Lokmat Sakhi >Beauty > खोबरेल तेलात २ चमचे घाला २ गोष्टी, केस गळणं होईल कमी-केसांना लागेल चांगली वाढ

खोबरेल तेलात २ चमचे घाला २ गोष्टी, केस गळणं होईल कमी-केसांना लागेल चांगली वाढ

Coconut oil for hair growth: Ways to use it for your tresses केसांना आपण खोबरेल तेल लावतोच, पण ते अधिक असरदार करण्यासाठी खास उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2023 04:35 PM2023-07-31T16:35:34+5:302023-07-31T16:36:24+5:30

Coconut oil for hair growth: Ways to use it for your tresses केसांना आपण खोबरेल तेल लावतोच, पण ते अधिक असरदार करण्यासाठी खास उपाय

Coconut oil for hair growth: Ways to use it for your tresses | खोबरेल तेलात २ चमचे घाला २ गोष्टी, केस गळणं होईल कमी-केसांना लागेल चांगली वाढ

खोबरेल तेलात २ चमचे घाला २ गोष्टी, केस गळणं होईल कमी-केसांना लागेल चांगली वाढ

आपले केस लांबसडक, सिल्की - शायनी, घनदाट असावेत, असं प्रत्येकाला वाटतं. पण कधी प्रदुषणामुळे तर कधी योग्य आहाराचे सेवन न केल्यामुळे केसांच्या निगडीत समस्या वाढतात. केसांची निगा राखण्यासाठी अनेक जण खोबरेल तेल लावण्याचा सल्ला देतात. प्रत्येकाच्या घरात खोबरेल तेल असतेच.

यातील अँटीफंगल, अँटीऑक्सिडेंट, अँटीबॅक्टेरियल गुणधर्म केसांच्या समस्या दूर करण्यास मदत करतात. परंतु, अनेकांना केसांना खोबरेल तेल लावण्याची योग्य पद्धत माहित नसते. जर आपल्या केसांची वाढ व्हावी, यासह केस गळती थांबावी असे वाटत असेल तर, या दोन पद्धतीने केसांना खोबरेल तेल लावा. यामुळे केस घनदाट होतील(Coconut oil for hair growth: Ways to use it for your tresses).

१ चमचा तांदूळ- १ वाटीभर पाणी, चेहऱ्यावरचे डाग - पिंपल्सचा त्रास कमी करणारा सोपा उपाय

हॉट कोकोनट ऑइल ट्रीटमेंट

यासाठी एका वाटीत आपल्या केसांच्या लांबीनुसार तेल घ्या. नंतर मायक्रोवेव्हमध्ये किंवा गॅस स्टोव्हवर तेल गरम करा. तेल जास्त गरम करू नये, कोमट ठेवा. त्यात काही थेंब एसेंशिअल ऑइलचे मिक्स करा. नंतर बोटांवर तेल घ्या, व या तेलाने स्काल्पवर मसाज करा. मालिश केल्याने स्काल्पमधील रक्ताभिसरण सुधारते. ज्यामुळे केसांची वाढ योग्यरित्या होते.

थंड की गरम कोणत्या पाण्याने केस धुतले तर केस गळणे थांबेल? केस धुण्याची योग्य पद्धत कोणती?

खोबरेल तेलात मिसळा कांद्याचा रस

एका वाटीत २ चमचे खोबरेल तेल घ्या, त्यात २ चमचे कांद्याचा रस मिक्स करा. व बोटांनी हे तयार तेल आपल्या स्काल्पवर लावून मसाज करा. नंतर केसांवर शॉवर कॅप लावा, ३० मिनिटानंतर केस शाम्पूने धुवा. आठवड्यातून २ वेळा आपण या तेलाचा वापर करू शकता. कांद्यामध्ये अँटी-बॅक्टेरिअल, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे केसांच्या वाढीस मदत करतात.

Web Title: Coconut oil for hair growth: Ways to use it for your tresses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.