Join us  

कांद्याची टरफलं कचरा म्हणून फेकू नका, ५ मिनिटांत करा झटपट हेअर डाय! केस काळेभोर होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2023 6:35 PM

Create a Natural Dye with Onion Peels कांद्याच्या टरफलांतही औषधी गुणधर्म असतात, केस पांढरे झाले असतील तर कांद्याच्या टरफलांचा हेअर डाय लावा

वातावरणातील बदलांचा थेट परिणाम केस व त्वचेवर होतो. बदलत्या ऋतूनुसार केसांच्या समस्या देखील बदलतात. केसात कोंडा, केस गळणे, केसांना फाटे फुटणे, केसांची ग्रोथ थांबणे, अशा अनेक समस्या अनेकांना छळतात. केस अकाली पांढरे होणे ही एक सर्वसामान्य समस्या बनली आहे. केस काळे करण्यासाठी अनेक जण डाय, मेहेंदी, हेअर कलरचा वापर करतात. पण या सगळ्या उपायामुळे कदाचित केसांना हानी देखील पोहचू शकते. महागड्या प्रॉडक्ट्सचा वापर न करता आपण कांद्याच्या सालींचा वापर करून घरच्या घरी डाय बनवू शकता(Create a Natural Dye with Onion Peels).

केस काळे करण्यासाठी आपण कांद्याच्या सालीचा वापर करू शकता. केसांसाठी कांद्याच्या रसाचे फायदे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण आपल्याला कांद्याच्या सालींचा हेअर डायबद्दल कल्पना होती का? कांद्याच्या सालीमुळे केसांची मुळे घट्ट होण्यास मदत होते. त्याच प्रमाणे कांद्यातील गुणधर्मामुळे केसांना पोषण मिळते.

२ चमचे कच्चे दूध- चिमूटभर हळद चेहऱ्याला लावा! महागडे ब्यूटी प्रॉडक्ट्स,अवघड फेसपॅकपेक्षाही प्रभावी उपाय

केस काळे करण्यासाठी कांद्याच्या सालीचा करा असा वापर

प्रथम कांद्याच्या साली तव्यावर भाजून घ्या. भाजताना त्या काळ्या होतील याची काळजी घ्या. त्यानंतर भाजलेल्या कांद्याच्या साली मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक पावडर तयार करुन घ्या. पावडर तयार झाल्यानंतर यात गुलाब जल घालून पेस्ट तयार करा. हे मिश्रण ब्रशच्या सहाय्याने केसांना लावा. व एका तासानंतर थंड पाण्याने केस धुवा.

चमचाभर बेसनाचे ३ फेसपॅक, त्वचा होईल नितळ आणि स्पॉटलेस चमकदार

कांद्याच्या या गुणांमुळे केस होतात काळे

कांद्याचा वापर फक्त फोडणीसाठी नाही तर, केसांसाठी देखील केला जातो. केसांच्या वाढीसाठी कांद्याच्या रसाचा वापर होतो. कांद्याचा रस केसांसाठी खूप आरोग्यदायी आहे. कांद्यामध्ये असलेले सल्फर केसांना घनदाट करण्यास मदत करते. कांद्याचे अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म, केसांच्या वाढीस प्रोत्साहन देतात. त्यामुळे केसांसाठी कांद्याचा वापर नक्की करून पाहा.

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी