चेहऱ्यावर काकडीचा रस लावायचा, काकडीच्या फोडी डोळ्यांवर ठेवायच्या असे काकडीचे त्वचेसाठी होतील असे बेसिक उपयोग आपल्याला माहिती असतात. पण त्यापेक्षाही खूप वेगवेगळ्या पद्धतींनी आपण काकडीचा (use of cucumber for beauty) वापर करू शकतो. त्यापैकीच एक उपाय म्हणजे काकडीच्या आईस क्यूबने (cucumber ice cubes) त्वचेला केलेला मसाज. या पद्धतीने काकडीचा वापर केला तर त्यामुळे निश्चितच पिंपल्स (pimples), डार्क सर्कल्स (dark circles), टॅनिंग (tanning), व्हाईट हेड्स (white heads), ब्लॅक हेड्स (black heads) असे त्रास कमी करता येतात आणि चेहरा आणखी चमकदार होण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.
काकडीचे आईस क्यूब तयार करण्यासाठी लागणारं साहित्य
- ताजी काकडी
- २ टेबलस्पून गुलाब जल
- ५ ते ६ थेंब लिंबाचा रस
- बर्फाचा ट्रे
'हळदीच्या बर्फा'चा भन्नाट उपाय, चेहऱ्यावरचे काळे डाग विसरा- त्वचेला मिळेल गोल्डन ग्लो
कसे करायचे काकडी आईस क्यूब?
(How to make cucumber ice cubes?)
- सगळ्यात आधी काकडी स्वच्छ धुवून घ्या आणि बारीक चिरून घ्या.
- यानंतर काकडीचे तुकडे आणि गुलाब जल मिक्सरमध्ये फिरवून त्याची पेस्ट तयार करा.
- हे मिश्रण एका भांड्यात काढून घ्या आणि त्यात काही थेंब लिंबाचा रस टाका.
- सगळे मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घेतले की ते बर्फाच्या ट्रे मध्ये टाका आणि फ्रिजरमध्ये सेट करायला ठेवा.
कसा करायचा वापर?
(How to use cucumber ice cubes?)
- सगळ्यात आधी कोणतेही सौम्य स्वरुपाचे क्लिंजर लावून चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
- त्यानंतर काकडीच्या आईस क्युबने चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करा. मसाज खूप जोरजाेरात किंवा खूप जास्त रगडून मुळीच करू नका.
- मसाज झाल्यानंतर १० ते १५ मिनिटे चेहरा तसाच राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून टाका.
- चेहरा पुसून कोरडा केल्यानंतर तुमचे नेहमीचे मॉईश्चरायझर किंवा ॲलोव्हेरा जेल लावून चेहरा हायड्रेटेड ठेवा.
काकडी आईस क्यूब लावण्याचे उपयोग (Benefits of cucumber ice cubes)
- चेहऱ्यावरचे काळवंडलेपण दूर होऊन चेहरा स्वच्छ होण्यासाठी उपयोग होतो.
- हा उपाय आठवड्यातून २ वेळा याप्रमाणे काही आठवडे नियमित केल्यास चेहऱ्यावर छान चमक येते.
- पिंपल्सचा त्रास कमी करण्यासाठी हा उपाय उत्तम आहे.
- बर्फाने मसाज केल्याने रक्ताभिसरण उत्तम होते आणि त्यामुळेही त्वचा चमकदार होण्यास मदत होते.
- त्वचेवर सुज येत असेल किंवा चेहरा लालसर दिसत असेल तर तो त्रासही कमी होतो.
- डोळ्यांखाली सूज येण्याचा त्रास होत असेल तर अशा पद्धतीने केलेला मसाज उपयुक्त ठरतो.