Join us  

कंगवा फिरवताच फरशीवर केसच केस..खोबरेल तेलात मिसळा ५ रुपयाची १ गोष्ट, केस होतील घनदाट-सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2023 12:33 PM

coconut oil and vitamin e capsule for hair benefits : हिवाळा सुरु होताच हेअर फॉल सुरु होतोच, यावर महागडे ट्रिटमेंट घेण्यापेक्षा सोपा-स्वस्त उपाय करून पाहा; दिसेल फरक

हिवाळा सुरु झाल्यानंतर केसांची (Hair Problems) समस्या देखील वाढते. रुक्ष त्वचा, कोरडे केस यामुळे प्रत्येक जण त्रस्त आहे. मुख्य म्हणजे केस गळतीमुळे टक्कल पडेल की काय, अशी भीती निर्माण होते. केस सुंदर, काळेभोर, घनदाट कोणाला नकोय. पण बिघडलेली जीवनशैली यासह बदलत्या ऋतूमुळे केसांची समस्या वाढत जाते. अनेकांना केसांची निगा राखण्यास जमत नाही (Hair Fall). शिवाय केमिकल प्रॉडक्ट्समुळेही केस गळतीला सुरुवात होते.

अशा वेळी पार्लरमध्ये महागडे ट्रिटमेंट घेण्यापेक्षा आपण खोबरेल तेलात एक गोष्ट मिसळून केसांवर लावू शकता. सहसा प्रत्येक घरात खोबरेल तेल (Coconut Oil) असतेच. केसांची निगा राखण्यासाठी खोबरेल तेल आवश्यक. त्यातील गुणधर्म केसांसाठी फायदेशीर ठरते (Hair care Tips). पण त्यात आणखी एक वस्तू मिसळून केसांवर लावल्यास केसांना नक्कीच याचा फायदा होऊ शकतो(coconut oil and vitamin e capsule for hair benefits).

केस गळती होऊ नये म्हणून खोबरेल तेलात मिसळा एक खास गोष्ट

मेडिकल न्यूज टुडेच्या वेबसाईटनुसार, खोबरेल तेलात आपण व्हिटॅमिन ई कॅप्स्युल मिक्स करून लावू शकता. यात अँटिऑक्सिडंट असतात. ज्याचा फायदा त्वचा आणि केसांना देखील होतो. व्हिटॅमिन ई केस आणि त्वेच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. शिवाय याचा नियमित वापर केल्याने केस गळतीही थांबते.

चेहऱ्यावर खूप केस आहेत? करून पाहा ५ रुपयांच्या तुरटीचा १ सोपा उपाय, काही मिनिटांत त्वचा उजळेल

हेअर फॉलसाठी खास तेल करण्याची कृती

सर्वप्रथम, एका वाटीत आपल्या केसांच्या लांबीनुसार खोबरेल तेल घ्या. तेलाची वाटी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवा. खोबरेल तेल गरम झाल्यानंतर गॅस बंद करा. तेल कोमट झाल्यानंतर व्हिटॅमिन ई मधील तेल घालून मिक्स करा. हाताने किंवा चमच्याने दोन्ही तेल एकत्र मिक्स करा.

न्यू इअर पार्टीमध्ये चमकायचंय? कांद्याच्या रसात चमचाभर मिसळा ‘ही’ गोष्ट, चेहरा चमकेल

केसांवर तयार तेलाचा वापर कसा करावा?

सर्वप्रथम, केस विंचरून घ्या, बोटांवर तेल घ्या. केसांचा भांग तयार करा, व सुरुवातीला तेल मुळांवर लावा. नंतर हळहळू संपूर्ण तेल स्काल्पवर लावून मसाज करा. निदान १० ते १५ मिनिटं स्काल्पवर मसाज करा. यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारेल, शिवाय केसांची गळती थांबेल. अर्धा तास तेल केसांवर राहू द्या. नंतर शाम्पूने केस धुवून घ्या. आपण या तेलाचा वापर आठवड्यातून २ वेळा करू शकता. याच्या वापरामुळे केस गळती, केसात कोंडा, पांढऱ्या केसांची समस्या सुटेल.

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स