सल्ला सौंदर्यतज्ज्ञ देतात.
फक्त ५ रुपयांत चेहऱ्यावरचे वांगाचे डाग निघून जातील, १ साेपा उपाय- त्वचा दिसेल स्वच्छ, चमकदार
किंवा तुम्ही जर सतत ३ ते ४ महिन्यांनी केस नियमितपणे ट्रिम करत राहिलात तर केसांना फाटे फुटत नाहीत. पण आता मात्र साऊथ अमेरिकेतले काही ब्युटीशियन फाटे फुटलेल्या केसांसाठी कॅण्डल बर्निंग हेअर ट्रीटमेंट सुचवत आहेत.
कशी असते कॅण्डल बर्निंग हेअर ट्रिटमेंट?
केसांवर हा उपचार करण्यासाठी तुमच्या केसांची एक बट घेतली जाते. हळूहळू त्या बटांना अगदी बारीक पीळ दिला जातो. जेव्हा चांगला पीळ बसतो तेव्हा केसांची जी टोके वर राहतात किंवा बाहेर आलेली दिसतात ती टोके मेणबत्तीने अलगदपणे जाळून टाकली जातात.
लोखंडी कढई, तवा खूपच काळा पडला? १ सोपा उपाय करा- लख्खं चमकतील काळे पडलेले भांडे
या ट्रीटमेंटचा फायदा एकच होतो की केसांची लांबी कमी होत नाही. ज्या मुली किंवा महिला केस छोटे होतील म्हणून ट्रिमिंग करायला नाही म्हणतात त्यांच्यासाठी हा उपचार खूपच फायदेशीर आहे. पण हा सौंदर्योपचार वारंवार करू नये आणि घरच्याघरी स्वत:च्या हाताने तर हा प्रयोग मुळीच करू नये. कोणतंही नुकसान न होता या उपचाराचा योग्य फायदा केसांना व्हावा असं वाटत असेल तर तज्ज्ञ ब्युटिशियनकडूनच हा उपाय करून घ्यावा.