Lokmat Sakhi >Beauty > केसांना लवंगांचे पाणी लावण्याचे ३ फायदे, केसांना येईल चमक-केस गळणेही थांबेल लवकर

केसांना लवंगांचे पाणी लावण्याचे ३ फायदे, केसांना येईल चमक-केस गळणेही थांबेल लवकर

Clove Water For Hair: Benefits And Ways To Use It : लवंग बहूगुणी आहेतच, पण केसांसाठीही अत्यंत गुणकारी आहेत.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2023 08:42 PM2023-09-18T20:42:49+5:302023-09-18T20:44:01+5:30

Clove Water For Hair: Benefits And Ways To Use It : लवंग बहूगुणी आहेतच, पण केसांसाठीही अत्यंत गुणकारी आहेत.

Clove Water For Hair: Benefits And Ways To Use It | केसांना लवंगांचे पाणी लावण्याचे ३ फायदे, केसांना येईल चमक-केस गळणेही थांबेल लवकर

केसांना लवंगांचे पाणी लावण्याचे ३ फायदे, केसांना येईल चमक-केस गळणेही थांबेल लवकर

मसाल्यांमध्ये लवंग हे प्रत्येकाला ठाऊक आहे. पदार्थात लवंग घालताच, जेवणाची चव वाढते. छोटीशी लवंग चवीला खूप  स्ट्रँाग असते. लवंग खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पण आपल्याला केसांसाठी असणारे लवंगाचे फायदे ठाऊक आहे का? जर आपण केसांवर लवंगाचे पाणी लावले तर, निश्चित केसांचे अनेक समस्या सुटू शकतात.

लवंगाच्या पाण्याचा वापर केसांमध्ये केल्यास, स्काल्प फंगसपासून ते कमकुवत केसांपर्यंतच्या समस्या सहज दूर होऊ शकतात. यासंदर्भात, सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट आणि स्किन केअर एक्स्पर्ट रिया वशिष्ठ यांनी केसांवर लवंगाचे पाणी लावण्याचे फायदे शेअर केले आहे(Clove Water For Hair: Benefits And Ways To Use It).

हेअर ग्रोथ

अनेक कारणांमुळे केसांची वाढ खुंटते. केस जर अधिक कमकुवत झाले असतील तर, केसांवर लवंगाचे पाणी लावा. यामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटी-ऑक्सिडंट आढळतात, जे केसांच्या कूपांना मजबूत करतात. यामुळे केस गळती कमी होते, व केसांचे संपूर्ण आरोग्य राखण्यास मदत होते.

सणावाराच्या दिवसात कपाळावर टॅनिंग दिसतंय? २ चमचे बेसनाचा करा फेसपॅक, चेहऱ्यावर येईल नैसर्गिक ग्लो

कोंड्यापासून सुटका

लवंगामध्ये अँटीफंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. ज्यामुळे स्काल्पवरील फंगल इन्फेक्शन दूर होते. स्काल्पवर लवंगाचे पाणी लावल्यास स्काल्प क्लिन होते. लवंगाच्या पाण्यातील एस्ट्रिजेंट प्रॉपर्टीजमुळे स्काल्प हेल्दी राहते.

केसांवर येते शाईन

जर आपल्याला केसांची चमक केमिकल प्रॉडक्ट्समुळे हरवली असेल तर, लवंगाच्या पाण्याचा वापर करून पाहा. लवंगाच्या पाण्यात नैसर्गिक तेल असते, ज्यामुळे केस शाईन आणि सिल्की होतात.

कितीही तेल लावा-शाम्पू बदला केस गळणं थांबत नाही? डॉक्टर विचारतात, तुम्ही पाणी किती पिता..

केसांना लवंगाचे पाणी कसे लावायचे?

सर्वप्रथम, शाम्पू आणि कंडिशनरने केस चांगले धुवावेत. नंतर लवंगाचे पाणी केसांना लावा. थोड्या वेळानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे केस गळती, केसात कोंडा, स्काल्पवर खाज सुटण्याची समस्या सुटेल.

Web Title: Clove Water For Hair: Benefits And Ways To Use It

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.