Lokmat Sakhi >Beauty > १ चमचा किसलेले गाजर आणि खोबरेल तेल लावा रोज, लोक तुमचं वय ओळखूच शकणार नाहीत...

१ चमचा किसलेले गाजर आणि खोबरेल तेल लावा रोज, लोक तुमचं वय ओळखूच शकणार नाहीत...

Effective Carrot Oil For Anti-Ageing : The anti-aging properties of carrot oil : Carrot oil for a healthy skin : वाढत्या वयानुसार त्वचेवर येणाऱ्या एजिंगच्या खुणा, सुरकुत्या न लपवता कायमसाठी करा गायब....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2024 07:48 PM2024-09-24T19:48:14+5:302024-09-24T20:14:33+5:30

Effective Carrot Oil For Anti-Ageing : The anti-aging properties of carrot oil : Carrot oil for a healthy skin : वाढत्या वयानुसार त्वचेवर येणाऱ्या एजिंगच्या खुणा, सुरकुत्या न लपवता कायमसाठी करा गायब....

Carrot Oil For Fine Lines & Wrinkles Effective Carrot Oil For Anti-Ageing Carrot oil for a healthy skin | १ चमचा किसलेले गाजर आणि खोबरेल तेल लावा रोज, लोक तुमचं वय ओळखूच शकणार नाहीत...

१ चमचा किसलेले गाजर आणि खोबरेल तेल लावा रोज, लोक तुमचं वय ओळखूच शकणार नाहीत...

वय वाढत जातं तसं आपल्या चेहऱ्यावर त्याच्या खुणा दिसू लागतात. वाढत्या वयासोबतच त्वचेवरील बारीक रेषा, एजिंगच्या खुणा आणि सुरकुत्या यामुळे आपण  वयस्कर दिसू शकता. साधारणपणे या सुरकुत्या दूर करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर करतो, पण हे ब्यूटी प्रॉडक्ट्स  खूप महाग असतात आणि वारंवार त्याची गरज पडू शकते. अशा परिस्थितीत, आपल्या त्वचेची अधिक चांगली काळजी घेण्यासाठी आणि सुरकुत्या, एजिंगच्या खुणा कमी करण्यासाठी आपण आपल्या त्वचेची रोज काळजी घेणे आवश्यक असते( The anti-aging properties of carrot oil). 

अनेक महिला एक ठराविक वय झाल्यानंतर फेशियल, महागड्या क्रिम्स किंवा महागड्या ब्युटी ट्रीटमेंट्सने स्वत:ला सुंदर ठेवतात. अशा गोष्टींमुळे आपली  त्वचा निरोगी होऊ शकते, परंतु जास्त काळासाठी त्याचा परिणाम त्वचेवर राहात नाही. वय वाढत गेल्यावर त्वचेवर येणाऱ्या एजिंगच्या खुणा, सुरकुत्या, बारीक रेषा या न लपवता गाजराच्या तेलाचा एक सोपा आणि खास उपाय नक्की करुन पहा.  स्किन केअर रूटीन व्यतिरिक्त तुम्ही काही फेशिअल ऑईल्सचाही वापर करत त्वचेची काळजी घेऊ शकता. फेशिअल ऑईलमुळे आपल्या त्वचेची आर्द्रता वाढते व आपली त्वचा पुन्हा नव्यासारखी दिसू लागते. यासाठीच त्वचेवरील एजिंगच्या खुणा, सुरकुत्या, बारीक रेषा कमी करण्यासाठी गाजराच्या तेलाचा वापर कसा करावा ते पाहूयात(Carrot Oil For Fine Lines & Wrinkles).

१. गाजराचे तेल तयार करण्यासाठीचे साहित्य :- 

१. गाजर - १ (मध्यम आकाराचे)
२. खोबरेल तेल - ४ ते ५ टेबलस्पून 

चेहऱ्यावरचे पिंपल्स नखाने फोडताय? ही सवय सोडा नाहीतर चेहरा कायमचा होईल खराब कारण...


बॉलिवूड अभिनेत्रीही आता म्हणतात हेअर ट्रिटमेंट नको, नीता अंबानींचा हेअर स्टायलिस्ट सांगतो मुख्य कारण... 

२. गाजराचे तेल तयार करण्याची कृती :- 

१. सगळ्यांतआधी गाजर स्वच्छ धुवून पुसून घ्यावे. त्यानंतर गाजराची साल काढून घ्यावी. आता किसणीच्या मदतीने गाजर किसून घ्यावे. 
२. आता एका मोठ्या कढईमध्ये खोबरेल तेल घेऊन ते हलकेच गरम करुन घ्यावे. 
३. तेल गरम झाल्यानंतर त्यात किसलेले गाजर घालावे. खोबरेल तेलात किसलेले गाजर घातल्यानंतर ५ ते १० मिनिटांसाठी तेल मंद आचेवर गरम करून घ्यावे. 
४. आता तेल थोडे थंड होऊ द्यावे. तेल थंड झाल्यावर ते गाळून घ्यावे. असे गाळून घेतलेले तेल एका हवाबंद काचेच्या बाटलीत भरुन ठेवावे. 

अभिनेत्री रोशनी चोप्रा सांगते, चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी सिक्रेट ड्रिंकची रेसिपी, स्किनवर गुलाबी ग्लो कायम...

३. या तेलाचा वापर स्किनसाठी कसा करावा ? 

रोज रात्री झोपण्यापूर्वी थोडं तेल हातावर घ्या आणि त्याने चेहऱ्याला दिड ते दोन मिनिटे मसाज करा. मसाज केल्यानंतर सकाळी उठून चेहरा स्वच्छ धुवून घ्यावा. गाजराच्या तेलामध्ये बीटा-कॅरोटीनचा समावेश असतो. या घटकामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत मिळते. हे तेल चेहऱ्यावर लावल्यास पिगमेंटेशन एजिंगच्या खुणा आणि सुरकुत्यांची समस्या दूर होते.

Web Title: Carrot Oil For Fine Lines & Wrinkles Effective Carrot Oil For Anti-Ageing Carrot oil for a healthy skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.