डोळ्याखालची काळी वर्तुळं (dark circles) ही खूप चिवट सौंदर्य समस्या आहे. केवळ प्रौढ स्त्रियांमध्येच नाही तर तरुण वयातही ही समस्या मोठ्या प्रमाणावर दिसते. डोळ्यांखालची काळी वर्तुळं आणि सूज घालवण्यासाठी अनेकजणी सप्लिमेण्टस, क्रीम्स यांचा वापर करतात. पण त्याचाही फायदा झाला नाही तर काय करायचं हा प्रश्न उरतोच. या प्रश्नाचं उत्तर आहार तज्ज्ञ अनुपमा गिरोत्रा यांच्याकडे आहे. त्या म्हणतात की क्रीम्स,सप्लिमेण्टस् यामुळे जे होत नाही ते आहारात योग्य पदार्थांचा समावेश केल्यास सहज होतं. डोळ्यांखालची काळी वर्तुळं आणि सूज यासाठी (food for reduce dark circles) आहार हेच उत्तम औषध आहे. टमाटा, काकडी आणि कलिंगड यांचा आहारात नियमित समावेश केल्यास डोळ्याखालची काळी वर्तुळं आणि सूज (puffy eyes) या समस्या तर जातातच सोबतच त्वचाही निरोगी आणि नैसर्गिकरित्या सुंदर होते.
Image: Google
टमाटा
त्वचा हे शरीरारचं बाहेरचं आवरण. त्वचेखालील अवयवांपेक्षा त्वचा ही कठीण आवरण स्वरुपात असली तरी त्वचा संवेदनशील आणि नाजूक असते. टमाट्यात असलेले क आणि के जीवनसत्वं आणि पोटॅशियम हे घटक नाजूक त्वचेचं संरक्षण करुन त्वचा निरोगी राखतात. टमाट्यामध्ये ॲण्टिऑक्सिडण्ट आणि लायकोपीन हे घटक असतात. हे घटक रक्त वाहिन्यांचं संरक्षण करतात. या घटकांमुळे डोळ्यांखालील रक्तप्रवाह चांगला राहातो. आहारात टमाटा सॅलेड स्वरुपात खावं किंवा भाज्यांमध्ये टमाट्याची प्युरी वापरण्याचा सल्ला अनुपमा गिरोत्रा देतात.
Image: Google
काकडी
काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं. काकडीचं सेवन नियमितपणे केल्यास त्वचेखालील कोलॅजन निर्मितीला चालना मिळते. त्वचेचा रंग उजळतो. काकडीमध्ये के, अ, ई आणि क जीवनसत्वांचं प्रमाण भरपूर असतं. हे घटक रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढवतात. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये गुठळ्या धरत नाहीत. डोळ्यांखालील काळी वर्तुळं जाण्यासाठी काकडी नियमित खाणं हा उत्तम उपाय आहे.
Image: Google
कलिंगड
कलिंगडामध्ये ब1, ब2 आणि क जीवनसत्वं आणि 92 टक्के पाणी असतं. त्वचेला हवा असलेला ओलावा कलिंगडामधून मिळतो. कलिंगडामध्ये असलेले बीटा केरोटीन आणि ॲण्टिऑक्सिडण्टस डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. कलिंगडात राइबोफ्लेविन, थायमिन, नियासिन, ब6 जीवनसत्व, फोलेट, मॅग्नेशियम, फाॅस्फरस, झिंक, पोटॅशियम, लोह, मॅग्नीज, कोलीन, सेलेनियम आणि लायकोपिन हे महत्वाचे घटक असतात. हे घटक आरोग्यसोबतच त्वचेसाठीही महत्त्वाचे असतात. कलिंगडाच्या हंगामात कलिंगड नियमित खाल्ल्यास डोळ्यांखालील काळी वर्तुळं कमी होतात.