Join us  

केसांना तेल लावण्याच्या ५ स्टेप्स, हे परफेक्ट जमलं तर केस दिसतील कायम सुंदर -मऊ आणि चमकदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2022 4:09 PM

Correct Way to Oil Hair Important Steps : तेल लावण्याची योग्य पद्धत फॉलो केली तर त्याचा केसांचा पोत सुधारण्यास निश्चतच फायदा होईल.

ठळक मुद्देकेस धुतल्यानंतर ते ओले असतानाच थेंबभर तेल हातावर चोळून ते केसांना लावू शकतो.मुळांपासून टोकांपर्यंत तेल लावल्याने केसांना फाटे फुटणे, केस तुटणे यांपासून आपण दूर राहू शकतो. 

केसांचे पोषण व्हावे म्हणून आपण त्यांना तेलाने मसाज करतो. तेल लावल्याने केस मुलायम होतील असे आपल्याला वाटते पण तसे न होता केसांचा पोत आहे तसाच राहतो (Hair Care Tips). याचे कारण म्हणजे आपण खोबरेल तेल केसांना लावताना काही चुका करतो. केस कोरडे असले की ते खूप भुरे दिसतात. असे केस जास्त प्रमाणात फुगत असल्याने ते मुलायम न दिसता रखरखीत दिसतात. मात्र या केसांमध्ये मॉईश्चर टिकून ठेवण्यासाठी तेल लावताना काही स्टेप्स आवर्जून फॉलो केल्या तर त्याचा नक्कीच फायदा होतो. आता केसांना तेल लावणे यात काय समजून घेण्यासारखे आहे असे अनेकांना वाटू शकते. मात्र तेल लावण्याची योग्य पद्धत फॉलो केली तर त्याचा केसांचा पोत सुधारण्यास निश्चतच फायदा होईल (Correct Way to Oil Hair Important Steps). 

(Image : Google)

बाजारात विविध प्रकारची तेलं येतात. अमक्या तेलामुळे केसांना हा फायदा होईल, तमक्या तेलामुळे केसांची ही समस्या दूर होईल असे अनेक दावे विविध कंपन्यांद्वारे केले जातात. मात्र केसांची उत्तम वाढ व्हावी आणि केस दिर्घकाळ चांगले राहावेत यासाठी आपल्या केसांना सूट होईल अशा कोणत्याही तेलाने पारंपरिक तेल मसाज करणे फायद्याचेच ठरते. त्वचारोगतज्ज्ञ डॉ. चिरंजीव छाब्रा म्हणतात, तेल हे केसांसाठी एकप्रकारे अडथळा म्हणून काम करते. तसेच केसांचे आणि केसांखाली असणाऱ्या त्वचेचे पोषण होण्यासही हे तेल फायदेशीर असते. तेलामुळे केसांवर एकप्रकारचा थर तयार होतो. जो थर सूर्यापासून, प्रदूषणापासून केसांचे संरक्षण करतो. इतकेच नाही तर केस गळू नयेत, लवकर पांढरे होऊ नयेत आणि शायनी दिसावेत यासाठीही तेलाचा हा थर उपयुक्त असतो. पाहूयात केसांना तेल लावण्याच्या महत्त्वाच्या स्टेप्स...

१. स्टेप १ 

एका वाटीत तेल घेऊन ते कोमट होईपर्यंत गरम करा. तेलाची उष्णता डोक्याचा रक्तप्रवाह वाढण्यास मदत करेल. त्यामुळे केसांची वाढ तर चांगली होईलच पण केसांना आवश्यक ते पोषणही मिळण्यास मदत होईल. 

२. स्टेप २ 

केसांमधील गुंता काढून मध्यभागी भांग पाडा आणि केस दोन भागांत विभागले जातील असे पाहा. हे करण्यासाठी बारीक दातांचा कंगवा न वापरता जास्तीत जास्त मोठ्या दातांचा कंगवा वापरा. म्हणजे केस कंगव्यामध्ये अडकून तुटणार नाहीत आणि गुंता झटपट निघण्यास मदत होईल. 

३. स्टेप ३ 

डोक्यावर तेल ओता आणि हाताच्या बोटांनी डोक्यात गोलाकार मसाज करा. मसाज करताना खप जोरजोरात करु नका, कारण असे केल्याने केस तुटण्याची आणि गळण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे हलक्या हाताने मसाज करणे केव्हाही फायद्याचे ठरते. 

(Image : Google)

४. स्टेप ४ 

केसांच्या मुळांना भरपूर तेल लावल्यानंतर केसांकडे वळा. हाताच्या तळव्यावर तेल घेऊन दोन्ही हाताच्या मध्यभागी केस धरुन त्यांना तेल लावा. यानंतर केसांच्या टोकांना तेल लावायला वुसरु नका. मुळांपासून टोकांपर्यंत तेल लावल्याने केसांना फाटे फुटणे, केस तुटणे यांपासून आपण दूर राहू शकतो. 

५. स्टेप ५

आता केसांची हलकी वेणी बांधा आणि ती एक ते दोन तासांसाठी तशीच ठेवून द्या. त्यानंतर हलक्या शाम्पूने केस धुवा. केस धुतल्यानंतर ते ओले असतानाच थेंबभर तेल हातावर चोळून ते केसांना लावू शकतो. तेलाचा नैसर्गिक सिरमसारखा वापर करता येऊ शकतो. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी