Join us  

स्वस्तात मस्त फेशिअल फक्त 50 रुपयात.. घरच्याघरी करा नारळ पाण्याचं फेशिअल, मिळवा पार्लरसारखा ग्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 2:00 PM

त्वचा नैसर्गिकरित्या उजळ, स्वच्छ करण्यासाठी, त्वचा चमकण्यासाठी नारळ पाणी ( coconut water) पिण्यासोबतच ते त्वचेला लावणंही गरजेचं असतं. नारळ पाण्यातील गुणधर्मांचा (coconut water benefits to skin) त्वचेला फायदा होण्यासाठी नारळ पाण्याचं फेशियल (coconut water facial) करणं हा चांगला पर्याय आहे.

ठळक मुद्देनारळ पाणी चेहेऱ्यास लावल्यानं  त्वचा मऊ होते आणि फ्रेश दिसते. त्वचेचं नैसर्गिक सौंदर्य वाढण्यासाठी नारळ पाण्याचा उपयोग होतो. 

नारळ पाणी म्हणजे नैसर्गिक जीवनसत्वं आणि खनिजांचा खजिना आहे. नारळ पाणी  (coconut water) नियमित पिणं आरोग्यासाठी लाभदायी असतं. अनेक आजारांचा धोका नारळ पाण्यानं कमी होते. आजार बरे करण्यासही नारळ पाणी गुणकारी आहे. नारळ पाणी प्याल्यानं आरोग्याप्रमाणे त्वचेसही (coconut water benefits to skin) फायदे मिळतात. पण त्वचा नैसर्गिकरित्या उजळ, स्वच्छ  करण्यासाठी, त्वचा चमकण्यासाठी नारळ पाणी पिण्यासोबतच ते त्वचेला लावणंही गरजेचं असतं. नारळ पाण्यातील गुणधर्मांचा त्वचेला फायदा होण्यासाठी नारळ पाण्याचं फेशियल (coconut water facial)  करणं हा चांगला पर्याय आहे. हजार दीड हजार रुपये खर्चून पार्लरमध्ये फेशियल केलं जातं. त्यातून चेहेऱ्याला जे फायदे मिळतात ते कृत्रिम आणि कमी वेळ टिकणारे असतात. पण नारळ पाण्याचं  फेशियल फक्त 50 रुपयात घरच्याघरी (coconut water facial at home)  करता येतं. त्यातून चेहेऱ्याच्या त्वचेला लाभणारं पोषण हे नैसर्गिक असून त्यापासून होणारे लाभ दीर्घकाळ टिकणारे असतात. 

Image: Google

नारळ पाण्यानं फेशियल करताना

1. फेशियलसाठी आधी चेहेरा धुवून स्वच्छ करणं आवश्यक असतं. चेहेरा धुण्यासाठी नारळ पाण्याचा उपयोग करावा. नारळ पाण्यात माॅश्चरायझिंग गुणधर्म असतात. नारळ पाण्याचा त्वचेसाठी उपयोग केल्यानं त्वचा मऊ होते आणि फ्रेश दिसते. चेहेरा धुण्यासाठी 2 मोठे चमचे नारळाचं पाणी घ्यावं. हे पाणी चेहेऱ्याला लावावं किंवा हे पाणी चेहेऱ्यावर आणि मानेवर  शिंपडावं. नारळाचं पाणी त्वचेत आपोआप शोषल जायला हवं. ते हात फिरवून त्वचेत जिरवू नये. 

2. चेहेरा टोन करण्यासाठी नारळ पाणी आणि गुलाब पाण्याचा उपयोग करावा. या दोन घटकांचा एकत्रित उपयोग केल्यानं त्वहा मऊ होते. टोनिंगसाठी एका मोठ्या वाटीत 1 छोटा चमचा गुलाब पाणी आणि 1 छोटा चमचा नारळाचं पाणी एकत्र करावं. कापसाच्या बोळ्यानं हे मिश्रण चेहेऱ्याला लावावं आणि त्यानंतर चेहेरा नैसर्गिकरित्या कोरडा होवू द्यावा. 

Image: Google

3. फेशियल करताना त्वचा खोलवर स्वच्छ करण्यासाठी नारळ पाणी आणि काॅफी पावडरचा एकत्रित उपयोग करावा. हे दोन घटक एकत्र करुन त्याने त्वचा स्वच्छ केल्यास चेहेऱ्यावरील मृत त्वचा, ब्लॅकहेड्स, व्हाइटहेड्स निघून जातात. आणि चेहेरा मऊ मुलायम होतो. चेहेरा स्वच्छ करण्यासाठी एका वाटीत 1 छोटा चमचा काॅफी पावडर, 1 मोठा चमचा नारळाचं पाणी आणि 1 छोटा चमचा कोरफड गर / जेल घ्यावा. या तिन्ही गोष्टी एकत्रित करुन हे मिश्रण चेहेरा आणि मानेवर लावावं. ते 5 मिनिटं चेहेऱ्यावर सुकू द्यावं. मग नारळ पाण्यानं हात थोडा ओला करुन चेहेऱ्यावर लावलेल्या मिश्रणाच्या सहाय्यानं हळुहळु मसाज करत स्क्रब करावं. 5 ते 7 मिनिटं स्क्रब केल्यानंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.

4. चेहेऱ्याच्या त्वचेखालील रक्तप्रवाह गतिमान होण्यासाठी मसाज करणं आवश्यक आहे. यासाठी नारळाच्या पाण्याचा उपयोग केल्यास चेहेऱ्यावर नैसर्गिक चमक येते. मसाज करण्यासाठी एका वाटीत 1 मोठा चमचा कोरफड गर आणि 1 छोटा चमचा नारळाचं पाणी घ्यावं. दोन्ही गोष्टी एकत्र करुन मसाज क्रीम तयार करुन घ्यावं. या क्रीमनं संपूर्ण आणि चेहेऱ्याचा हलक्या हातानं मसाज करावा. हे क्रीम मसाज करता करता त्वचेत पूर्णत: शोषलं जातं. 

Image: Google

5. चेहेऱ्याचा मसाज केल्यानंतर शेवटी नारळ पाण्यानं तयार केलेला लेप चेहेऱ्यावर लावणं गरजेचं असतं. चेहेऱ्यावर लावण्यासाठी लेप तयार करताना 1 मोठा चमचा नारळ पाणी, 1 छोटा चमचा बेसन पीठ, चिमूटभर हळद, आणि 1 छोटा चमचा मध घ्यावं. सर्व सामग्री नीट एकत्र करुन हा लेप चेहेरा आणि मानेस लावावा. लेप लावल्यानंतर 20 मिनिटं तो राहू द्यावा. नंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.  

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी