तोंडाला येणाऱ्या दुर्गंधीमुळे अनेकवेळा चारचौघात लाजिरवाणे वाटू लागते. आपण कितीही स्मार्ट किंवा सुंदर दिसण्याचे प्रयत्न केला, तरी देखील तोंडाच्या दुर्गंधीमुळे आपल्यापासून लोकं चार हात लांब राहतात. खरंतर धुम्रपान, हिरड्या संबंधित समस्या, सायनसच्या कारणामुळे देखील तोंडातून दुर्गंधी येऊ शकते. याचे मुख्य कारण म्हणजे बॅक्टेरिया. जे मोठ्या प्रमाणावर आपल्या तोंडात निर्माण होतात. आणि या कारणामुळे आपल्या तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. तोंडातील दुर्गंधी दूर करण्यासाठी आपण अनेक महागड्या प्रोडक्ट्सचा वापर करतो. मात्र, अनेकांच्या तोंडावर अशा प्रॉडक्ट्सचा प्रभाव पडेलच हे सांगता येत नाही. दरम्यान, आपण घरगुती साहित्यांचा वापर करून देखील हर्बल पावडर बनवू शकता. हे हर्बल पावडर आपल्या दातांसाठी उपयुक्त ठरेलच यासह तोंडातील दुर्गंधी देखील दूर करण्यास मदत करेल.
हर्बल पावडर बनवण्यासाठी लागणारं साहित्य
सुखवून घेतलेली कडूनिंबाची पानं
दालचिनी पावडर
लवंग पावडर
मुलेठी पावडर
कृती
सर्वप्रथम एका बाउलमध्ये सुखवून घेतलेली कडूनिंबाची पाने घ्या त्या पानांचे बारीक पावडर करून घ्या. त्यात दालचिनी पावडर, लवंग पावडर, मुलेठी पावडर एकत्र करा. अशा प्रकारे हर्बल पावडर रेडी झाली आहे. या पावडरचा आपण नियमित वापर करू शकता. ही पावडर घेऊन आपण दात आणि जीभ साफ करू शकता. यामुळे दातांमध्ये जमलेली पायरिया आणि पिवळेपणा दूर होईल. यासह दातांमधील किड देखील कमी होईल.
इतर उपाय
टूथपेस्ट घ्या त्यात दालचिनी तेल मिसळा. आणि ही पेस्ट घेऊन आपले दात घासून घ्या. अशाप्रकारे दातांमधील कीड आणि पिवळेपणा दूर होईल.
टूथपेस्टमध्ये लवंग तेल मिसळा आणि ही पेस्ट नियमित आपल्या दातांवर लावा. याने दातांमधील तयार झालेली पायरिया कमी होईल यासह तोंडातील दुर्गंधीही जाईल.
खोबरेल तेल घेऊन माउथ वॉश करून घ्या. याने दातांमधील कॅविटी कमी होईल. किडलेले दात लवकर साफ होईल. आणि तोंडातील दुर्गंधी ही कमी होईल.