Join us  

हिवाळ्यात भेगा पडलेल्या टाचा देतात त्रास, ३ घरगुती उपाय देतील आराम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2022 7:22 PM

Winter Season Cracked heels हिवाळा सुरू झाला की, टाचांवर भेगा पडायला सुरुवात होते, हे घरगुती उपाय ट्राय करा, मिळेल आराम

हिवाळा सुरू झाला की, त्वचा ही कोरडी पडते. हाता-पायांसह ओठ देखील फुटतात. ज्यावर क्रीम आणि तेल लावल्याने फायदा होतो आणि काहीसा आराम मिळतो. पण हिवाळ्यात अनेकदा भेगा पडलेल्या टाचांचा खूप त्रास होतो. ते केवळ पायांचे सौंदर्यच खराब करत नाहीत तर वेदना देखील देतात आणि जास्त फुटलेल्या टाचांमधून रक्त देखील येऊ लागते. हिवाळा सुरू झाला तर टाचांना भेगा पडल्याचा त्रास प्रचंड होतो. काही लोकांचे टाच हे फक्त हिवाळ्यात नसून, प्रत्येक महिन्यात फुटतात. त्यामुळे खास घरगुती उपाय करून पाहिल्यास कोरड्या त्वचेपासून आराम मिळेल आणि हिवाळ्यात याचा त्रास देखील होणार नाही. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत ते खास घरगुती उपाय.

हिंग ठरेल रामबाण उपाय

भेगा पडलेल्या टाचांचा त्रास होत असेल तर कडुलिंबाचे तेल घ्या. या तेलात हिंगाची बारीक पूड घालून मिक्स करा. रात्री झोपण्यापूर्वी कडुलिंबाच्या तेलात हिंग मिसळून टाचांवर लावा. नंतर त्यावर पॉलिथिन बांधा. जेणेकरून पायातील ओलावा टिकून राहेल आणि तेल निघणार नाही. सकाळी टाचा स्वच्छ पाण्याने धुवून काढा, तुम्हाला भेगा पडलेल्या टाचांमध्ये आराम वाटेल. हे तेल रोज भेगा पडलेल्या टाचांवर लावा, त्यामुळे अधिक आराम मिळेल.

मधामध्ये आहे गुणकारी सत्व

सर्वप्रथम बादलीत गरम पाणी घ्या. नंतर या पाण्यात मध टाका आणि सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे पाय भिजत ठेवा. वीस मिनिटे झाल्यानंतर पाय बाहेर काढून पुसून टाका आणि फुट क्रीमने मसाज करा. भेगा पडलेल्या टाचांवरही मधाच्या मदतीने आराम मिळतो.

केळीचा वापर उत्तम

पिकलेली दोन केळी घ्या, त्या केळींना चमच्याने स्मॅश करा. आणि हे केळी भेगा पडलेल्या टाचांवर लावावे. थोडे मसाज केल्यानंतर पायांवर अर्धा तास ठेवायचे आहे. अर्धा तास झाल्यानंतर पाय पाण्याने धुवावेत. पाय धुताना साबणाचा वापर करू नये. आठवड्यातून २ ते ३ वेळा केळी लावावी जेणेकरून भेगा पडलेल्या टाचांमध्ये आराम मिळेल.

मेण आणि खोबरेल तेल

भेगा पडलेल्या टाचांचा त्रास होत असेल तर खोबरेल तेल गरम करून त्यात मेण मिसळा. नंतर टाचांवर सोडा. सकाळी पाय धुवा. मेण आणि खोबरेल तेल देखील भेगा पडलेल्या टाचांवर आराम देतात.

टॅग्स :थंडीत त्वचेची काळजीब्यूटी टिप्स