Join us  

पांढरे केस - हेअर फॉलही जास्त होतो? खोबरेल तेलात मिसळा २ गोष्टी; केस होतील दाट - दिसतील सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2024 2:09 PM

Coconut Oil For Grey Hair and Hairfall - Easy & Simple Recipe : पांढरे केस काळे करण्यासाठी खोबरेल तेलाचा 'असा' वापर करून पाहा..

वयानुसार केस पांढरे होणे सामान्य आहे (Hair care Tips). पण आजकल अकाली केस पांढरे होण्याच्या अनेक कारणं आहेत. यामागे प्रदूषण, खाण्याच्या सवयी, चुकीची जीवनशैली आणि रसायनयुक्त उत्पादने वापरल्याने केस पांढरे होतात (Hairfall). पांढरे केस काळे करण्यासाठी आपण विविध केमिकल उत्पादनांचा वापर करतो. हेअर डाय, मेहेंदीमध्ये केमिकल रसायने असतात. ज्यामुळे केस काळे तर होतात, पण केस भरपूर खराबही होतात.

जर आपल्याला पांढरे केस काळे करायचे असतील तर, केमिकल रसायनयुक्त उत्पादने वापरण्यापेक्षा घरगुती उपाय करून पाहा. यासाठी आपण खोबरेल तेलाचाही वापर करू शकता. खोबरेल तेल केस मजबूत करण्यासोबत काळेही करू शकतात. पण याचा वापर नेमका कसा करावा? पाहा(Coconut Oil For Grey Hair and Hairfall - Easy & Simple Recipe).

पांढरे केस काळे करण्यासाठी खोबरेल तेलात काय मिसळावे?

पांढरे केस काळे करण्यासाठी आपण खोबरेल तेलासोबत आवळा आणि कलौंजीचा वापर करू शकता. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे केस मजबूत आणि मुळांपासून काळे होण्यास मदत होते. तर कलौंजीमध्ये फॅटी ॲसिड, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे कोंडा दूर करतात. आणि पांढऱ्या केसांची समस्या दूर होते.

पांढऱ्या केसांवर खोबरेल तेलाचा वापर कसा करावा?

लागणारं साहित्य

खोबरेल तेल

आवळा पावडर

'ये दूरियां भी है जरूरी!’ नात्यात ब्रेक घेण्याचा तरुण जोडप्यांचा नवा ट्रेण्ड, कचाकचा भांडण्यापेक्षा..

कलौंजी

या पद्धतीने तयार करा तेल

सर्व प्रथम एका पॅनमध्ये खोबरेल तेल गरम करा. नंतर त्यात आवळा पावडर आणि कलौंजीच्या बिया घालून मिक्स करा. तेल गरम झाल्यानंतर एका हवाबंद डब्यात काढून घ्या, व १२ तास तसेच राहू द्या. नंतर तेल चहाच्या गाळणीने गाळून घ्या, व केसांवर या तेलाचा वापर करा.

ऐश्वर्या रायसारख्या दिसणाऱ्या बाहुलीची व्हायरल चर्चा, कुणाला आवडली तर कुणी म्हणे किती ते गचाळ काम..

अशा प्रकारे करा तेलाचा वापर

तयार तेल केसांवर आणि स्काल्पवर लावा. सुमारे १० मिनिटे बोटाने स्काल्पवर मसाज करा. रात्रभर केसांवर तसेच राहू द्या. सकाळी शाम्पूने केस धुवून घ्या. आठवड्यातून किमान दोनदा हे तेल लावल्याने केस हळूहळू काळे होऊ लागतात. तसेच केस गळण्याच्या समस्येपासूनही सुटका मिळू शकते. 

टॅग्स :केसांची काळजीब्यूटी टिप्स