Join us  

टाचांना भेगा? २ रुपयांची मेणबत्ती आणि चमचाभर मोहरी तेलाचा सोपा उपाय, दुखऱ्या टाचा होतील बऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2023 3:13 PM

Candle Wax For Cracked Heels : टाचांना पडलेल्या भेगा हा त्रास थंडीत वाढतो, करुन पाहा हा एक घरगुती उपाय

हिवाळा सुरु झाला की गुलाबी थंडी हवीहवीशी वाटते. पण थंडीमुळे होणारा त्रास आणि आजार नकोसे वाटतात. थंडीत ड्राय स्किन आणि हेअर फॉल ही समस्या सामान्य आहे. यासह टाचांना भेगा पडणे ही समस्या हमखास निर्माण होते. जेव्हा टाचांच्या सभोवतालची त्वचा जाड आणि कोरडी होते, यामुळे टाचांना तडे जाऊ लागतात. हिवाळ्यात हा त्रास आणखी वाढतो. मुख्य म्हणजे चालताना हा त्रास जास्त जाणवतो.

टाचांच्या भेगा दूर करणारे अनेक उत्पादने मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. पण बऱ्याचदा यांचा फायदा पायांना होत नाही. त्यामुळे घराच्या घरी काही उपाय करून पायांची काळजी घ्या. घरगुती उपायांनी पायांची नियमित कशी काळजी घ्यावी? नेमके काय उपाय करावेत? कोणत्या उपायांनी टाचांच्या भेगा बरे होतील? पाहूयात(Candle Wax For Cracked Heels).

हिवाळ्यात टाचांवर भेगा का पडतात?

कोरडेपणा: पायात कोरडेपणा वाढल्यामुळे आणि त्वचेत ओलावा नसल्यामुळे टाच फुटतात.

खोबरेल तेलात मिसळा ' ही ' खास पावडर, केस मुळापासून होतील काळे, पांढरे केस गायब

अनवाणी चालणे : जर आपण जास्त वेळ चप्पल आणि शूजशिवाय चालत असाल तर त्यामुळे टाचांना भेगा पडू शकतात.

पाण्याची कमतरता : कमी पाणी प्यायल्यास शरीरात कोरडेपणा वाढतो आणि टाचांना भेगा पडू लागतात.

टाचांना भेगा पडू नये म्हणून मेणबत्तीचा सोपा उपाय

पायाची त्वचा कोरडी होऊ नये म्हणून आपण मेणबत्तीचा वापर करू शकता. यासाठी एका वाटीत मेणबत्ती घ्या. मध्यम आचेवर वाटी ठेवा. यामुळे मेणबत्ती वितळेल. मेण वितळल्यानंतर त्यात २ मोठे चमचे मोहरीचे तेल घालून मिक्स करा. तेल चांगले मिसळल्यानंतर ते थंड होऊ द्या.

पाय स्वच्छ धुवून घ्या. नंतर भेगाळलेल्या टाचांवर हलक्या हाताने तेल लावा. नंतर काही मिनिटानंतर पाय स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. यामुळे काही दिवसात टाचांच्या भेगा पडण्याच्या समस्येपासून आराम मिळेल.

मेणबत्तीपासून तयार तेल लावताना घ्यावयाची काळजी

- झोपण्यापूर्वी तुमचे पाय चांगले धुवा आणि हळुवारपणे टाचांना तेल लावा. या तेलामुळे त्वचा एक्सफोलिएट होईल.

अर्धा बटाटा किसून त्यात मिसळा २ पिवळ्या गोष्टी, न्यू इयर पार्टीत चेहरा चमकेल

- २० मिनिटानंतर पाय पाण्याने धुवा. नंतर हवेत कोरडे होऊ द्या.

- नंतर टाचांवर क्रीमचा जाड थर लावा आणि गोलाकार फिरवून मसाज करा. नंतर सुती मोजे घाला. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी