केसांची निगा राखण्यासाठी आपण अनेक प्रकारचे प्रॉडक्ट्स वापरतो. बिघडलेल्या जीवनशैलीमुळे केसांची समस्या वाढते. केस गळती, केसात कोंडा, केस अकाली पांढरे होणे, या समस्यांमुळे लोकं हैराण झाले आहेत. काही लोकं महागडे प्रॉडक्ट्स तर काही विविध तेलांचा वापर करतात. पण प्रॉडक्ट्सपेक्षा नैसर्गिक उपायांचा केसांवर प्रभाव पडतो. खोबरेल तेलापासून ते एरंडेल तेलापर्यंत केसांवर अनेक प्रकारच्या तेलांचा वापर करण्यात येते. एरंडेल तेल अतिशय चिकट स्वरुपात असते. त्यामुळे बहुतांश जण हे तेल वापरणं टाळतात. पण या तेलामुळे केसांना अधिक प्रमाणात पोषण तत्वांचा पुरवठा होतो.
या तेलामध्ये रिकिनोलेइक अॅसिड असते. ज्यामुळे स्काल्पमधील ब्लड सर्क्युलेशन योग्यरित्या होते. एरंडेल तेलामध्ये अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी फंगल गुण आहेत. यामुळे निर्जीव झालेल्या केसांचीही समस्या दूर होण्यास मदत मिळते. शिवाय कोंडा, टाळूला खाज सुटण्याची समस्या कमी होते. एरंडेल तेलाचे फायदे, व याचा वापर कसा करावा हे पाहूयात(Castor Oil—the Cure That Your Hair Will Love).
एरंडेल तेलाचे प्रकार
एरंडेल तेलाचे अनेक प्रकार आहेत. यामध्ये सेंद्रिय, हायड्रोजनेटेड आणि जमैकन यांचा समावेश आहे. ऑरगॅनिक एरंडेल तेल केस स्वच्छ करण्यासाठी वापरले जाते.
जमैकन एरंडेल तेलाचा वापर टाळूशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी केला जातो. हे तेल कोंडा दूर करते.
हायड्रोजनेटेड तेलाचा वापर केल्याने पातळ केस जाड होतात.
२ चमचे दह्यात मिसळा ४ गोष्टी, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो, मेकअपचीही गरज भासणार नाही
एरंडेल तेलाचे फायदे
एरंडेल तेलामध्ये व्हिटॅमिन ई आणि फॅटी ऍसिड आढळते. ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. जर तुमचे केस वाढत नसतील तर, आपण एरंडेल तेलाचा वापर करू शकता. या तेलामुळे केसांची मुळे मजबूत होतात.
कोंड्याची समस्या होईल कमी
एरंडेल तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे कोंडा आणि फ्लॅकी स्काल्पची समस्या दूर होते. एरंडेल तेलामध्ये खोबरेल तेल मिक्स करून लावल्यास कोंडा कमी होतो.
केस गळतीमुळे टक्कल पडण्याची भीती वाटते? नियमित खा ४ फळं, केस होतील लांब - होईल योग्य वाढ
पांढरे केस
सध्या प्रत्येक जण अकाली झालेल्या पांढऱ्या केसांमुळे त्रस्त आहे. बाजारात अनेक प्रकारचे डाय मिळतात. पण केमिकल डाय लावण्यापेक्षा एरंडेल तेलाने स्काल्पची मालिश करा. या उपायामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारेल. ज्यामुळे केस पांढरे होणार नाही.
एरंडेल तेलाचे तोटे
जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर, एरंडेल तेलाचा वापर टाळा.
एरंडेल तेल थेट केसांमध्ये वापरता येत नाही. हे नेहमी डायल्यूट केल्यानंतर वापरता येते.