Join us  

पावसाळ्यात चेहऱ्यावर दह्यात १ सोनेरी गोष्टी मिसळून जरूर लावा; मुरुमांचे डाग - टॅनिंग होईल गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2024 10:00 AM

Curd and Turmeric: Benefits for Skin & Its Uses : चेहऱ्यावर दही आणि हळद लावल्याने काय होते?

ऋतू कोणताही असो, चेहऱ्याची काळजी बाराही महिने घ्यावी लागते (Skin Care Tips). आता पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात स्किन कधी ड्राय तर कधी अधिक तेलकट होते. काही वेळेस टॅन देखील होते (Healthy Skin). पावसाळ्यात चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी आपण ब्यूटी प्रॉडक्ट्सचा वापर न करता, काही घरगुती उपायांचा देखील वापर करून पाहू शकता (Curd for Skin).

बहुतांश ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये केमिकल रसायनांचा वापर होतो. ज्यामुळे स्किन खराब होण्याची शक्यता जास्त असते. स्किनची काळजी घेण्यासाठी आपण दही आणि हळदीचा देखील वापर करू शकता. दही आणि हळदीचा वापर करूनही आपण त्वचेची काळजी घेऊ शकता. पण यामुळे त्वचेला कोणते फायदे मिळतात? दही हळदीचा वापर केल्याने स्किन क्लिअर होते का? पाहूयात(Curd and Turmeric: Benefits for Skin & Its Uses).

चेहऱ्याला दही लावण्याचे फायदे

मॉइश्चरायझर: दह्यामध्ये असलेले लॅक्टिक ऍसिड त्वचेला आर्द्रता प्रदान करते. ज्यामुळे स्किन सॉफ्ट होते.

डाळ शिजत घालण्यापूर्वी तुम्हीही 'ही' चूक करता का? डाळ भिजत घालायला विसरता का? डाळ शिजत घालण्यापूर्वी...

डेड स्किन काढून टाकण्यास मदत: दही नैसर्गिक एक्सफोलिएंट म्हणून कार्य करते, जे मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करते.

अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म: दह्यामध्ये आढळणारे प्रोबायोटिक्स त्वचेला बॅक्टेरियापासून वाचवतात, त्यामुळे मुरुमांची समस्या कमी होते.

चेहऱ्याला हळद लावण्याचे फायदे

दाहक-विरोधी: हळदीमध्ये कर्क्यूमिन असते, जे दाहक-विरोधी गुणधर्मांनी समृद्ध असते. ज्यामुळे त्वचेची जळजळ आणि लालसरपणा कमी होतो.

अँटिऑक्सिडेंट: हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे त्वचेला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतात आणि निरोगी ठेवतात.

चिलटं, डास-झुरळांनी उच्छाद मांडलाय? बेकिंग सोड्याचा 'करा' जबरदस्त उपाय; किडे होतील गायब

चेहऱ्यासाठी दही आणि हळदीचा वापर कसा करावा?

- सर्वात आधी एका बाऊलमध्ये २ ते ३ चमचे दही घ्या. त्यात अर्धा चमचा हळद घालून मिक्स करा. तयार पेस्ट चेहरा आणि मानेवर लावा. १५ ते २० मिनिटे तसेच ठेवा. शेवटी कोमट पाण्याने चेहरा धुवा. यामुळे मुरुम आणि काळे डाग यांसारख्या त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी प्रभावी ठरते. 

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी