Join us  

केसांना लावा काकडीचा रस, केस सुंदर - शायनिंग- स्वस्तात मस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2022 6:03 PM

त्वचेचं सौंदर्य वाढवणारी काकडी निरोगी चमकदार केसांसाठीही (cucumber for hair) फायदेशीर असते. केसांचं आरोग्य राखण्यासाठी, केसांची वाढ, मजबूती, चमक यासाठी आवश्यक असलेले सर्व गुणधर्म काकडीत असल्यानं काकडी ही केसांसाठी (how to use cucumber for hair) वापरल्यास त्याचा फायदा होतो.

ठळक मुद्देकाकडीतील के जीवनसत्वामुळे केसांची वाढ रोखणाऱ्या टाळूकडील कॅल्सिफिकेशनची प्रक्रिया थांबून केस वाढण्यास मदत होते. काकडीतील पोटॅशियममुळे केस वाढतात. केसांची चमक वाढते. केस निरोगी होतात. केसांच्या मुळांचं रुक्षपणापासून रक्षण होतं.

काकडीतील पाण्याच्या विपुलतेमुळे काकडी (cucumber for health) आवर्जून खाल्ली जाते. काकडीतील गुणधर्म आरोग्यास फायदेशीर असतात. फ्रिजमध्ये ठेवलेली काकडी ही फक्त जेवणातल्या सॅलेडपुरतीच नसते तर त्वचेच्या सौंदर्यासाठीही काकडीचा वापर केला जातो. त्वचेचं सौंदर्य वाढवणारी काकडी  निरोगी चमकदार केसांसाठीही ( cucumber for hair) फायदेशीर असते. केसांचं आरोग्य राखण्यासाठी,  केसांची वाढ, मजबूती, चमक यासाठी आवश्यक असलेले सर्व गुणधर्म  काकडीत असल्यानं काकडी ही केसांसाठी वापरल्यास (how to use cucumber for hair)  त्याचा फायदा होतो. 

Image: Google

काकडीमधील पोषणमूल्यं आणि ॲण्टिऑक्सिडण्टस केसांच्या मुळांचं पोषण करतात. यामुळे केस वाढण्यास मदत होते. काकडीच्या रसानं केस गळती रोखता येते. काकडीमधील के जीवनसत्वामुळे नवीन केस येण्यास मदत होते. के जीवनसत्व केसांची वाढ रोखणाऱ्या टाळूकडील कॅल्सिफिकेशनची प्रक्रिया थांबवून केस वाढण्यास मदत करतं. काकडीतील अ जीवनसत्वामुळे केसांची वाढ होते. टाळूकडील त्वचेतील सीबम ग्रंथींची वाढ होण्यास अ जीवनसत्व मदत करतं. यामुळे टाळूकडील त्वचेवर तेल राखलं जातं. काकडीतील पोटॅशियममुळे केस वाढतात. केसांची चमक वाढते. केस निरोगी  होतात. केसांच्या मुळांचं रुक्षपणापासून रक्षण होतं. त्यामुळे केसात कोंडा होत नाही. काकडीतील सल्फरमुळे केस वाढतात. तर झिंकमुळे केस पेशी दुरुस्ती होण्यास, केस वाढ होण्यास मदत होते. काकडीतील मॅग्नीजद्वारे केसांच्या वाढीसाठी केसांना खनिजांचा पुरवठा होतो. काकडीतील पॅंटोथेनिक ॲसिडमुळे केसांना मजबुती मिळते. केस रुक्ष होत नाही. केसांची मुळं मजबूत होतात. केस वाढतात. केसांसाठी काकडीत असलेल्या पोषक यागुणधर्मामुळेच काकडीचा वापर केसांसाठी करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. केसांसाठी काकडीचा रस तीन पध्दतीनं वापरता येतो.

Image: Google

1. केस वाढण्यासाठी आणि केसांवर चमक येण्यासाठी काकडीचा रस वापरावा. केसांच्या लांबीप्रमाणे काकडी घ्यावी. काकडी मिक्सरमधून बारीक करावी किंवा काकडी किसून घ्यावी. वाटलेल्या काकडीचा रस वाटीमध्ये काढून घ्यावा. काकडीचा रस केसांच्या मुळांना लावावा. काकडीचा रस केसांना लावल्यानंतर थोड्या वेळानं केसांच्या मुळाशी गोलाकार मसाज करावा. नंतर केस पाण्यानं स्वच्छ धुवावेत. केस धुतांना शाम्पू वापरु नये. 

Image: Google

2. काकडीचा रस केसांना लावण्याची दुसरी पध्दत म्हणजे काकडीच्या रसात थोडा लिंबाचा रस घालून तो केसांना लावावा. यासाठी वाटीभर काकडीच्या रसात  2 मोठे चमचे लिंबाचा रस घालावा.  दोन्ही रस चांगले एकत्र करुन हा रस केसांच्या मुळांशी लावावा. रस लावल्यानंतर अर्ध्या तासानं केस पाण्यानं स्वच्छ धुवावेत. या उपायानं केसातील कोंडा निघून जातो.

Image: Google

3. काकडीतील पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि के जीवनसत्वामुळे केस मजबूत होतात. मजबूतीसोबतच केसांना चमक येण्यासाठी काकडीचा रस आणि दह्याचा वापर केला जातो. या दोन्हींच्या मिश्रणामुळे केसांशी निगडित अनेक समस्या दूर होतात. केसांसाठी काकडी आणि दह्याचा वापर करताना एक कप काकडीचा रस घ्यावा. त्यात 2 मोठे चमचे दही घालावं. हे दोन्ही चांगलं एकत्र करुन हे मिश्रण केसांना आणि केसांच्या मुळांना लावावं. अर्ध्या तासानं केस शाम्पूनं स्वच्छ धुवावेत. केसांची चमक टिकून राहाण्यासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.    

टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजी