Lokmat Sakhi >Beauty > नेहमीच्याच खोबरेल तेलात मिसळा आजीबाईच्या बटव्यातील १ सिक्रेट पदार्थ, केसांच्या सौंदर्यात पडेल भर...

नेहमीच्याच खोबरेल तेलात मिसळा आजीबाईच्या बटव्यातील १ सिक्रेट पदार्थ, केसांच्या सौंदर्यात पडेल भर...

Try This Amla And Coconut Oil Hair Oil To Control Hair fall : केस मजबूत, घनदाट आणि चमकदार करण्यासाठी आवळा पावडर व खोबरेल तेलापासून बनलेले हेअर ऑइल वापरणे खूपच फायदेशीर आहे....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2023 08:03 PM2023-11-13T20:03:22+5:302023-11-13T20:15:45+5:30

Try This Amla And Coconut Oil Hair Oil To Control Hair fall : केस मजबूत, घनदाट आणि चमकदार करण्यासाठी आवळा पावडर व खोबरेल तेलापासून बनलेले हेअर ऑइल वापरणे खूपच फायदेशीर आहे....

Coconut Oil and Amla Powder For hair, Try This Amla And Coconut Oil Hair Oil To Control Hair fall | नेहमीच्याच खोबरेल तेलात मिसळा आजीबाईच्या बटव्यातील १ सिक्रेट पदार्थ, केसांच्या सौंदर्यात पडेल भर...

नेहमीच्याच खोबरेल तेलात मिसळा आजीबाईच्या बटव्यातील १ सिक्रेट पदार्थ, केसांच्या सौंदर्यात पडेल भर...

लांब, घनदाट, काळेभोर केस कुणाला आवडणार नाहीत. केस हा आपल्या सौंदर्यातील एक महत्त्वाचा घटक असतो. केस लांबसडक, दाट असावेत असे प्रत्येकीला वाटते. पण काही कारणांनी केस वाढत नसतील तर आपण कधी घरगुती तर कधी पार्लरमध्ये जाऊन काही ना काही उपाय करतो. पण त्याचाही म्हणावा तसा उपयोग होतोच असे नाही. याचबरोबर वाढते प्रदूषण, पौष्टीक खाण्याचा अभाव आणि योग्य काळजी न घेणे यांमुळे केसांशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. आजच्या काळात लहान वयातच केस गळणे, केस पांढरे होणे या समस्या कॉमन झाल्या आहेत. या समस्या (Can I mix amla powder with coconut oil for hair) टाळण्यासाठी आपण अनेक प्रकारच्या रसायनयुक्त उत्पादनांचा वापर करतो. केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर केल्याने केस खराब होण्याचा धोकाही असतो. केस निरोगी आणि मजबूत बनवण्यासाठी नैसर्गिक गोष्टींचा जेवढा वापर करु तेवढे ते केसांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम ठरते(Try This Amla And Coconut Oil Hair Oil To Control Hair fall).

पूर्वीच्या काळी केसांचे आरोग्य व सौंदर्य राखण्यासाठी आवळा, शिकेकाई, रिठा, कोरफड अशा विविध औषधी नैसर्गिक गोष्टींचा वापर केला जात असे. या नैसर्गिक गोष्टींचा वापर करून हेअर मास्क आणि हेअरपॅक घरी सहज तयार करू शकतो. केस मजबूत, जाड, घनदाट आणि चमकदार बनवण्यासाठी आवळ्याचा (Amla Coconut Hair Oil) वापर करणे खूपच फायदेशीर मानले जाते. केसांचे उत्तम आरोग्य व सौंदर्यासाठी आवळ्याचा वापर करून घरगुती हेअर ऑइल नेमके कसे बनवायचे ते पाहूयात. ज्यामुळे काही दिवसांत केस वाढायला तर मदत होईलच पण केस दाट होण्यासाठीही याचा नक्कीच फायदा होईल. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या पदार्थांपासून हा उपाय करता येत असल्याने त्यासाठी फार खर्चही येत नाही. पाहूया यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते आणि हा उपाय नेमका कसा करायचा(Coconut Oil and Amla Powder for Hair Regrowth).

तेल बनवण्यासाठी लागणारे साहित्य :- 

१. खोबरले तेल - ३ टेबलस्पून 
२. आवळा पावडर - २ टेबलस्पून 

मेहेंदी - केळी - लिंबाचा रस; केसांच्या अनेक समस्यांवर १ उपाय, सगळे महागडे उपचार होतील बंद...

वारंवार केसांना हेअर कलर करूनही केसांचा रंग फिकट होऊ नये म्हणून ७ चुका टाळा...

तेल बनवण्याची कृती :- 

१. एका मोठ्या भांड्यात खोबरेल तेल घेऊन ते व्यवस्थित गरम करुन घ्यावे. 
२. खोबरेल तेल व्यवस्थित गरम झाले की त्यात आवळा पावडर घालून चमच्याने ढवळत राहावे. 
३. हे तेल मंद आचेवर व्यवस्थित गरम करुन घ्यावे. 
४. गरम झाल्यावर गॅस बंद करून घ्यावा व तेल संपूर्णपणे थंड होऊ द्यावे. 
५. थंड झालेले हे तेल एका काचेच्या बाटलीत भरून ठेवावे. 

हे तेल केसांना कसे लावावे ? 

१. या तेलाचा वापर करताना थोडे थोडे तेल हातावर घेऊन ते केसांच्या मुळांशी लावून घ्यावेत. 
२. त्यानंतर संपूर्ण केसांना व केसांच्या टोकांना हे तेल लावून हलक्या हाताने मसाज करून घ्यावा. 
३. हे तेल स्कॅल्पवर देखील लावून हलक्या हाताने मसाज करून घ्यावा. 
४. हे तेल आपण केसांवर व स्कॅल्पवर लावून रात्रभर तसेच केसांवर ठेवू शकतो. 

हिवाळ्यात केसांना तेल लावल्याने खरंच सर्दी - खोकला होतो ? तज्ज्ञ सांगतात केसांना तेल लावण्याची योग्य पद्धत...

या तेलाचा वापर केल्याने केसांच्या अनेक समस्या दूर होऊन केसांचे सौंदर्य व केसांची वाढ यात अधिक भर पडलेली दिसून येते.

Web Title: Coconut Oil and Amla Powder For hair, Try This Amla And Coconut Oil Hair Oil To Control Hair fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.