Join us  

केस पांढरे झाले-डाय नकोच बाबा..! चमचाभर नारळ तेलात १ पदार्थ मिसळून लावा; काळे होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2024 6:35 PM

Coconut Oil For Black Hairs : मेंहेदी पांढरे केस काळे करण्याबरोबरच केसांना दाट आणि मुलायम बनवते.

वाढत्या वयात केस पांढरे होत जातात अनेक केमिकल्सयुक्त  हेअर डायचा वापर करूनही केसांचा हरवलेला रंग परत येत नाही. (Hair Care Tips) गरजेपेक्षा जास्त उन्हात राहणं, जेनेटिक्स, पोषणाची कमतरता यामुळे केस पांढरे होऊ लागतात. (Hair Fall Solution)  केस पांढरे झाल्यानंतर ते काळे करण्यासाठी वेगवेगळे उपाय करावे लागतात. (Premature Graying Hairs Solution)

घातक केमिकल्स लावण्यापेक्षा केसांसाठी चांगल्या उत्पादनांचा वापर केला तर केसांसाठी फायदेशीर ठरेल नारळाचे तेल केसांना लावूनही तुम्ही काळेभोर केस मिळवू शकता. या उपायांने तुम्ही काळेभोर केस मिळवू  शकता. (How to Stop Hair Fall)

 हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार नाराळाचे तेल केसांसाठी एका सुपरचार्ज कंडिशनरप्रमाणे काम करते.  यामुळे केसांना मॉईश्चर मिळते आणि केस नैसर्गिकरित्या शाईन करतात.  हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार नारळाचे तेल एक  उत्तम कंडिशनर आहे. ज्यामुळे एक्स्ट्रा मॉईस्चर कमी होते आणि केसांच्या समस्या उद्भवत नाहीत.

पांढऱ्या केसांसाठी नारळाचे तेल कसे फायदेशीर ठरते?

नारळाचे तेल आयुर्वेदीक तेलांपैकी एक आहे. या तेलाच्या वापराने केसांच्या मुळांपासून लांबीपर्यंत अनेक फायदे मिळतात. या तेलात अनेक प्रकारचे  एंटी ऑक्सिड्ंट्स असतात. नारळाचच्या तेलामुळे हानीकारक घटकांपासूही बचाव होतो आणि फ्रि रॅडिक्लसपासून बचाव होतो. 

रोज चालणं होतं तरी वजन घटत नाही? तज्ज्ञ सांगतात वॉकिंगची योग्य पद्धत, आठवड्याभरात व्हाल स्लिम

नारळाचे तेल आणि मेंहेदी

मेंहेदी पांढरे केस काळे करण्याबरोबरच केसांना दाट आणि मुलायम बनवते. मेंहेदीने डोक्याचे केस पांढरे होण्याऐवजी लाल होतात.  अशी समस्या तुम्हालाही उद्भवत असेल तर ३ चमचे नारळाच्या तेलात २ चमचे लिंबाचा रस मिळून पेस्ट तयार करा ही पेस्ट केसांना अगदी व्यवस्थित लावा त्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. ही पेस्ट केसांना नॅचरल हेअर डायप्रमाणे काम करेल.

दातांच्या मध्यभागी किड-वरून पिळवे झाले? किचनमधल्या ३ वस्तू लावा, किड निघेल-स्वच्छ होतील दात

नारळाचे तेल आणि आवळा

आवळा व्हिटामीन सी ने परिपूर्ण असतो. ज्यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. नारळाच्या तेलाबरोबर आवळा मिसळून केसांना लावल्याने केस काळे होतील. ३ चमचे नारळाच्या तेलात २ चमचे आवळ्याची पावडर मिसळून लावा आणि १ तास केसांवर लावू  ठेवा. आठवडयातून एकदा हा उपाय केल्यास केस काळे आणि दाट होतील. 

टॅग्स :हेल्थ टिप्सब्यूटी टिप्स