Lokmat Sakhi >Beauty > करा दुधाच्या सायीनं फेशियल, अवघ्या 10 मिनिटात मिळेल ग्लो! त्वचा दिसेल मऊमुलायम आणि तरुण

करा दुधाच्या सायीनं फेशियल, अवघ्या 10 मिनिटात मिळेल ग्लो! त्वचा दिसेल मऊमुलायम आणि तरुण

दुधाच्या सायीमध्ये (milk cream) असलेल्या गुणधर्माचा जास्तीत जास्त फायदा (benefits of milk cream to skin) करुन घेण्यासाठी सायीच्या मदतीनं फेशियल करता येतं. मलई फेशियलच्या चार स्टेपद्वारे ( 4 steps cream facial at home) पार्लरसारखा ग्लो घरच्याघरी अवघ्या 10 मिनिटात मिळतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2022 06:47 PM2022-09-15T18:47:44+5:302022-09-15T18:58:36+5:30

दुधाच्या सायीमध्ये (milk cream) असलेल्या गुणधर्माचा जास्तीत जास्त फायदा (benefits of milk cream to skin) करुन घेण्यासाठी सायीच्या मदतीनं फेशियल करता येतं. मलई फेशियलच्या चार स्टेपद्वारे ( 4 steps cream facial at home) पार्लरसारखा ग्लो घरच्याघरी अवघ्या 10 मिनिटात मिळतो.

Cream facial makes your skin fair, young and glowing. How to do cream facial at home? | करा दुधाच्या सायीनं फेशियल, अवघ्या 10 मिनिटात मिळेल ग्लो! त्वचा दिसेल मऊमुलायम आणि तरुण

करा दुधाच्या सायीनं फेशियल, अवघ्या 10 मिनिटात मिळेल ग्लो! त्वचा दिसेल मऊमुलायम आणि तरुण

Highlightsसायीनं त्वचेचा मसाज केल्यास त्वचेचं पोषण होतं आणि त्वचेत आर्द्रता निर्माण होते. सायीमध्ये प्रथिनं असल्यानं त्वचेस फायदेशीर अशा कोलॅजन निर्मितीला चालना मिळते. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी हळद आणि साय यांचं एकत्रित मिश्रण फायदेशीर ठरतं.

दुधाची साय (milk cream)  ही तूप करण्यासाठी साठवून ठेवली जाते. पण हीच साय रुप येण्यासाठीही फायदेशीर ठरते. दुधाच्या सायीमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्व, खनिजं आणि आरोग्यदायी फॅट्स असतात. हे गुणधर्म त्वचेचं पोषण करतात आणि त्वचेत ओलावा आर्द्रता निर्माण करतात. सायीमध्ये असलेल्या गुणधर्माचा benefits of milk cream to skin)  जास्तीत जास्त फायदा करुन घेण्यासाठी सायीच्या मदतीनं फेशियल करता येतं. मलई फेशियलच्या चार स्टेपद्वारे (4 steps cream facial at home)  पार्लरसारखा ग्लो घरच्याघरी अवघ्या  10 मिनिटात मिळतो.

Image: Google

कसं करायचं सायीचं फेशियल

1. मलई फेशियल करण्यासाठी सर्वात आधी चेहरा स्वच्छ करुन घ्यावा. चेहऱ्यावरील धूळ, घाण स्वच्छ करुन त्वचा डिटाॅक्सीफाय करावी. त्वचेस हानिकारक विषारी घटक त्वचेवरुन निघून गेले की चेहेरा तरुण आणि तेजस्वी दिसायला लागतो.  सायीचं फेशियल करताना चेहरा स्वच्छ करण्यासाठी 1 चमचा साय, 2 चिमूट हळद घ्यावी. साय आणि हळद दोन्ही चांगलं एकत्र करावं. हे मिश्रण चेहऱ्यावर लावावं. थोडा वेळ ते चेहऱ्यावर राहू द्यावं. नंतर कोमट पाण्यात कपडा बुडवून ओला करावा. त्या कपड्यानं चेहरा पुसावा. सायीच्या या क्लीन्जरनं चेहऱ्यावरील घाण स्वच्छ होते. 

2. चेहऱ्यावरची मृत त्वचा निघून गेली तरच त्वचा तरुण आणि तजेलदार दिसेल. त्यासाठी त्वचेची खोलवर स्वच्छता करणं गरजेचं आहे. यासाठी 2 चमचे साय आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घ्यावं. दोन्ही गोष्टी चांगल्या एकत्र करुन घ्याव्यात. हे मिश्रण चेहऱ्यावर गोलाकार मसाज करत लावावं. मसाज झाल्यानंतर थोडा वेळ चेहऱ्यावर तो लेप राहू द्यावा. थोड्या वेळानं चेहरा कापसाच्या बोळ्यानं पुसून घ्यावा. 

Image: Google

3. त्वचेचं योग्य पोषण होण्यासाठी त्वचेचा मसाज होणं आवश्यक आहे. सायीनं त्वचेचा मसाज केल्यास त्वचेची रंध्रं उघडतात, त्वचेला पुरेसा ओलावा मिळतो. सायीत असलेल्या पोषक घटकांमुळे त्वचेखालील रक्त प्रवाह वाढतो. त्वचेची चमक वाढते, त्वचेवरचे डाग निघून जातात. सायीच्या मसाजनं त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. सायीमुळे त्वचेला माॅश्चरायझर मिळतं. त्वचेवरची मोठी रंध्रं छोटी होतात. त्वचेवरील सुरकुत्या दूर होतात. सायीमध्ये प्रथिनं असतात. त्याची मदत कोलॅजन निर्मितीसाठी होतो. जास्त वेळ उन्हात राहिल्यास त्वचा काळवंडते. त्वचेवर सायीनं मसाज केल्यास त्वचेची पोषक घटकांची गरज पूर्ण होते. त्वचेत ओलसरपणा निर्माण होवून थंडावा मिळतो. उन्हानं आलेला काळवंडलेपणा दूर होतो. सायीच्या द्वारे मसाज करण्यासाठी 2 चमचे साय आणि थोडं गुलाब पाणी घ्यावं. सायीचा पातळ थर घ्यावा. त्यात थोडं गुलाब पाणी घालावं. या मिश्रणानं चेहऱ्याला गोलाकार मसाज करावा. मसाज केल्यानंतर चेहेऱ्यावर थोडावेळ साय राहू द्यावी. मग कापसाच्या बोळ्यानं चेहरा स्वच्छ पुसून घ्यावा. 

Image: Google

4. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी हळद आणि साय यांचं एकत्रित मिश्रण फायदेशीर ठरतं. सायीचा लेप तयार करण्यासाठी 1 मोठा चमचा साय आणि अधा चमचा हळद घ्यावी. दोन्ही गोष्टी एकजीव करुन घेऊन हे मिश्रण चेहऱ्यावर हलका मसाज करत लावावं.  मसाज झाल्यानंतर थोडा वेळ चेहरा तसाच ठेवावा. नंतर चेहरा पाण्यानं स्वच्छ धुवावा.

Web Title: Cream facial makes your skin fair, young and glowing. How to do cream facial at home?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.