नारळाच्या दुधाचा अनेक पदार्थांमध्ये समावेश केला जातो. पण नारळाचे दूध तुम्ही केसांनाही लावू शकता.(hair Growth tips) दूधात फॅट्स, प्रोटीन्स, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम यांसारखी पोषक तत्व असतात जी केसांच्या वाढीसाठी महत्वाचे असतात. (Coconut Milk) स्काल्पशी संबंधीत समस्यांमुळे केस डॅमेज होण्याचा धोका असतो. (Narlache dhoodh kesana kase lavave) नारळाचे दूध केसांना लावल्याने केसांवर चांगला परिणाम दिसून येतो. नारळाचे दूध तुम्ही केसांना वेगवेगळ्या प्रकारे लावू शकता. (How to use coconut milk on hairs)
नारळाचे दूध फ्रिजी केसांची समस्या दूर करण्यासाठी फायदेशीर मानले जाते. यामुळे केसांना चमक येते आणि केस स्मूद बनतात. हे केसांना नैसर्गिकरित्या कंडिशनिंग देते. जर तुमचे केस जास्त गुंता होत असतील शॅम्पूच्या वापरानंतर तुम्ही नारळाच्या दूधाचा कंडिशनरच्या स्वरूपात वापर करू शकता. (Coconut milk for hairs)
केस वाढवण्याासाठी नारळाचे दूध
नारळाचे ताजे दूध काढून तुम्ही केसांच्या मुळांना लावू शकता. यामुळे केसांची वाढ चांगली होण्यास मदत होईल. एक कॉटन बॉल दूधात बुडवून केसांच्या मुळांना लावू शकता. ५ ते १०मिनिटं हे दूध केसांच्या मुळांना लावून ठेवा नंतर शॉव्हर कॅपने झाका. अर्धा तास किंवा ४५ मिनिटांनी केसांवर लावून ठेवा. नंतर कोमट पाण्याने केस धुवा. नारळाच्या दुधाचे अनेक फायदे आहेत. याचा तुम्ही हेअर मास्कही बनवू शकता.
चेहऱ्यावर तेज नाही-डलनेस आला? संत्र्याचे साल 'या' पद्धतीने वापरा सॉफ्ट-ग्लोईंग दिसेल चेहरा
नारळाचे दूध आणि लिंबू
एक वाटी नारळाच्या दूधात लिंबाचा रस मिसळून तुम्ही केसांना लावू शकता. हे मिश्रण केसांना लावून ४५ ते ५५ मिनिटांसाठी ठेवा नंतर केस स्वच्छ धुवून घ्या. जर तुमचे केस खूपच तेलकट होत असतील तर हा उपाय तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरेल.
नारळाचे दूध आणि मध
हा हेअर मास्क बनवण्यासाठी सगळ्यात आधी ३ चमचे मध आणि ६ चमचे नारळाचे दूध मिसळा. ड्राय केसांना लावल्याने केसांना मॉईश्चर मिळेल. हे मिश्रण केसांवर अर्ध्या तासासाठी लावून ठेवा नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे ड्रायनेस कमी होईल आणि केस सुंदर दिसतील.