केसांचे चांगले आरोग्य व सौंदर्यासाठी त्यांची योग्य पद्धतीने काळजी घ्यावी लागते. जर केसांची काळजी घेतली नाही तर केस खराब होऊन केसांच्या अनेक आपली पाठ सोडत नाहीत. केसांची काळजी घेणे हे सोपे काम नाही, कारण लहान - सहान चुकांमुळे केस खराब होऊ शकतात. केसांचा पोत खराब होणं किंवा केसांशी संबंधित अनेक समस्या सुरू होणं यामागे अनेक कारणं असू शकतात. केस धुताना किंवा केसांना तेल लावताना अशा अनेक चुका वारंवार होतात ज्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव होतात(Common Wet Hair Mistakes That Damage Your Hair).
केसांमधून नुसता हात फिरवला, कंगवा फिरवला तरीही केस हातात गळून येतात. काहीवेळा तर केस विंचरताना केसांचा अक्षरशः गुच्छच हातात येतो. यांसारख्या समस्यांमुळेच काहीजणांना अकाली टक्कल पडणे, केस विरळ होणे, केसांची वाढ खुंटणे यांसारख्या असंख्य समस्यांना सामोरे जावे लागते. खरंतर अशा केस गळतीला आपणच कुठेतरी जबाबदार असतो. आपल्यापैकी बरेचजण केस (4 things you should never do to wet hair) धुतल्यानंतर ते ओले असतानाच अनेक लहान मोठ्या चुका करतात. या चुकांमुळे केस गळण्याची समस्या अधिकच वाढू शकते. जर आपण या चुका वेळीच लक्षात घेऊन त्या करायच्या टाळल्या नाहीत तर केसांशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. केस ओले असताना ते पटकन सुकण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. परंतु याच चुकांमुळे केसांना व त्यांच्या मुळांना इजा पोहोचू शकते. ओले केस वाळवताना करु नये अशा चुका नेमक्या कोणत्या ते पाहूयात(4 common mistakes you are making with wet hair that is silently damaging your locks).
ओले केस वाळवताना करु नयेत या चुका...
चूक १ :- केसांतील पाणी नितळण्यासाठी केसांना जोरजोराने झटकणे.
ओले केस सुकवताना सगळेचजण हमखास करतातं अशी ही एक कॉमन चूक आहे. केस धुतल्यानंतर ते पटकन सुकावेत किंवा त्यातील जास्तीचे पाणी नितळून जाण्यासाठी केस टॉवेलच्या मदतीने जोरात झटकले जातात. ही सगळ्यांत मोठी चूक आहे. यामुळे केसांच्या मुळांना इजा पोहोचून केसांशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. असे वारंवार केल्यास केस गळू लागतात. खरंतर, केस ओले असताना ते खूपच नाजूक आणि कमकुवत असतात. अशातच केस टॉवेलच्या मदतीने जोरात हलवल्यास ते अधिक प्रमाणात तुटण्याची शक्यता असते.
रात्री झोपताना चेहऱ्यावर ‘हा’ घरगुती स्लिपिंग मास्क लावा, सकाळी चेहरा इतका चमकेल की पाहा तेज!
चूक २ :- केस ओले असताना कंगव्याने वारंवार विंचरणे.
केस धुतल्यानंतर ते ओले असताना केस विंचरू नयेत. केस ओले असतानाच जर केस विचारले तर केसांच्या मुळांना इजा पोहाचुन ते अधिक जास्त प्रमाणात कमकुवत होऊ शकतात. ओले केस विंचरल्याने ते अधिक जास्त प्रमाणात गळण्याची शक्यता असते. यासाठीच केस ओले असताना ते विंचरु नये. केस धुतल्यानंतर ते आधी संपूर्णपणे वाळू द्यावेत त्यानंतरच केस विंचरावेत. जर केस ओले असताना विंचरायचे असतीलच तर मोठ्या दातांच्या कंगव्याचा वापर करावा किंवा बोटांच्या मदतीने हळुहळु केसांतील गुंता सोडवून घ्यावा. याचबरोबर केसांच्या मुळांपर्यंत जाऊन केस न विंचरता केसांच्या लेंथ वरुन हलकेच कंगवा फिरवून घ्यावा.
चूक ३:- केस ओले असतानाच ते अधिक प्रमाणात ताणून किंवा खेचून घट्ट बांधणे.
काहीवेळा आपण केस ओले असतानाच ते बांधतो. केस ओले असताना जर ते अधिक प्रमाणात ताणून किंवा खेचून घट्ट बांधले तर ते फार मोठ्या प्रमाणावर तुटू शकतात. केस ओले असतानाच घट्ट पोनीटेल, अंबाडा किंवा घट्ट वेणी घालणे केसांच्यादृष्टीने अतिशय हानिकारक आहे. जेव्हा केस ओले असतात तेव्हा ते अशा पद्धतीने अधिक ताणून, खेचून, घट्ट बांधल्याने केस तुटतात किंवा पातळ होतात. यासाठी केस धुतल्यानंतर आधी ते संपूर्णपणे वाळू द्यावेत तसेच केस ओले असतील तर अतिशय घट्ट किंवा खेचून, आवळून बांधू नयेत.
तुरटीचा इवलासा खडा त्वचेवर अशी करेल जादू, दिवाळीत त्वचा चमकेल-नव्या दिसाल तुम्ही!
चूक ४ :- केस धुतल्यानंतर लीव-इन कंडीशनरचा वापर न करणे.
केस धुतल्यानंतर लीव-इन कंडीशनरचा वापर न केल्याने देखील केस खराब होऊ शकतात. आपल्यापैकी काहीजण अनेकवेळा केस धुतल्यानंतर लीव्ह-इन कंडिशनर वापरणे आवश्यक मानत नाहीत. यामुळे केस तुटण्याची शक्यता अधिक वाढते. केस धुतल्यानंतर जर आपण लीव्ह-इन कंडिशनर किंवा गुंता सोडवण्यासाठी डिटेंगलिंग स्प्रे वापरत नसाल तर केसांना अतिरिक्त ओलावा मिळत नाही आणि कोरडेपणामुळे ते तुटतात.
नखांवरचं नेलपेंट झटपट काढायचंय, ही पाहा अफलातून ट्रिक- नेलपेंट काढा कापूसही न वापरता...