Join us  

काॅफी हळदीचा फेसपॅक, नितळ त्वचेसाठी सोपा उपाय- महागड्या फेशियलची गरजही पडणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2022 2:26 PM

काॅफी आणि हळद स्वतंत्ररित्या त्वचेसाठी फायदेशीर असतात पण त्यांच्या एकत्रित वापरानं जे परिणाम महागड्या फेशियलनं मिळत नाही ते त्वचेवर (benefits of coffee turmeric face pack) दिसतात. नितळ, डागरहित त्वचेसाठी काॅफी आणि हळदीचं मिश्रण (coffee-turmeric face pack) कसं वापरावं हे समजून घेतलं तर चेहेऱ्याच्या सौंदर्यासाठी महागड्या फेशियलची गरज पडणार नाही.

ठळक मुद्देकाॅफीमुळे चेहेऱ्याची त्वचा खोलवर स्वच्छ (एक्सफोलिएट) होते. चेहेऱ्यावरील मुरुम पुटकुळ्या निघून जातात.चांगल्या परिणामांसाठी काॅफी हळदीचा लेप आठवड्यातून किमान् 2-3 वेळा लावावा.काॅफी हळदीचा लेप लावल्यानंतर किमान काही तास उन्हात जाणं अवश्य टाळायला हवं.

'अ कप ऑफ काॅफी कॅन क्रिएट अ मॅजिक' असं वाक्य काॅफीच्या बाबतीत आपण नेहमीच ऐकतो. काॅफीच्या बाबतीत हे वाक्य सौंदर्याच्या दृष्टिकोनातूनही लागू पडतं.  सौंदर्याच्या बाबतीत् काॅफीची जादू चालते ती हळदीच्यासोबत. काॅफी आणि हळद असं मिश्रण (coffee-turmeric face pack) त्वचा नितळ करण्याचं काम करतं. काॅफी आणि हळद स्वतंत्ररित्या त्वचेसाठी फायदेशीर असतात पण त्यांच्या एकत्रित वापरानं जे परिणाम महागड्या फेशियलनं मिळत नाही ते त्वचेवर (benefits of coffee-turmeric face pack)  दिसतात. नितळ, डागरहित त्वचेसाठी काॅफी आणि हळदीचं मिश्रण कसं वापरावं (how to make coffee turmeric face pack)  हे समजून घेतलं तर चेहेऱ्याच्या सौंदर्यासाठी महागड्या फेशियलची गरज पडणार नाही. 

Image: Google

चेहेऱ्यासाठी काॅफीचा उपयोग ही नवीन गोष्ट नाही. काॅफीमुळे चेहेऱ्याची त्वचा खोलवर स्वच्छ (एक्सफोलिट) होते. चेहेऱ्यावरील मुरुम पुटकुळ्या निघून जातात. त्वचेखालील रक्तप्रवाह सुधारतो. तसेच त्वचेचा पीऐच स्तर संतुलित ठेवण्याचं काम काॅफी करते. एनसीबीआईच्या एका शोधानुसार त्वचा नितळ आणि डागरहित करण्यासठी हळदीचा उपयोग होतो. मुरुम पुटकुळ्यांमुळे, तर कधी जखम झाल्यानं चेहेऱ्यावर डाग पडतात. चेहेऱ्यावरच्या या समस्या घालवण्यासाठी हळदीचा उपयोग होतो.  उच्च गुणवत्तेचे काॅफी आणि हळद हे घटक एकत्र करुन वापरल्यास मनासारखी त्वचा प्राप्त होते. 

Image: Google

काॅफी- हळदीचा फेसपॅक

काॅफी हळदीचा फेसपॅक तयार करण्यासाठी 1 चमचा काॅफी पावडर, 1 चमचा हळद आणि 1 चमचा ॲलोवेरा जेल घ्यावं.  एका खोलकट भांड्यात काॅफी, हळद आणि ॲलोवेरा जेल एकत्र मिसळून घ्यावं. ही पेस्ट संपूर्ण चेहेऱ्याला लावावी. चेहेऱ्याला हलका मसाज करत पेस्ट लावावी.  15-20 मिनिटानंतर चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा. चांगल्या परिणामांसाठी काॅफी हळदीचा लेप आठवड्यातून किमान 2-3 वेळा लावावा. 

Image: Google

काॅफी हळदीचा फेसपॅक चेहऱ्याला लावताना..

काॅफी हळदीचा फेसपॅक चेहेऱ्याचा पोत सुधारण्यासाठी, सौंदर्य वाढवण्यासाठी उपयुक्त असला तरी पत्यक्षात तो चेहेऱ्यासाठी वापरताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. 

1. काॅफी हळदीचा फेसपॅक चेहेऱ्याला लावण्याआधी चेहेरा पाण्यानं स्वच्छ धुवावा आणि रुमालानं चेहेरा हळूवार टिपावा.

2. काॅफी हळदीचा फेसपॅक चेहेऱ्यावर लावण्याआधी चेहेऱ्यावरचा मेकअप काढून टाकायला हवा. त्यासाठी  चांगल्या दर्जाचं मेकअप रिमूव्हलचा वापर करावा. 

3.ज्या दिवशी संपूर्ण दिवस घरातच घालवायचा असतो त्यादिवशी चेहेऱ्याला निवांतपणे काॅफी हळदीचा लेप लावावा. कारण हा लेप लावून लगेच बाहेर पडू नये. हा लेप लावल्यानंतर लगेचंच उन्हात गेल्यास चेहेऱ्यावर धूळ, मातीचे कण बसू शकतात. यामुळे या फेस पॅकचे चेहेऱ्यावरचे परिणाम कमी होतत. हा लेप लावल्यानंतर किमान काही तास सूर्यप्रकाशात जाणं अवश्य टाळायला हवं. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी