बिघडलेल्या जीवनशैलीमुळे केसांची निगा राखणं कठीण झालं असलं तरी, केसांची योग्य काळजी घ्यायलाच हवी. काही महिला केसांसाठी महागडे ट्रिटमेंटचा वापर करतात. तर काही नैसर्गिक उपायांना फॉलो करतात. केसांसाठी खोबरेल तेल बेस्ट मानले जाते. स्काल्पवर मसाज करण्यासाठी आपण खोबरेल तेलाचा वापर करतो. पण याव्यतिरिक्त आपण नारळाच्या दुधाचा देखील वापर करू शकता.
केसांना पोषण देण्यापासून ते केसांची समस्या सोडवण्यासाठी नारळाच्या दुधाचा फायदा केसांना होतो. केसांना खोलवर पोषण मिळावे म्हणून नारळाच्या दुधाचा वापर कसा करावा हे पाहूयात(Coconut Milk for Hair: Benefits, Side Effects, How to Use).
केसांच्या वाढीसाठी उपयुक्त
केसांच्या वाढीसाठी व्हिटॅमिन ई आणि काही अँटिऑक्सिडंट्स मदत करतात. व हेच घटक नारळाच्या दुधात आढळतात. यासाठी एका वाटीत नारळाचे दूध घ्या, त्यात एक चमचा एलोवेरा जेल मिक्स करा. तयार पेस्ट स्काल्पवर लावा. व थोड्या वेळानंतर केस धुवा. यामुळे स्काल्पवरील ब्लड सर्क्युलेशन सुधारेल. ज्यामुळे केसांची मुळं मजबूत होतील.
केसगळतीमुळे वैतागलात? आहारात करा ७ गोष्टींचा समावेश, केस गळणे थांबवा
कोरड्या केसांसाठी फायदेशीर
प्रदूषित हवामान, खराब पाणी यासह केसांची निगा न राखणे यामुळे केस कोरडे, निर्जीव दिसतात. अशावेळी केसांवर नारळाच्या दुधाचा वापर करा. केस जर फ्रिजी झाले असतील तर, केसांवर नारळाचे दूध लावा. यातील जैविक घटक फ्रिजी केसांना ओलावा देतात. यामुळे केसांना फाटे फुटणार नाही. व केसांना नैसर्गिक चमक मिळेल.
केस गळणे थांबेल
केस गळतीची समस्या वाढत चालली आहे. स्काल्पवर नारळाचे दूध लावून मसाज केल्याने, ब्लड सर्क्युलेशन सुधारते. ज्यामुळे केस गळती थांबते.
चेहऱ्यावर चमचाभर दुधाची साय लावा; दिसाल तरूण-सुंदर, मिळतील फायदेच फायदे
केसांसाठी नारळाचे दूध कसे तयार करायचे?
सर्वप्रथम, ओल्या नारळाचा किस तयार करा. नंतर किस पिळून त्यामधून दूध वेगळे करा. या दुधात आपण मध, एलोवेरा जेल, दही मिक्स करून केसांवर लावू शकता. यामुळे केसांच्या समस्या सुटतीलच. यासह हेअर ग्रोथसाठीही फायदेशीर ठरेल.