Join us  

फक्त १ टेबलस्पून चिया सीड्सचे करा केसांसाठी कंडिशनर- एका धुण्यात केस होतील सिल्की आणि चमकदार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2024 5:28 PM

Chia Seeds Hair Conditioner For Long Healthy Hair : How To Make Chia Seed Conditioner : HOW TO MAKE CHIA SEEDS HAIR GEL CONDITIONER AT HOME : केसांवर विकतचे केमिकल्सयुक्त कंडिशनर लावण्यापेक्षा चिया सीड्सचा एक जादुई उपाय.

केस धुतल्यानंतर शक्यतो केसांचा गुंता होतो काहीवेळा तर केस थोडे रुक्ष, खरखरीत होतात. अशावेळी केसांना मऊपणा यावा तसेच केस शायनी आणि मुलायम व्हावेत यासाठी कंडिशनरचा वापर केला जातो. केसांचे चांगले आरोग्य व सौंदर्यासाठी केसांना कंडिशनिंग करणे महत्वाचे असते. आजकाल केस धुतल्यानंतर केसांना कंडिशनिंग करणे महत्वाचे मानले जाऊन, कंडिशनरचा वापर केला जातो. केस मजबूत आणि चमकदार होण्यासाठी केसांना शाम्पूसोबत योग्य हेअर कंडिशनर लावण्याची तितकीच गरज असते(How To Make Chia Seed Conditioner).

केसांच्या अनेक कमी होऊन केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी आपण केसांना कंडिशनर लावतो. आपण केसांसाठी बाजारांत मिळणारे महागडे आणि केमिकल्सयुक्त कंडिशनर विकत घेतो. या विकत आणलेल्या कंडिशनरमध्ये (Chia Seeds Hair Conditioner For Long Healthy Hair) भरपूर प्रमाणात केमिकल्स असल्याने केसांच्या आरोग्यासाठी असे प्रॉडक्ट्स वापरणे खूपच घातक ठरते. या कंडिशनरमध्ये असणारे केमिकल्स केसांना रुक्ष आणि निर्जीव बनवतात. त्यामुळे काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करून आपण घरच्या घरीच कंडिशनर तयार करु शकतो(HOW TO MAKE CHIA SEEDS HAIR GEL CONDITIONER AT HOME)

जेल कंडिशनर तयार करण्यासाठी लागणारे साहित्य :- 

१. चिया सीड्स - २ टेबलस्पून २. पाणी - ३ ग्लास ३. एलोवेरा जेल - ३ टेबलस्पून ४. खोबरेल तेल - १ टेबलस्पून 

जेल कंडिशनर तयार करण्यासाठीचे कृती :- 

१. सर्वप्रथम, एक पॅन घ्या आणि त्यात पाणी आणि चिया सीड्स घाला आणि चांगले उकळवा.२. जेव्हा तुम्हाला वाटेल की पाणी थोडे आटून घट्ट झाले आहे आणि जेलसारखे टेक्श्चर आले आहे, तेव्हा गॅस बंद करा.३. यानंतर, चिया सीड्स असलेले पाणी गाळून घ्या आणि एका मोठ्या भांड्यात काढा.४. आता या पाण्यात कोरफडीचे जेल आणि खोबरेल तेल घालून चांगले मिक्स करा.

चिया सीड्सपासून जेल कंडिशनर वापरण्यासाठी तयार आहे. हे जेल कंडिशनर एका काचेच्या बाटलीत स्टोअर करुन ठेवावे. 

पापण्यांवर आर्टिफिशियल आयलॅशेज लावताना होते गडबड, सोप्या ६ स्टेप्स- डोळेही राहतील सुखरुप...

तुमच्या स्किन टाइपनुसार करा चेहऱ्यावर स्क्रबिंग, ‘इतक्या’ दिवसांनी केलं तरच मिळतील स्क्रबिंगचे फायदे-पाहा कसे...

हे होममेड चिया सीड्स जेल कंडिशनर वापरण्याचे फायदे...

१. चिया सीड्समध्ये त्यात ओमेगा-३ फॅटी ऍसिडस्, अँटिऑक्सिडंट्स आणि प्रोटिन्स भरपूर असतात. जे केसांना पोषण देते, त्यांना मजबूत बनवते आणि कोंडा होण्यापासून देखील संरक्षण करते. २. एलोवेरा जेलमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. स्कॅल्पला आलेली खाज कमी करण्यास आणि केसांच्या मुळांना मजबूत करण्यास मदत करतात. याशिवाय कोरफडीचे जेल केसांना पोषण देते आणि त्यांना चमकदार बनवते.३. खोबरेल तेल केसांना खोलवर पोषण देते आणि कोरडेपणापासून संरक्षण करते. हे केसांना चमकदार बनवते आणि त्यांना तुटण्यापासून बचाव करते. याव्यतिरिक्त, त्यात अँटी-फंगल गुणधर्म असतात, जे केसांतील कोंडा नियंत्रित करण्यास मदत करतात.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी