वातावरण, प्रदूषण्, धूळ, माती, ऊन यामुळे केस्ख राब होतात. केसांचं पोषण होण्यासाठी, केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी , केस सुरक्षित राहाण्यासाठी म्हणून केसांना तेल लावलं जातं. पण तेलामध्येच अनेक रासायनिक घटक असतात, त्याचा परिणाम केसांवर, केसांच्या मुळावर होवून केस आणखी खराब होण्याचा धोका असतो. हे टाळण्यासाठी केसांना तेल लावणं टाळण्यापेक्षा घरी तेल तयार करणं हा केसांसाठी लाभदायक आणि सुरक्षित उपाय आहे. केस वाढण्यासाठी, केसांची मुळं पक्की होऊन केस गळती थांबण्यासाठी, केस वाढण्यासाठी, केसांवर चमक येण्यासाठी काॅफीच्या तेलाचा फायदा होतो.
Image: Google
काॅफीमधील कॅफीन हा घटक केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. कॅफीनमुळे केसांचं पोषण होतं. काॅफीमधील फ्लेवोनाॅइडसमुळे केसांचा रुक्षपणा कमी होतो. त्यामुळे काॅफी ऑइल हे केसांसाठी फायदेशीर मानलं जातं. केसांसोबतच काॅफी ऑइल हे त्वचेसाठीही उपयुक्त मानलं जातं. काॅफी ऑइल बाहेर विकत मिळत असलं तरी ते घरच्याघरी तयार करणं सोपं आहे.
Image: Google
काॅफी ऑइल तयार करताना..
काॅफी ऑइल तयार करण्यासाठी 2-3 चमचे काॅफी पावडर, 5-6 चमचे नारळाचं किंवा बदामाचं तेल या दोनच गोष्टींची गरज असते. हे तेल तयार करण्यासाठी कढई गरम करावी. कढई गरम झाली की त्यात नारळाचं/ बदामाचं तेल घालावं. त्यातच काॅफी पावडर घालावी. गॅसची आच मंद ठेवावी. तेल गरम होणं अपेक्षित आहे. उकळणं नाही. उकळल्याने काॅफी पावडर जळण्याची शक्यता असते. तेल गरम करताना यात कढीपत्त्याची पानं धुवून कोरडी करुन टाकल्यास केसांची पोषकता वाढते.
तेल चांगलं गरम झालं की गॅस बंद करावा. तेल थंडं होवू द्यावं. तेल झाकूण रात्रभर तसंच ठेवावं. सकाळी गाळणीनं किंवा सूती कपड्यानं गाळूण घ्यावं. हे तेल हवाबंद डब्यात ठेवावं. एका आठवड्यात हे तेल संपवावं. या तेलात प्रिझव्हेटिव्ह नसल्याने काॅफी तेल एक आठवड्यापेक्षा जास्त काळ ठेवू नये.
Image: Google
काॅफी तेल केसांना लावताना
केसांना काॅफी तेल लावण्याआधी तेलाचा डबा/ बाटली उन्हात किंवा गरम पाण्यात ठेवावी. तेल यामुळे पातळ होत्ं. मग एका वाटीत थोडं तेल काढून घ्यावं. बोटांनी तेल घेत केसांच्या मुळाशी हलका मसाज करावा. तेल लावल्यानंतर 1 तासानं केस सौम्य शाम्पूनं धुवावेत.
Image: Google
काॅफी तेल लावल्यानं काय होतं?
काॅफी तेल थेट केसांना लावलं तरी चालतं. त्यात दुसरं काहीही मिसळायची गरज नाही. काॅफी तेलानं केसांच्या मुळांना मसाज केल्यानं टाळूवरील मृत पेशी निघून जातात. केसातील कोंडा निघून जातो. तसेच या तेलानं केसांच्या मुळांशी मसाज केल्यानं तेथील रक्तप्रवाह सुधारतो. केसांच्या मुळांना पोषण मिळून केस गळणं थांबंतं. काॅफी तेलानं केस लांब आणि दाट होण्यास मदत होते. केसांचं पोषण होण्यासाठी आठवड्यातून किमान 2 वेळा काॅफी ऑइल केसांना लावण्याचा सल्ला दिला जातो.