Join us  

डोळे कायम सुजलेले दिसतात, झोपेतून उठल्यासारखे? थंडगार चमच्याचा १ सोपा उपाय, सूज होईल कमी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2023 1:37 PM

Try This Cool Method 'Cold Spoon Therapy' To Depuff Your Eye Bags : डोळ्यांखालची त्वचा कायम सुजलेली दिसत असेल तर त्याची कारणं काय? करुन पाहा सोपा उपाय....

'डोळे' हा आपल्या अवयवांपैकी सर्वात महत्वाचा भाग आहे. डोळ्यांना थोडी जरी इजा झाली तरीही आपल्याला ते दुखणं असह्य होत, म्हणून आपण डोळ्यांची खूप काळजी घेतो. आपले डोळे हा तसा आपल्या शरीराचा अतिशय नाजूक अवयव आहे. डोळ्यांचे आरोग्य जपण्यासाठी आपल्याला डोळ्यांची तितकीच काळजी घ्यावी लागते. आपल्यापैकी प्रत्येकाला सुंदर, टपोरे, काळेभोर डोळे सगळ्यांनाच आवडत असतात. आपल्या डोळ्यांच्या ठेवणीमुळे आपल्या चेहेऱ्याच्या सौंदर्यात भर पडते. डोळे सुंदर दिसावेत म्हणून आपलं वेगवेगळ्या प्रकारची सौंदर्य प्रसाधन वापरत असतो. 

सध्याची बदलती जीवनशैली आणि झोपेची कमतरता यामुळे डोळ्यांच्या विविध समस्या उद्भवतात. काहीवेळा आपली झोप गरजेपेक्षा जास्त किंवा कमी झाली तरी आपले डोळे सुजतात. काही जणांना सकाळी उठल्यानंतर डोळ्यांखाली पफीनेस (Eye Puffiness) म्हणजेच सूज जाणवते. त्यामुळे सकाळी उठल्यावर डोळ्यांमुळे पूर्ण चेहेराही खराब दिसतो. काही जणांना हा नेहमीचा त्रास असतो. डोळ्यांच्या पफीनेसमुळे चेहेरा निस्तेज आणि आजारी असल्यासारखाही वाटतो. डोळ्यांची सूज कमी करण्यासाठी आपण घरगुती उपायांची मदतही घेऊ शकतो(Try This Cool Method 'Cold Spoon Therapy' To Depuff Your Eye Bags).

डोळ्यांना पफीनेस (Eye Puffiness) म्हणजेच सूज येण्याची मुख्य कारणे :- 

१. स्क्रीन :- आजकाल आपल्या व्यक्त लाईफस्टाईलमध्ये लोक जास्तीत जास्त वेळ स्क्रिनवर काम करत असतात. घरी असताना देखील सतत हातात मोबाईल डोळ्यांसमोर धरलेला असतो. आपण सगळेच सतत सोशल मीडियाचा वापर करण्यात व्यस्त असतो. स्क्रिन जास्त काळ पाहिल्याने डोळ्यांवर परिणाम होतो. तसेच रात्री उशीरापर्यंत जेव्हा आपण मोबाईल पाहतो तेव्हा सकाळी उठल्यावर डोळ्याला सूज म्हणजेच पफीनेस येतो.  

१ चमचा शुद्ध तूप घ्या आणि बनवा घरीच १०० % नैसर्गिक मॉइश्चरायझर, त्वचा होईल नितळ-चमकदार...

२. शरीरात पाण्याची कमतरता :-  शरीरारमध्ये पाण्याची कमतरता असणे हे देखील डोळ्यांना सूज येण्याचे मुख्य कारण आहे. यामुळे केवळ आपल्या शरीरावरच नाही तर डोळ्यांवरही परिणाम होत असतो. पाण्याची कमतरता ही शरीरातील कमजोरीमुळे येते. त्याचा परिणाम डोळ्यांवर होतो. त्यामुळे दिवसातून किमान ८ ते ९ ग्लास पाणी प्यायलाच हवे.  

आठवडभरात गायब होतील डोळ्याखालची काळी वर्तुळं, बघा घरगुती आय मास्कची जादू....

३. ताण - तणाव :-  सतत काम, ऑफिसमधील ताण, मनावरील कामाचा तणाव यामुळे व्यवस्थित झोप लागत नाही. किमान दिवसातून आठ तास झोप पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यामुळे झोपेचा थेट परिणाम हा डोळ्यांना सूज येण्यावर होत असतो. 

डोळ्यांचा पफीनेस दूर करण्यासाठी 'कोल्ड स्पून थेरपी' म्हणजे नेमकं काय ?

डोळ्यांचा पफीनेस दूर करण्यासाठी आपल्याला सतत डॉक्टरांकडे जायची गरज नाही. आपण घरच्या घरीदेखील यावर उपाय करू शकतो. डोळ्यांचा पफीनेस (Eye Puffiness) दूर करण्यासाठी आपण थंड चमच्यांचा उपयोग करून घेऊ शकतो. याचा खूपच चांगला परिणाम डोळ्यांवर होतो. थंड चमच्यांचा  वापर करून आपण डोळ्यांची सूज कमी करू शकतो. सर्वप्रथम चार स्वच्छ चमचे घेऊन ते फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवावेत. ५ मिनिटांनंतर थंड झालेला एक चमचा घ्या. त्यानंतर डोळे बंद करून हा थंड चमचा उलटा करुन डोळ्यांवर ठेवा. काही सेकंदानंतर दुसरा चमचा घेऊन तो देखील अलगद डोळ्यांवर ठेवा. यामुळे त्वरीत डोळ्याचा पफीनेस कमी होण्यास मदत होईल.

टॅग्स :डोळ्यांची निगाब्यूटी टिप्स