Join us

नारळाच्या तेलात मिसळा हा पदार्थ; टॅनिंग, डार्क स्पॉट्स- पिगमेंटेशनच्या समस्या होतील कमी, निस्तेज त्वचा होईल सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2025 13:30 IST

coconut oil benefits: skin care tips: dark spots issue: skin tanning problem: pigmentation problem in skin: skin rashes problem: home remedies for skin: how to glow skin: Beauty hacks: tips and tricks for skin care: नारळाच्या तेलाचा नियमितपणे वापर केल्याने त्वचेला फायदा होऊ शकतो.

सुंदर दिसणं कुणाला आवडतं नाही. आपल्यापैकी अनेकांना सुंदर दिसावं असं वाटतं परंतु प्रदूषण, धुळ आणि  चुकीच्या जीवनशैलीमुळे आपली त्वचा खराब होते. (coconut oil benefits) चेहऱ्याची कितीही काळजी घेतली तरी चेहऱ्यावर मुरुमे आणि पुरळे येऊ लागतात. उन्हामुळे चेहरा काळा पडू लागतो. अशावेळी चेहऱ्याची योग्य पद्धतीने काळजी घ्याला हवी. (skin care tips)

नारळाचे तेल चेहऱ्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.(dark spots issue) हे त्वचेचा पोत सुधारुन सुरकुत्या कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयुक्त आहे. नारळाच्या तेलात काही पदार्थ घालून आपण चेहऱ्यावरील डाग दूर करु शकतो. नारळाच्या तेलात फॅटी ॲसिड आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. जे त्वचेला खोलवर पोषण देण्यास मदत करते. (skin tanning problem) त्यामुळे कोरड्या त्वचेला मऊ आणि गुळगुळीत करते. तसेच यामध्ये लॉरिक ॲसिड आणि कॅप्रिक ॲसिड असते, जे बॅक्टेरिया आणि इतर संसर्गशी लढण्यास मदत करते. त्वचेवर मुरुमे, खाज सुटणे किंवा पुरळ येणे यासारख्या समस्या असतील तर नारळाच्या तेलाचा नियमितपणे वापर केल्याने त्वचेला फायदा होऊ शकतो. नारळाच्या तेलात कोणते पदार्थ मिसळायला हवे, जाणून घेऊया. 

तुरटी म्हणजे चेहऱ्यासाठी जादूई परीच! पिंपल्स-ॲक्ने-डाग-त्रास काहीही असो, ‘अशी’ लावा

1. कोरफड आणि नारळाचे तेल 

कोरफड आणि नारळाचे तेल हे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे त्वचेला हायड्रेट करून कोरडेपणा दूर करण्यास मदत करते. तसेच उन्हापासून त्वचेचे रक्षण करते. पुरळ आणि खाज येत असेल तर झोपण्यापूर्वी रोज नारळाचे तेल लावायला हवे. मुरुमे कमी करण्यासाठी कोरफड जेलमध्ये एक चमचा नारळ तेलात मिसळा. चेहऱ्यावर २० मिनिटे लावून धुवा. 

2. नारळाचे तेल आणि लिंबाचा रस  

जर आपल्या त्वचेवर डाग असतील किंवा त्वचेचा रंग सुधारायचा असेल तर लिंबू आणि नारळाच्या तेलाचे मिश्रण हा बेस्ट पर्याय आहे. हे टॅनिंग दूर करण्यास मदत करते. तसेच काळवडलेल्या त्वचेला पुन्हा नव्यासारखे करण्यास मदत करते. यासाठी एक चमचा खोबरेल तेलात काही थेंब लिंबाचा रस मिसळा आणि डाग असणाऱ्या भागावर लावा. १० ते १५ मिनिटांनी चेहरा धुवा. 

3. टॅनिंगपासून सुटका 

जर आपली त्वचा उन्हामुळे टॅन झाली असेल तर नारळाचे तेल उत्तम पर्याय आहे. हे त्वचेला थंड करते. सूर्याच्या हानिकारक अतिनील किरणांमुळे होणारे नुकसान कमी करते. आपल्या डोळ्याखाली काळी वर्तुळे किंवा डाग असतील तर नारळाच्या तेलाचा नियमितपणे वापर फायदेशीर ठरु शकतो. त्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वे त्वचा पुन्हा नव्याने तयार करण्यास आणि डाग कमी करण्यास मदत करतात. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी