कधी चेहऱ्यावर खूप डाग आले, फोड आले किंवा त्वचा कोरडी पडली, सुरकुतली किंवा ब्लॅक हेडस आणि व्हाईट हेडस आले म्हणून आपण आवर्जून पार्लरमध्ये जाऊन फेशियल करतो. प्रदूषण, ताण, आहारातून कमी प्रमाणात मिळणारे पोषण यांमुळे त्वचा खराब होते खरी. फेशियल करणे हा त्यावर एक चांगला मार्ग असतो (How To Facial at Home). यामध्ये केल्या जाणाऱ्या मसाजमुळे चेहऱ्याचा रक्तप्रवाह चांगला होतो आणि त्वचा ग्लो करते. पण फेशियल म्हटले की पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करणे. त्यातही इतके रुपये खर्च करुन आपण चेहऱ्यावर विविध प्रकारची केमिकल प्रॉडक्ट वापरतो. हे केमिकल आपल्याला सूट होतातच असे नाही. काहीवेळा केमिकल असलेले प्रॉडक्ट वापरल्याने त्वचा बेजान होते (Coconut Water facial at home) .
अशावेळी घरच्या घरी नैसर्गिक घटक वापरुन अवघ्या १०० रुपयांत आपण फेशियल करु शकलो तर? ज्यामुळे त्वचा तर खराब होणार नाहीच पण आपले भरपूर पैसेही वाचतील. आता इतक्या स्वस्तात फेशियल कसे होते असा प्रश्न आपल्याला पडला असेल तर या फेशियलसाठी आपण नारळ पाण्याचा उपयोग करणार आहोत. आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असणारे नारळपाणी त्वचा आणि केसांसाठीही तितकेच फायदेशीर असते. तसेच बाजारात सहज उपलब्ध होणारा घटक असल्याने सौंदर्य खुलण्यासाठी नारळपाण्याचा आवर्जून वापर करायला हवा. विशेष म्हणजे नैसर्गिक घटकांपासून हे फेशियल केल्याने त्याचे इफेक्टस जास्त काळ टिकून राहू शकतात. चला तर मग पाहूयात घरीच फक्त १०० रुपयांत फेशियल कसे करायचे.
सतत क्रीम किंवा फेसपॅक लावण्यापेक्षा नितळ त्वचेसाठी करा ३ सोपी आसनं, मेकअप न करता दिसा सुंदर
१. क्लिनींग
सगळ्या आधी नारळ पाण्याने चेहरा स्वच्छ धुवून घ्या. आपण चेहरा धुण्यासाठी साधे पाणी वापरतो. यावेळी आपण एखादे फेस वॉश वापरतो. पण नारळ पाण्यात मॉईश्चरायजिंग गुणधर्म असतात. त्यामुळे या पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचा मऊ होण्यास मदत होते. म्हणून पहिल्या टप्प्यातच नारळ पाणी वापरणे आवश्यक आहे. वाटीत नारळ पाणी घेऊन ते चेहऱ्यावर लावून ठेवा, ते चेहऱ्यात चांगले मुरू द्या आणि नंतर हलक्या हाताने चेहरा धुवा त्यामुळे चेहरा फ्रेश दिसायला मदत होईल.
२. टोनिंग
यानंतर चेहऱ्याचे टोनिंग करण्यासाठीही नारळ पाण्याचा उपयोग करणे आवश्यक आहे. यासाठी एका वाटीत एक चमचा नारळ पाणी आणि १ चमचा गुलाब पाणी घ्या. कापसाच्या बोळ्याने हे मिश्रण चेहऱ्यावर सगळीकडे लावा. चेहरा नैसर्गिकरित्या कोरडा होऊद्या. हे मिश्रण चेहऱ्यात चांगले मुरल्यास त्वचेची रंध्रे ओपन होण्यास मदत होईल.
३. स्क्रबिंग
कॉफी पावडर हा नैसर्गिक आणि अतिशय चांगला स्क्रब आहे. या पावडरमध्ये १ ते २ चमचे नारळ पाणी आणि १ चमचा कोरफडीचा जेल घालून हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. ५ ते १० मिनीटे हे वाळल्यावर हातावर नारळपाणी घेऊन चेहऱ्यावर ५ ते ७ मिनीटे हाताने गोलाकार स्क्रब करा आणि नंतर साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे चेहऱ्यावरची मृत त्वचा, ब्लॅक हेडस, व्हाईट हेडस निघून जाण्यास मदत होईल आणि चेहऱ्याची त्वचा मुलायम होईल.
४. मसाज
२ चमचे नारळ पाणी आणि २ चमचे कोरफडीचा गर घेऊन त्याने चेहऱ्याला चांगला मसाज करा. रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी चेहऱ्याला मसाज करणे आवश्यक असते. त्यामुळे चेहरा ग्लो करण्यास मदत होते. हे मिश्रण चेहऱ्यात चांगले मुरवा म्हणजे चेहऱ्याची चमक वाढण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होईल.
ओठ फुटणे -काळे पडणे यावर ४ सोपे उपाय, ओठ राहतील मऊ-मुलायम-गुलाबी!
५. फेसपॅक
सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे फेसपॅक. बाजारात मिळणारे पॅक लावण्यापेक्षा नॅचरल फेसपॅक केव्हाही चांगला. यासाठी बेसन पीठ, चिमूटभर हळद, मध आणि नारळ पाणी एकत्र करुन त्याचा पॅक चेहऱ्यावर एकसारखा लावा. १० ते १५ मिनीटांनी साध्या पाण्याने हा पॅक धुवून टाका.