Join us  

Covid-19 hair loss : कोरोनातून बरं झाल्यानंतर वाढतंय केसाचं गळणं; नवे केस यायला किती वेळ लागणार? डॉक्टर म्हणाले.....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 12:48 PM

Covid-19 and hair loss : केस गळण्याचे कारण TE आहे की नाही याचं आकलन होणं थोडं कठीण आहे. कारण जेव्हा केस ओले असतात तेव्हा फॉलिकल्स लूज होतात. त्यामुळे केस सहज गळू शकतात.

ठळक मुद्देतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जेव्हा आपल्याला डोक्याजवळ लहान केस दिसतात तेव्हा आपल्याला समजेल की केसांची वाढ सुरू झाली आहे. तज्ञ म्हणतात की कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर केस येण्याच्या अवस्थेतही समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत आपण आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी योग्य आहार निवडणे महत्वाचे आहे.

कोरोना व्हायरसच्या लक्षणांनी  फक्त शारीरिक नाही तर मानसिकरित्याही नुकसान पोहोचवलं आहे. यामुळे  लोकांना केस गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. कोरोनानं वाढलेल्या तणावाला टेलोजेन एफ्लुवियम (TE) असं म्हणलं जातं.  (TE) एक ताण तणावाचे प्रमाण आहे. याचा समावेश मानसिक आणि शारीरिक तणावाच्या प्रक्रियेत होतो. 

डॉक्टर पटेल एनबीटीशी बोलताना म्हणाले की, ''दीर्घकाळ कोरोनाच्या भितीमुळे लोकांमध्ये TE चे प्रमाण वाढले आहे.  जर तुम्ही कोरोना व्हायरसनं संक्रमित असाल तर तुमची समस्या अधिकच वाढू शकते.'' कोरोनामुळे उद्भवणारा तणाव कसा कमी करता येईल? त्याची कारणं काय आहेत याबाबत माहिती असणं गरजेचं आहे. 

ऑक्सिजनची कमतरता

डॉक्टर पूर्विशा पटेल सांगतात की, ''कोरोना व्हायरसचा  एखाद्या अवयवावर नाही तर संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. अशा परिस्थितीत केस गळण्यामागील हे कारण देखील असू शकते. कोरोनानं आलेल्या तणावामुळे केसांच्या रोमांना पुरेसे ऑक्सिजन मिळत नाही. शरीरावर ताण आल्यामुळे फोलिकल रेस्ट फेजमध्ये जातात.''

काय सांगतो रिसर्च

जानेवारी २०२१ मध्ये लँसेंटद्वारे करण्यात आलेल्या संशोधनातून दिसून आलं की, जे लोक कोरोना व्हायरसनं संक्रमत होते. त्या लोकांमध्ये ६ महिन्यांनंतर दुष्परिणाम दिसून आले. यापैकी  ६३ टक्के लोकांना कमकुवतपणा, थकवा आणि झोप येत होती. याव्यतिरिक्त २३ टक्के लोकाना चिंता, डिप्रेशनचा सामना करावा लागला होता. तर २२ टक्के लोकांमध्ये  केस गळ्याची समस्या निदर्शनास आली. 

केस जास्त प्रमाणात कधी गळतात?

डॉक्टर पटेल यांनी सांगितले की, ''केस गळण्याचे कारण TE आहे की नाही याचं आकलन होणं थोडं कठीण आहे. कारण जेव्हा केस ओले असतात तेव्हा फॉलिकल्स लूज होतात. त्यामुळे केस सहज गळू शकतात. या स्थितीत अनेकांचे केस मोठ्या प्रमाणात गळतात. याऊलट जोपर्यंत जास्त प्रमाणात केस गळत नाहीत, तोपर्यंत अनेकांना  केस गळण्याबाबत जाणीव होत नाही.''

६ ते ९ महिन्यात येतात नवीन केस

फ्रान्सिस म्हणतात, TE बद्दल चांगली गोष्ट म्हणजे ही स्टेज तात्पुरती आहे. म्हणजेच, गळणारे  केस फक्त तात्पुरते असतात. अमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजीचं (एएडी) म्हणणं आहे की, या सगळ्यातील वाईट बाब म्हणजे केस पुन्हा परत यायला जवळपास ६ ते ९ महिन्यांचा कालावधी लागतो. म्हणून केस परत येण्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल. तथापि, केस गळताच शरीरात केसांची वाढ होण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू होते. फक्त या दरम्यान कोणतीही शारीरिक, मानसिक समस्या न उद्भवल्यास वाढ लवकर होते. 

केस पुन्हा यायला त्रास होऊ शकतो का?

तज्ञ म्हणतात की कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर केस येण्याच्या अवस्थेतही समस्या उद्भवू शकते. अशा परिस्थितीत आपण आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी योग्य आहार निवडणे महत्वाचे आहे. ज्यामुळे केस गळण्याची समस्या कमी होते आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय केस परत येऊ शकतात. तरीही तुमच्या केसांची स्थिती सुधारत नसेल तर त्वरित तज्ज्ञांचा सल्ला  घ्यायला हवा.

तज्ञ केस गळण्याचे मुख्य कारण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण केस पडण्याचे कारण केवळ TE च नाही तर अनुवांशिक देखील असू शकते. अशा परिस्थितीत, केस गळणे थांबविण्यासाठी डॉक्टर काही प्रकारचे औषध देखील देऊ शकतात. या औषधाने केसांची वाढ वेगवान होऊ शकते.

लहान केस दिसायला  सुरूवात होते

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जेव्हा आपल्याला डोक्याजवळ लहान केस दिसतात तेव्हा आपल्याला समजेल की केसांची वाढ सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत आपण केसांची स्टाईल करण्याच्या नादात समस्या वाढवून घेऊ शकता. यावेळी आपल्याला आपल्या केसांची जास्त काळजी घ्यावी लागेल. केस देखील पूर्वीसारखेच दाट आहेत की नाही हे देखील आपल्याला पहावे लागेल.

टॅग्स :केसांची काळजीहेल्थ टिप्सआरोग्यकोरोना वायरस बातम्यातज्ज्ञांचा सल्ला