Lokmat Sakhi >Beauty > ब्यूटी क्रीम विकत घेताय, जाहिरातीला भुलू नका! तुमच्या ब्यूटी क्रीममधे हे 4 घटक नसतील तर दिसाल म्हातार्‍या

ब्यूटी क्रीम विकत घेताय, जाहिरातीला भुलू नका! तुमच्या ब्यूटी क्रीममधे हे 4 घटक नसतील तर दिसाल म्हातार्‍या

कोलॅजन आहे त्वचेसाठी महत्ताचा घटक. तो बाहेरुन मिळत नाही. पण तो नैसर्गिकपणे तयार होण्यासाठी बाहेरुन त्वचेच्या पेशींना प्रोत्साहन मिळणं आवश्यक आहे. त्यासाठी ब्यूटी क्रीम्स असतात उपयोगी. पण ब्यूटी क्रीम्स घेताना कोलॅजन निर्मितीला चालना देणारे घटक आहेत का ते आधी तपासा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 01:45 PM2021-09-10T13:45:55+5:302021-09-10T13:50:02+5:30

कोलॅजन आहे त्वचेसाठी महत्ताचा घटक. तो बाहेरुन मिळत नाही. पण तो नैसर्गिकपणे तयार होण्यासाठी बाहेरुन त्वचेच्या पेशींना प्रोत्साहन मिळणं आवश्यक आहे. त्यासाठी ब्यूटी क्रीम्स असतात उपयोगी. पण ब्यूटी क्रीम्स घेताना कोलॅजन निर्मितीला चालना देणारे घटक आहेत का ते आधी तपासा.

check these 4 ingredients while buying beauty cream, which boost your skin tissue to produce natural collagen | ब्यूटी क्रीम विकत घेताय, जाहिरातीला भुलू नका! तुमच्या ब्यूटी क्रीममधे हे 4 घटक नसतील तर दिसाल म्हातार्‍या

ब्यूटी क्रीम विकत घेताय, जाहिरातीला भुलू नका! तुमच्या ब्यूटी क्रीममधे हे 4 घटक नसतील तर दिसाल म्हातार्‍या

Highlightsसौंदर्यतज्ज्ञ म्हणतात की आपण जे ब्यूटी क्रीम्स घेतो ते या कोलॅजन निर्मितीस प्रोत्साहन देणारे असावे. त्वचेतील केवळ कोलॅजन वाढून चालत नाही. तर त्वचा नीट राहावी यासाठी हा स्तर एका नियंत्रित स्वरुपात राहाणं, त्यात अडथळे न येणं, हा स्तर खाली न घसरणं या गोष्टीही महत्त्वाच्या असतात. कोलॅजन निर्मितीला ब्यूटी क्रीम्समधील विशिष्ट घटकच प्रोत्साहन देतात असं नाही तर फळं आणि भाज्या या देखील त्यासाठी मदत करतात.

 आपल्या त्वचेचा पोत चांगला राहावा यासाठी कोलॅजन हा घटक अतिशय महत्त्वाचा असतो. या कोलॅजनमुळेच त्वचा तरुण राहाते, त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत. त्वचा लवचिक बनवण्यासाठी हाच घटक महत्त्वाचा असतो. अर्थात हा घटक त्वचेला बाहेरुन मिळत नाही तर त्वचेच्या पेशी हा घटक स्वत: निर्माण करतात. कोलॅजन हे एक प्रकारचं प्रथिनं असतं. जे त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं. या कोलॅजन निर्मितीचा स्तर खालावला किंवा त्यात अडथळे आले तर चेहेर्‍यावर सुरकुत्या पडून त्वचेचा पोत बिघडतो आणि त्वचा वया आधीच म्हातारी होते.

छायाचित्र- गुगल

सौंदर्यतज्ज्ञ म्हणतात की आपण जे ब्यूटी क्रीम्स घेतो ते या कोलॅजन निर्मितीस प्रोत्साहन देणारे असावे. पण ब्यूटी क्रीम्स घेताना आपल्या त्वचेद्वारे निर्माण होणार्‍या या घटकाची आपल्याला अजिबात माहिती नसते. त्यामुळे केवळ क्रीमचा ब्रॅण्ड आणि जाहिरात बघून किंवा क्रीमने केलेले दावे बघून क्रीम घेतली जाते. पण असं न करता क्रीमचे घटक तपासून बघणं आवश्यक आहे. क्रीममधले सर्व घटक हे कोलॅजन निर्मितीला चालना देतात असं नाही. पण म्हणूनच कोणते घटक कोलॅजन निर्मितीला चालना देतात हे माहिती असणंही आवश्यक आहे.

छायाचित्र- गुगल

क्रीममधे हवेत हे घटक

* त्वचेच्या पेशींना कोलॅजन निर्मितीस प्रोत्साहन मिळावं म्हणून फेरुलिक अँसिड, रेटिनॉइडस, क आणि ई जीवनसत्त्व महत्त्वाचं असतं. हे घटक आपल्या त्वचेत सहजपणे शोषले जातात. हे घटक चेहेर्‍यावरचे काळे डाग कमी करतात. त्वचेद्वारे हे घटक सहजपणे शोषले जातात, त्याचा उपयोग करुन पेशी त्वचेतील कोलॅजन निर्मितीची यंत्रणा सुधारण्यासाठी करतात त्याचा परिणाम म्हणजे त्वचेतील कोलॅजन वाढतं.
* त्वचेतील केवळ कोलॅजन वाढून चालत नाही. तर त्वचा नीट राहावी यासाठी हा स्तर एका नियंत्रित स्वरुपात राहाणं, त्यात अडथळे न येणं, हा स्तर खाली न घसरणं या गोष्टीही महत्त्वाच्या असतात. वर सांगितलेले क्रीममधील घटक कोलॅजन स्तर खाली जाऊ देत नाही. कोलॅजनची निर्मिती मंद होवू देत नाही. म्हणून आपण घेत असलेल्या ब्यूटी क्रीम्समधे फेरुलिक अँसिड, रेटिनॉइडस, क आणि ई जीवनसत्त्व आहे ना हे आधी तपासलं पाहिजे.

छायाचित्र- गुगल

फळं -भाज्या आणि कोलॅजन

ब्यूटी क्रीम्समधील फेरुलिक अँसिड, रेटिनॉइडस, क आणि ई जीवनसत्त्व हे घटक त्वचेला नैसर्गिक कोलॅजन निर्मितीला उत्तेजन देतात असं नाही तर केळी, पपई, संत्री, स्ट्रॉबेरीज, अननस भाज्यांमधे सिमला मिरची, कारलं, सॅलरी यासारख्या भाज्या कोलॅजन निर्मितीस चालना देतात. त्यामुळे आपल्या आहारात या फळांचा आणि भाज्यांचा अवश्य समावेश करावा.

Web Title: check these 4 ingredients while buying beauty cream, which boost your skin tissue to produce natural collagen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.