केसांचे पोषण व्हावे म्हणून आपण त्यांना तेलाने मसाज करतो. तेल लावल्याने केसांच्या मुळांना थोडे मॉईश्चर मिळेल आणि केस मजबूत आणि मुलायम होतील असे आपल्याला वाटते. पण नियमित तेल लावूनही आपले केस म्हणावे तितके चांगले राहत नाहीत. यामागे काही कारणे असतात, तेल लावताना ते योग्य पद्धतीने कसे लावायचे याबाबत आपल्याला माहित नसते. त्यामुळे त्या तेलाचा म्हणावा तसा इफेक्ट होत नाही. आता केसांना तेल लावणे यात काय समजून घेण्यासारखे आहे असे अनेकांना वाटू शकते. मात्र तेल लावण्याची योग्य पद्धत फॉलो केली तर त्याचा केसांचा पोत सुधारण्यास निश्चतच फायदा होईल (Correct Way of Hair Oiling Important Steps Hair care Tips).
बाजारात विविध प्रकारची तेलं येतात. अमक्या तेलामुळे केसांना हा फायदा होईल, तमक्या तेलामुळे केसांची ही समस्या दूर होईल असे अनेक दावे विविध कंपन्यांद्वारे केले जातात. मात्र केसांची उत्तम वाढ व्हावी आणि केस दिर्घकाळ चांगले राहावेत यासाठी आपल्या केसांना सूट होईल अशा कोणत्याही तेलाने पारंपरिक तेल मसाज करणे फायद्याचेच ठरते.तेल लावताना योग्य ती काळजी घेतल्यास केस दिर्घकाळ चांगले राहण्यास मदत होते. म्हणूनच तेल लावताना कोणत्या चुका टाळायला हव्यात याबाबत माहिती घ्यायला हवी .
१. एका पातेल्यात किंवा मोठ्या आकाराच्या भांड्यात कोमट पाणी घ्यावे.
२. एका बाऊलमध्ये खोबरेल तेल, काही थेंब एरंडेल तेल आणि रोजमेरी इसेन्शिअल ऑईल एकत्र करायचे.
३. हा बाऊल गरम पाण्यात काही वेळ ठेवायचा म्हणजे या तेलाला पाण्याची उष्णता लागेल.
४. मोठ्या दाताच्या कंगव्याने केसातील गुंता काढून घ्यायचा.
५. त्यानंतर ड्रॉपरने किंवा बोटांनी बाऊलमध्ये कोमट केलेले तेल केसांच्या मुळांशी लावा.
६. त्यानंतर उरलेले तेल केसांच्या टोकांना लावा.
७. मसाजर किंवा बोटांनी केसांच्या मूळांना २ ते ३ मिनीटे चांगला मसाज करा.
८. हे तेल रात्रभर केसांना न लावता केस धुण्याच्या २ ते ३ तास आधी लावून ठेवायचे आणि लावल्यानंतर केसांचा हलका बो बांधायचा.
९. आठवड्यातून २ वेळा हा प्रयोग केल्यास केस वाढण्यास आणि मुलायम होण्यास मदत होईल.
१०. केसांची त्वचा खूप कोरडी असेल तर सल्फेट फ्री शाम्पू वापरावा, त्वचा ऑयली असेल तर सल्फेट असलेला शाम्पू वापरावा.