Join us  

२ आठवड्यात लांबसडक होतील केस; फक्त नारळाच्या तेलात 'हा' पदार्थ मिसळून केसांना लावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2023 10:14 AM

Coconut Oil Can Help You Get Shiny, Healthy Hair : नारळाचं तेल आणि अंड्याचा हेअर मास्क बनवणं केसांसाठी फायदेशीर ठरते.

सध्याच्या स्थितीत चुकीची  जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी यामुळे लोक आरोग्य आणि तब्येतीकडे दुर्लक्ष करत आहेत. (Hair Care Tips)  रोज केस गळल्यानं केसांना टक्कल पडतं. ब्युटी एक्सपर्ट्स केसांना तेल लावण्याचा सल्ला देतात. पूर्वीच्या काळी महिला रोज केसांना तेल लावायच्या म्हणूनच त्यांचे केस दाट असायचे. केसांना तेल लावल्यानंतर धुतल्यानं केस मुलायम, मऊ राहतात. (How to get rid off frizzy hair home made hair mask for long and shiny hair)

नारळाच्या तेलाचा वापर त्वचा आणि केस दोन्हींसाठी केला जातो. नारळाच्या  तेलात फॅटी एसिड्स आणि मिनरल्स असतात ज्यामुळे केस मजबूत राहण्यास मदत होते. याव्यतिरिक्त नारळाच्या तेलात एंटी ऑक्सिडेंट्स आणि एंटी इंफ्लेमेटरी आणि एंटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात. ज्यामुळे केस गळण्याची समस्या टाळता येते. (How to make Coconut Oil at home for cooking)

जर तुमचे केस कोरडे झाले असतील  तर नारळाचं तेल फायदेशीर ठरू शकतं. फक्त तुम्हाला  योग्य पद्धतीनं त्याचा वापर करावा लागेल. नारळाच्या तेलापासून तयार झालेले २ हेअर मास्क फ्रिजी केसांची समस्या दूर करण्यास मदत करतात. स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून तुम्ही हा हेअर मास्क बनवू शकता.

नारळाचं तेल आणि मध

नारळाच्या तेलात अनेक औषधी गुणधर्म असतात. त्याचप्रमाणे मधातही एंटी फंगल आणि एंटी बॅक्टेरियअल गुण असतात.  ज्यामुळे फ्रिजी केसांची समस्या टाळता येते आणि स्काल्पला पोषण मिळण्यासही मदत होते. याशिवाय केसांमधिल कोंडासुद्धा कमी होतो.

नारळाचं तेल मधासह तुम्ही केसांना लावल्यास फायदेशीर ठरेल. एका वाटीत ४ ते ५ चमचे नारळाचे तेल घ्या. त्यात २ ते ३ चमचे मध घालून व्यवस्थित एकत्र करा.  आता ही पेस्ट केसांच्या मुळांना लावून जवळपास ३० मिनिटांनी तसेच सोडा. ३० मिनिटांनंतर केस माईल्ड शॅम्पूनं स्वच्छ धुवा.

नारळाचं तेल आणि अंडी

नारळाचं तेल आणि अंड्याचा हेअर मास्क बनवणं केसांसाठी फायदेशीर ठरते. अंड्यात अनेक पोषक तत्व असतात ज्यामुळे केस लांब-दाट होण्यास  मदत होते. केसांचं गळणं कमी करण्यासाठी अंड फायदेशीर ठरतं. यामुळे केसांचा फ्रिजीनेस कमी  होतो आणि केस कोरडे पडत नाहीत.

हा हेअर मास्क बनवण्यासाठी एका वाटीत ७ ते ८ चमचे नारळाचे तेल घ्या. त्यात एका अंड्याचा पांढरा भाग आणि २ चमचे मध घालून व्यवस्थित एकत्र करा. हा मास्क केसांना लावून २० मिनिटांसाठी तसाच ठेवा नंतर माईल्ड शॅम्पूनं केस स्वच्छ धुवा.

टॅग्स :फिटनेस टिप्सब्यूटी टिप्सकेसांची काळजी