डोळ्यांचे सौंदर्य खुलवण्यासाठी काजळ, आयलायनर इतक्याच गोष्टी पुरेशा नसतात. डोळ्यांचा आकर्षक आणि सुंदर लुक पूर्ण होतो तो मस्कारा लावल्यानंतरच. तुमच्या पापण्या कितीही पातळ आणि लहान असल्या तरी त्या सुंदर, घनदाट आणि लांब दिसण्याचे काम ‘मस्कारा’ करते. आपल्या मेकअप किटमध्ये एकतरी मस्कारा (Mascara) नक्कीच असतो. डोळ्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी काजळ, आयलायनरसोबतच मस्कारा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे(The Correct Way to Apply Mascara).
मस्कारा जर योग्य पद्धतीने आपल्या पापण्यांवर लागला तरच तो शोभून दिसतो. याउलट मस्कारा लावताना छोटीशी जरी चूक झाली तर आपला संपूर्ण लूकच खराब होतो. अशावेळी डोळे व चेहऱ्याचे सौंदर्य खुलून येण्याऐवजी विद्रुप दिसते. यासोबतच, अनेकजणींना मस्कारा लावण्याची योग्य पद्धतच माहित नसते, किंवा मस्कारा लावताना हात थरथरतो. अशा अनेक कारणांमुळे मस्कारा डोळ्यांवर योग्य पद्धतीने लावला जात नाही. यामुळे मस्कारा ( How To Apply Mascara Without Clumping, Flaking, or Smudging) पसरून डोळ्यांच्या अवतीभोवती लागतो किंवा काहीवेळा जास्त प्रमाणात मस्कारा लावल्याने तो एकदम गोळा होऊन पापण्यांवर त्याचा जाड थर तयार होतो. यामुळे डोळ्यांवर शोभून दिसेल अशा परफेक्ट पद्धतीने मस्कारा लावायचा असल्यास काही गोष्टी लक्षात ठेवा( Correct Way Of Applying Mascara For Flawless Eye Makeup).
मस्कारा लावताना या गोष्टी लक्षात ठेवा...
१. मस्कारा पापण्यांवर लावण्यापूर्वी सर्वात आधी मस्करा ब्रश पूर्णपणे स्वच्छ करून घ्यावा.
२. कर्लरच्या मदतीने सगळ्यातआधी डोळ्यांच्या पापण्यांना परफेक्ट शेप देऊन सेट करून घ्यावे.
३. मस्कारा लावताना, मस्कारा ब्रशमध्ये अति जास्त प्रमाणांत मस्कारा लिक्विड येणार नाही याची खात्री करा. असे झाल्यास आधी जास्तीचे मस्कारा लिक्विड ट्यूबमध्येच काढून घ्यावे.
४. मस्कारा लावताना नेहमी समोर बघून, पापण्यांच्या मध्यभागापासून मस्कारा लावायला सुरुवात करावी. मस्कारा पापणीच्या तळापासून वरपर्यंत लावत यावे जेणेकरून ब्रश फक्त पापण्यांच्या टोकालाच स्पर्श करेल.
५. अनेकजणी फक्त पापणीच्या वरच्या भागालाच मस्कारा लावतात. असे न करता पापणीच्या वरच्या आणि खालच्या दोन्ही भागांवर मस्कारा लावावा.
६. मस्कारा लावताना जर तो चुकून जास्त प्रमाणात लागला गेला तर पापण्यांच्या मध्ये टिश्यू पेपरची घडी ठेवून डोळे बंद करावे. अशाप्रकारे जास्तीचा मस्कारा पुसून घ्यावा.
७. डोळ्यांच्या कोपऱ्यातील पापण्यांना मस्कारा लावणे म्हणजे कठीण काम असते. कोपऱ्यातील पापण्यांना मस्कारा लावताना ब्रशच्या पुढच्या निमुळत्या टोकाचा वापर करुन मस्कारा लावावा.
पायांच्या घोट्यांचा काळपटपणा जात नाही? करा घरगुती असरदार उपाय, पार्लरला जायची गरजच नाही...
मस्काराशी संबंधित या सुद्धा गोष्टी लक्षात ठेवा...
१. पापण्यांना मस्कारा लावताना अजिबात घाई करू नका.
२. दर सहा महिन्यांनी मस्कारा बदला.
३. मस्कारामध्ये तुम्ही लॅश ऑइलचे काही थेंब घालू शकता यामुळे मस्कारा लिक्विड न सुकता आहे तसेच राहील. हा उपाय केल्याने पापण्या मॉइश्चराइझ होतील सोबतच पापण्यांचे केस अधिक भरीव आणि दाट दिसतील.
या सोप्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या पापण्यांवर अगदी योग्य पद्धतीने मस्कारा लावू शकता. ज्यामुळे तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य अधिक खुलून येईल.