Lokmat Sakhi >Beauty > पाहा काकडीच्या बर्फाची जादू, चेहऱ्यावर ग्लो हवा तर करा हा फुकट उपाय आजच...

पाहा काकडीच्या बर्फाची जादू, चेहऱ्यावर ग्लो हवा तर करा हा फुकट उपाय आजच...

Cucumber Water Ice Cube Recipe : Benefits Of Cucumber Ice Cubes For Face : चेहेऱ्याला थंडावा मिळण्यासाठी काकडीच्या पल्पचे क्युब्स वापरुन पाहाच, स्किन दिसेल अशी की...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2024 02:18 PM2024-06-17T14:18:45+5:302024-06-17T14:37:50+5:30

Cucumber Water Ice Cube Recipe : Benefits Of Cucumber Ice Cubes For Face : चेहेऱ्याला थंडावा मिळण्यासाठी काकडीच्या पल्पचे क्युब्स वापरुन पाहाच, स्किन दिसेल अशी की...

Cucumber Water Ice Cube Recipe Cucumber ice cubes to remove suntan, dark spots, crystal clear skin, pimples, acne, | पाहा काकडीच्या बर्फाची जादू, चेहऱ्यावर ग्लो हवा तर करा हा फुकट उपाय आजच...

पाहा काकडीच्या बर्फाची जादू, चेहऱ्यावर ग्लो हवा तर करा हा फुकट उपाय आजच...

काकडीचा वापर आपण रोजच्या आहारात करतो. शरीराला थंडावा देणारी ही काकडी खाणे आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरते. काकडीपासून तयार केलेली कोशिंबीर आपल्या रोजच्या जेवणात असतेच. काकडी खाल्ल्याने आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे मिळतात. याचबरोबर स्किनसाठी देखील काकडीचा (Surprising Benefits Of Using Cucumber On Skin) वापर करणे उपयुक्त ठरते. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असते, त्यामुळे आपले शरीर आणि त्वचा हायड्रेटेड राहते. काकडीचा वापर त्वचेसाठी केल्यास त्वचेच्या अनेक समस्या कमी होतात(COOL WAYS TO USE CUCUMBER FOR YOUR BEST SKIN EVER).

आपण आपल्या स्किन केअर रूटीनमध्ये काकडीचा (Cucumber Ice Cubes For Face) वापर करू शकता. काकडीपासून फेस मास्क, टोनर अशा स्किनसाठी फायदेशीर गोष्टी देखील बनवू शकता. एवढेच नव्हे तर काकडीच्या रसापासून छोटे - छोटे क्युब्स तयार करुन ठेवू शकता. या क्युब्सचा वापर चेहऱ्यावर कसा करता येईल जाणून घेऊयात(Benefits Of Cucumber Ice Cubes For Face).

साहित्य :-

१. काकडीचा रस - १ कप
२. तांदुळाचे पाणी - १/२ कप 
३. गुलाब पाणी - १ टेबलस्पून 

काकडीचे क्यूब कसे तयार करावेत ? 

१. सगळ्यातआधी काकडीचे लहान लहान गोल कप करुन घ्यावेत. 
२. हे काकडीचे काप मिक्सरच्या भांड्यात घालून ते व्यवस्थित वाटून त्याची पातळसर पेस्ट बनवून घ्यावी. 
३. काकडीची पेस्ट एका वेगळ्या भांड्यात काढून त्यात तांदूळ भिजवून घेतलेले पाणी ओतावे. 
४. आता या मिश्रणात गुलाब पाणी घालून सगळे मिश्रण चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यावे. 
५. त्यानंतर बर्फाचा ट्रे घेऊन  त्यात हे काकडीचे मिश्रण ओतून घ्यावे. 
६. आता हा ट्रे ३ ते ४ तास फ्रिजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यावा, त्यानंतर आपण हे काकडीचे क्यूब स्किनसाठी वापरु शकता. 

येताजाता गारेगार बर्फ खाण्याची इच्छा होते? बर्फ खाण्याचा हा आजार म्हणजे शरीरात ‘ही’ कमतरता...

चेहऱ्यावरचे ब्लॅकहेड्स कमीच होत नाहीत ? वापरा होममेड मास्क, चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स गायब....

स्किनसाठी या क्युब्सचा वापर कसा करावा ? 

१. तेलकट त्वचा आणि मुरुमांची समस्या असेल तर काकडीचे क्यूब खूपच फायदेशीर ठरू शकतात. 
२. मेकअप काढण्यासाठी मेकअप रिमूव्हरचा वापर करण्याऐवजी या क्युब्सचा वापर करु शकता. 
३. उन्हामुळे स्किन टॅन झाले असल्यास ते दूर करण्यासाठी उन्हातून आल्यावर हे क्युब्स चेहेऱ्याला लावणे फायदेशीर ठरते. 
४. त्वचेवर खाज व पुरळ येत असल्यास या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी हे क्युब्स रोज चेहेऱ्याला लावावेत.
५. जर आपल्या डोळ्यांखाली डार्क सर्कल्स मोठ्या प्रमाणात येऊन स्किन गडद झाली असेल तर हे काकडीचे क्युब्स डोळ्यांखाली लावावेत. याने डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत मिळते. 

Web Title: Cucumber Water Ice Cube Recipe Cucumber ice cubes to remove suntan, dark spots, crystal clear skin, pimples, acne,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.