काही अपवाद सोडले तर घरोघरी शनिवारी रात्री किंवा रविवारी सकाळी एक चित्र दिसून येतं. यामध्ये आई, आजी त्यांच्या स्वत:च्या डोक्याला तर तेल लावतातच, पण मुलांच्या डोक्याचीही तेल लावून चांगली मसाज करून देतात. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा अशाच पद्धतीने चंपी करून घरोघरी केस धुतले जातात. असं केल्याने केस चांगले वाढतात, केस गळणं कमी होतं असं आपल्याला सांगितलं जातं. पण खरंच तसं होतं का, तेल लावून चंपी केल्याने नेमका केसांमध्ये कोणता बदल होत जातो, याविषयी सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट अमित ठाकूर यांनी सोशल मिडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.(celebrity hair stylist Amit Kothari explains about oiling hair and its impact)
तेल लावून मसाज केल्याने केस गळणं थांबतं?
अमित ठाकूर यांनी इन्स्टाग्रामवर जी पोस्ट शेअर केली आहे यामध्ये ते सांगतात तेल लावून मालिश केल्याने केसांना निश्चितच फायदा होतो. विशेषत: केसांची लांबी आणि केसांची खालची टाेके तेल लावल्याने छान मॉईश्चराईज होतात.
कशाला महागडे फेसवॉश हवे? 'या' पद्धतीने चेहऱ्याला जायफळ लावा- पिंपल्स, वांगाचे डाग कमी होतील
त्यासोबतच केसांचं टेक्स्चर सुधारण्यासही मदत होते. केस मऊ होतात. पण असे सगळे फायदे असले तरीही तेल लावल्याने केस खूप छान वाढतात किंवा केस गळणं कमी होतं याबाबत मात्र त्यांना खात्री नाही. त्यांच्यामते केस गळणं कमी करण्यासाठी किंवा केस वाढावेत यासाठी फक्त तेल लावून उपयोग नसतो. त्याशिवाय इतरही काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं असते. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या ते पाहा..
केस गळण्यामागची कारणं
अमित ठाकूर म्हणतात की केस गळण्याचं प्रमाण वाढलं असेल किंवा केसांची वाढ होत नसेल तर त्यामागे तुमचा आहार कसा आहे हे एक कारण असू शकतं. तुमच्या आहारात केसांसाठी पोषक असणारे पदार्थ असतात का हे एकदा तपासून पाहा.
वजन वाढेल म्हणून कार्ब्स खाणं टाळता? तज्ज्ञ सांगतात कार्ब्समुळे नाही; 'या' गोष्टीमुळे वाढतं वजन
कारण केस गळण्याचं ते एक महत्त्वाचं कारण असू शकतं. त्याचबरोबर हार्मोन्सचे असंतुलन, आपली जीवनशैली आणि काही सवयी ही देखील केस गळण्याची कारणं असू शकतात. त्यामुळेच ते असा सल्ला देतात की जर तुमचेही केस खूप गळत असतील किंवा वाढत नसतील तर केवळ तेल लावण्यावर भर देऊ नका. वरील बाबीही एकदा तपासून घ्या आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपाय सुरू करा.